शेतातील धन

एक शेतकरी होता. तो फारच गरीब परंतु मनाने फार सज्जन होता. दररोज शेतीत राबणे व काम करताना हरिनाम घेणे हेच त्याने आपले मुख्य काम मानले होते.  त्याला तशी फार मोठी शेती नव्हती परंतु शेतीचे उत्पन्न जेवढे येईल त्यात तो समाधानी होता. त्याला एकूण चार मुले होती. परंतु ती सर्वच कामचुकार व आळशी होती. त्याची शेतकर्‍याला चिंता होती.

एके दिवशी शेतकरी आजारी पडला व त्याचा आजार वाढतच गेला. त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष झाले. त्या वर्षी पीक फार आले नाही. शेवटी आता आपण यातून वाचणार नाही हे लक्षात आल्यावर त्याने चारही मुलांना जवळ बोलावले व अस्पष्ट आवाजात आपल्या शेतात धन आहे असे सांगून प्राण सोडला. शेतात गुप्त धन असल्याचे चारही मुलांना कळल्यानंतर ती चारही मुले शेतावर गेली व त्यांनी
सगळीकडून शेत उकरायला सुरुवात केली. परंतु त्यांना कोठेही धन सापडले नाही. त्यामुळे सर्वजण हताश झाले. मात्र शेत उकरून झाले होते. त्यामुळे त्यात निदान बी तरी टाकावे, असा विचार थोरल्या मुलाच्या मनात आला व त्याने ती कल्पना आपल्या इतर तीन भावांना सांगितली. त्यांनाही ती पटली. त्याप्रमाणे चौघा भावांनी एकत्र येऊन ज्वारीची पेरणी केली. त्या वर्षी वेळेवर पाऊस आला त्यामुळे बी
शेतात चांगले रुजले व ज्वारीचे पीक येऊ लागले. त्यानंतर पुन्हा चौघांनी आता पीक आलेच आहे तर त्याची योग्य निगरानी करण्याचे ठरविले. पिकाला योग्य वेळी खत पाणी देऊन त्यांनी शेतीची मशागत केली. त्यामुळे शेतात ज्वारीची कणसे डोलू लागली. गावातील जो तो पीक चांगले आले म्हणून शेतकर्यांच्या मुलांचे कोतुक करू लागला. चौघा मुलांनी योग्य वेळी ज्वारीची कणसे खुडली. त्यातून दहा-बारा पोती ज्वारीचे उत्पन्न झाले. ती ज्वारी विकून चौघाही मुलांना भरपूर पैसे मिळाले. पैसे हातात पडल्यानंतर चौघांनाही विलक्षण आनंद झाला व आपल्या वडिलांनी शेतात ठेवलेले गुप्तधन हेच होते, अशी त्यांची धारणा झाली.

त्यानंतर चौघांनी मिळून भरपूर मेहनत करून दरवर्षी आपल्या शेतातून असेच धन गोळा करण्याचा निश्चय केला.About Guest Author 508 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सोलापूर घोंगड्या

सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

Loading…