नवीन लेखन...

ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर

ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर  यांचा जन्म ५ जानेवारी १९४३ रोजी झाला.

अरुण कशाळकर हे एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक आहेत. अरुण कशाळकरांचे वडील ॲडव्होकेट नागेश दत्तात्रेय ऊर्फ भाऊसाहेब कशाळकर हे एक नावाजलेले संगीतज्ञ आणि संगीतगुरू होते. अरुण कशाळकर हे गायक पं. उल्हास कशाळकरांचे सख्खे बंधू. त्यांचे दुसरे भाऊ विकास कशाळकर हेही गायक आहेत.

अरुण कशाळकरांनी पंडित राजाभाऊ कोगजे आणि पंडित राम मराठे यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी आग्रा घराण्याच्या संगीताची तालीम बबनराव हळदणकरांकडून घेतली. पं.गजाननराव जोशी यांच्याकडेही अरुण कशाळकर अनेक वर्षे संगीतसाधना करीत होते.

अरुण कशाकरांचा ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर गायकीचा, तसेच जुन्या गायक मंडळींबाबतचा अतिशय डोळस अभ्यास आहे. कशाळकरांची गायकी ही तिन्ही घराण्यांच्या गायकाचा मिलाफ आहे. आग्रा घराण्याच्या गायकीवर त्यांचा विशेष भर असतो. त्यांच्या मैफिलीत ‘नोमतोम, ‘बोल’. ‘ताना’ या आग्रा घराण्याच्या वैशिष्ट्यांचा अनुभव येतो.

अरुण कशाळकरांनी ‘रसदास’ या टोपणनावाने काही बंदिशी रचल्या आहेत. ‘”स्वरअर्चना” या त्यांच्या पुस्तकात त्यांनी स्वतः रचलेल्या सुमारे १५० बंदिशी संग्रहित आहेत.

‘विलायत हुसेनखांच्या बंदिशींचे सौंदर्य’ या विषयावर कशाळकरांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाकडून संगीताचार्य ही डॉक्टरेट समकक्ष पदवी मिळवली आहे. त्यांनी अनेकांना डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन केले आहे. अरुण कशाळकर हे संगीताच्या विद्यार्थ्यांना हवेहवेसे वाटणारे शिक्षक आहेत. रवींद्र परचुरे, विशाल मोघे, मुकुल कुलकर्णी हे त्यांचे काही प्रमुख शिष्य.

एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात अरुण कशाळकर हे पणजी येथे कला ॲकॅडमीच्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत या शाखेचे प्रमुख होते.अरुण कशाळकर यांनी काही काळ बॅंकेत नोकरी करत असत.त्यांनी अनेकदा सिंगापूर आणि अमेरिका येथे जाऊन गाण्याचे कार्यक्रम केले आहेत.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..