नवीन लेखन...

ज्येष्ठ वैज्ञानिक भारतरत्न सी. एन. राव

चिंतामणी नागेश रामचंद्र राव, ऊर्फ सी. एन. आर. राव यांचा जन्म ३० जून, इ.स. १९३४ कर्नाटकमधील बंगळूर येथे झाला. सी. एन. आर यांचे आजोबा आणि आजी पार्वतीबाई हे घरात मराठीच बोलत असत. तर सी. एन. आर यांचे वडील आणि आई हे कानडीत बोलत असले तरी ते त्यांचे आजोबा त्यांच्याशी मराठीत बोलत असत. यातूनच त्यांना मराठीची आवड निर्माण झाली. त्यांनी काही जुनी मराठी नाटके पाहिल्याचेही त्यांचे मित्र सांगतात. इतकेच नव्हे तर राव यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनात कानडी नाटकांमध्ये कामे केली होती, अशी आठवणही त्यांचे सोबती सांगतात. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्यात देशमुख म्हणून डॉ. राव यांचे पूर्वज काम करत होते. अनेक वर्षे कोल्हापूरला असलेले राव कुटुंबीय मराठा साम्राज्याचा विस्तार झाल्यावर थेट आताच्या कर्नाटकापर्यंत पोहोचले. त्यावेळेस त्यांचे पूर्वज आनंद राव देशमुख आणि हनुमंत राव देशमुख हे बेंगळुरूमध्ये मराठा साम्राज्यासाठी काम करू लागले. थोडय़ा कालावधीनंतर आनंद राव देशमुख यांचे निधन झाले. त्यावेळेस हनुमंत राव यांनी कुटुंबबांधणी सुरू केली आणि विविध ठिकाणी विखुरलेल्या देशमुख कुटुंबाला एकत्र आणले गेले. मग त्यांनी तेथेच स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. सी. एन. आर राव यांच्या आजोबांपर्यंत त्यांच्या घरात जुनी मराठी बोलली जायची. यामुळे सी. एन. आर यांनाही मराठी बोलता येते.

डॉ. राव यांना विज्ञान या विषयामध्ये लहानपानपासून रुची होती. त्याचप्रमाणे त्यांच्यावर नोबेल पारितोषिक विजेते सी. व्ही . रमण यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.

रावांनी इ.स. १९५१ साली म्हैसूर विद्यापीठातून बॅचलर पदवी मिळवली. पुढील दोन वर्षांत त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. त्यानंतर ते पीएच.डी. अभ्याक्रमासाठी अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात प्रवेश घेतला आणि १९५८ साली पीएच.डी मिळवली. त्यांनी इ.स. १९६३ ते इ.स. १९७६ या काळात कानपुरातील भारतीय प्रौद्योगिकी संस्थेच्या रसायनशास्त्र विभागात, तर १९८४ ते १९९४ या काळात बंगळुरातील भारतीय विज्ञान संस्थेत अध्यापन केले.

डॉ. राव हे ‘ सॉलिड स्‍टेट केमिस्‍ट्री ‘ (Solid State Chemistry) म्हणजे घन-स्थिती रसायनशास्त्र व संरचनात्मक रसायनशास्त्र हे त्यांचे अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत. त्यांचे आजपर्यंत चौदाशे शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांनी एकूण ४५ पुस्तके लिहिली आहेत.

वर्षांला तब्बल ३० ते ४० शोधनिबंध सादर करणारे डॉ. राव यांनी आजपर्यंत एकाही संशोधनावर स्वामित्व हक्क घेतलेला नाही. त्यांच्या मते विज्ञान हे सर्वासाठी खुले असले पाहिजे. यामुळे ते स्वामित्व हक्क घेत नाहीत. त्यांच्या संशोधनावर इतर देशांनी स्वामित्व हक्क मिळवले आहेत. विज्ञानप्रेमी डॉ. राव हे रविवारीही सकाळी ८ ते दुपारी २ प्रयोगशाळेत जाऊन काम करतात.

ज्येष्ठ वैज्ञानिक आणि भारतरत्न जाहीर झालेले डॉ. सी. एन. आर. राव हे बेंगळुरूमधील असले तरी, त्यांचे कुटुंब महाराष्ट्र आणि मराठीशी संबंधीत आहेत.

डॉ. राव हे इंटरनेशनल सेंटर फॉर मैटीरियल्‍स सायन्सचे निदेशक म्ह्णून होते. त्याचप्रमाणे पुरड्यू विश्‍वविद्यालय , ऑक्सफर्ड विश्‍वविद्यालय (, कैम्ब्रिज विश्‍वविद्यालय आणि कैलिफोर्निया विश्‍वविद्यालयचे विजिटिंग प्रोफेसरही होते. त्याशिवाय ते जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर एडवांस्‍ट साइंटिफिक रिसर्च चे संस्‍थापक निदेशकपण होते.

सध्या ते ५० हून आधी देश-विदेशी वैज्ञानिक संस्थांचे मानद सदस्य आहेत.

सुदैवाने मला त्यांचे भाषण मुंबईयेथील आय. आय. टी मध्ये ऐकण्याचा योग आला तेव्हा त्यांची स्वाक्षरी मिळाली.

भारत सरकारने डॉ. राव यांना पदमश्री आणि पदमविभूषण देऊन त्यांचा सन्मान केला त्याचप्रमाणे त्यांना ‘ भारतरत्न ‘ देऊन त्यांचा गौरव केला. त्यांना इतरही अनेक पुरस्कार मिळाले त्यामध्ये डैन डेविड फाउंडेशन , तेल अवीव विश्‍वविद्यालयाकडून ‘ डैन डेविड प्राइज ‘ , फ्रांस सरकार तर्फे ‘ नाइट ऑफ द लीगन ऑफ ऑनर ‘ सन्मान , 2008 मध्ये अब्‍दुस सलाम मेडल , 2013 मध्ये चायनीज एकेडमी ऑफ सायन्सचे सर्वश्रेष्‍ठ सायंटिस्ट अवार्ड आणि आईआईटी, पटना मधून ‘ डिस्‍टिंग्युस्‍ड एकेडमीसियन अवार्ड ‘ यांचा समावेश आहे. त्यांना अनेक देशांनी प्रलोभने देऊन त्यांच्या देशात बोलवले परंतु ते मात्र भारत देशाचीच सेवा करत अजूनही कार्यरत राहिले आहेत.

त्याचे भाषण मला मुंबईच्या आय आय टी मध्ये ऐकण्याचा योग आला तेव्हा त्यांची स्वाक्षरीही घेतली.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 363 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..