नवीन लेखन...

संकटातील चिमणी

शांत होती रात्र सारी,  आणि निद्रे मध्ये सारे

खिडकी मधूनी वाहे,  मंद मंद ते वारे….१

तोच अचानक तेथे,  चिमणी एक ती आली

मध्य रात्रीचे समयी ओरड करू लागली….२

जाग येता निद्रेतूनी,  बत्ती दिवा पेटविला

काय घडले भोवती,  कानोसा तो घेतला….३

माळावरती बसूनी,   चिव् चिव् चालू होती

बघू लागलो दूरूनी धडधडणारी छाती….४

मध्येच उडूनी जाई, दारावरती बसे

तगमग देखूनी तीची, कांहीं न कळत असे….५

भाषा न कळली जरी,  धडकन सांगत होती

‘संकटात आहे हो मी,  ह्या भयाण मध्यरात्री’….६

केवीलवाणी बघूनी,  भूतदया ही आली

काय हवे तिजला,  या अवचित वेळी….७

जेंव्हां  बसे माळावरी,  ओरड वाढत होती

हालचालीतील बैचेनी, काही सूचवित होती….८

आधार घेवूनी कसला,  माळावरती चढलो

विखूरलेल्या सामानी,  निरखूनी बघू लागलो…९

धस्स झाले मन बघूनी,  एक लांब त्या सर्पाला

छोट्या घरट्या पुढती,  विळका घालूनी बसला..१०

जीभल्या चाटीत होता,  समोर बघूनी भक्ष्य

चिव चिवणारी पिल्ले,  होती तयाची लक्ष्य….११

चाहूल माझी लागता,  सावध परि झाला

छलांग मारीत वेगे,  झरोक्यामधूनी गेला…१२

काळसर्प तो बघूनी,  उडाली होती चिमणी

घुटमळला जीव परि,  पिल्लामध्ये अडकूनी….१३

आघाद होता हृदयी,  कळवळूनी ती गेली

मातृत्वातील ओढीने,  गहीवरूनी ती आली…१४

भयाण असूनी संकट,  चिमणीची बघता शक्ती

यश मिळविले तिने,  योजूनी केवळ युक्ती….१५

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..