नवीन लेखन...

सद्गुरु ही व्यक्ती नसून तत्व आहे

किंबहूना सद्गुरुंचं निर्गुण स्वरूप भक्तांना कळावं हीच प्रत्येक देहधारी सद्गुरुंची ईच्छा असते! तेंच खरोखरचं गुरूकार्य होय. त्यांच्या सद्गुरू म्हणून अवतरण्या मागचे हेच एक कारण असत की सर्व विश्व व्यापक अशा सद्गुरू रुपाबद्दल आपल्या शिष्यांना, भक्तांना शिकवाव! ह्याच विषयी आपल्या भक्तांनां विचाराधीन करण्याच्या उद्देशानेंच गुरूनी वरील विधान अनेकदा केले. यानंतर जे गुरुभक्त त्या गुरू स्वरूपा बद्दल विचार करू लागले की त्यानंतरच त्यांची खरीखुरी अध्यात्मिक वाटचाल सुरू होते. त्या वाटेवर वाटचाल करतांना प्रथम प्रत्यक्षपणे व नंतर अप्रत्यक्षपणे सद्गुरूंचं मार्गदर्शन मिळत जातं व तो भक्त शिष्य कधी होतो तेंच कळत नाही. हे अप्रत्यक्ष मार्गदर्शन सद्गुरुंच्यां समाधी नंतरही सुरू राहते! प्रथम कधी गंध, स्पर्श, प्रकाश तर कधी अस्तित्वाची जाणीव या निरनिराळ्या माध्यमांतून सद्गुरु आपल्या अस्तित्वाचा प्रत्यय देत असतात! सद्गुरु सतत सानिध्यांत आहेत या एका जाणीवे पोटी शिष्याचे विकार, दोष हळूहळू कमी होऊ लागतात. शिवी द्यावीशी वाटते पण सद्गुरुं समोर कशी देणार? हात उगारावासा वाटतो पण सद्गुरु पाहताहेंत ना? क्रोध, काम, मत्सर, मद वगैरेचं मनावरील साम्राज्य धुळीस मिळूं लागतं. मन शुद्ध, शांत होते. सद्गुरुंच्यां आठवणीने हळवं होतं. हळूहळू दिवसा ढवळ्या, जागेपणी सद्गुरु समोर येऊन संवाद होतो. मग आजुबाजुच्या गर्दीचं ही भान राहत नाही. मग सद्गुरुंच्या फोटो, पादूका या आठवणींच्यां साधनांचां ही विसर पडतो. सद्गुरु सततच सोबत असतात. प्रथम समोर असतात, मग अवती भवती असतात, तर एके दिवशी नकळत शिष्याच्या देहाचा ताबा घेऊन सद्गुरु होतात व त्या देहावाटे आपले कार्य चालू ठेवतात! काय आहे त्यांचं कार्य?

आश्रम स्थापण्याचं? मठ मांडण्याचं? मंदिर उभारण्याचं? की संस्था स्थापण्याचं? सद्गुरुंनीं स्थापलेल्या संस्थांवर ताबा मिळविण्याचं तर खचितच नाही भक्तांना गुरू स्वरूप समजाऊन देणे एवढच कार्यं आहे सद्गुरुंच!या करिता कशाचीच गरज नाही त्यांना. सद्गुरु भक्ति भावयुक्त माणसाशी कधीही संपर्क साधून, त्यांना भक्त व नंतर शिष्य बनवू शकतात. आपल्या अस्तित्वाची सतत जाणीव करून देऊ शकतात. स्वप्नांत जाऊन दर्शन देणे, संदेश, आदेश देणे ही त्यांतील सुरूवातींच्या पायऱ्या पण यांतील संदेश हे स्वार्थ, क्रोध, कपट, कारस्थान निर्माण करणारे नसतात. कारण सद्गुरुंच्यां मूळ स्वरूपातंच ते नाहीत. तिथे फक्त प्रेम आहे, भक्ती आहे, कणव आहे, श्रद्धा आहे, आनंद आहे. त्याव्यतिरीक्त ते काही भाव निर्माण करूं शकत नाहीत. लोक अज्ञाना पोटी आयुष्य फुकट घालवितात! याची निवृत्तीनाथांना कणव आली व त्यांनी ज्ञानेश्वरांकडून || ज्ञानेश्वरी || लिहून घेतली. ती कणव एखादं मंदिर, संस्था ताब्यात घ्यायला कधीच सांगू शकत नाही. तो तिचा धर्मच नाही. ती कणव, ती प्रेम ममता असे कांही आदेश देते असे जर कुणी सांगू लागला तर ते धादांत खोटे आहे याची खात्री बाळगा. या अवस्थेच्या पलिकडे गेलेल्या महात्म्यांना मंदिर, मूर्ती, आश्रम, संस्था ह्यांविषयी काही आकर्षण वाटावे, हे शक्य नाही!

प. प. वासुदेवानंदसरस्वतींच्या पार्थिवाला जल समाधी देताना त्यांचे दंड कमंडलू वगैरे त्यांच्या कमरेला बांधून पाण्यात सोडले तेव्हां त्यापैकी काही हातात लागावे म्हणून अनेकांनी नर्मदेत बुड्या मारल्या पण सर्वांच पाणी झालं. हाती काहीच लागलं नाही. आणि हाती लागलं असतं तरी ते घरात ठेउन काय मिळणार होत लोकांसाठी जे त्यांनी लिहीले ते इथेच सोडलं, त्यांच्या शिकवणूकी प्रमाणे वागणं हे भक्तांचं कर्तव्य आहे. दंडाचा वा कमंडलूचा तुकडा घरी ठेवणं त्यांच्या इच्छे विरुद्ध आहे कारण त्यांना त्या गोष्टी आप तत्वाला समर्पित करायच्या होत्या!

एका अध्यात्मिक सद्गुरूचे अनेक शिष्य व अनेक आश्रम होते. त्यांच्या एका जेष्ठ शिष्याकडून एकदां मोठा अपराध घडला. सर्व विचार करू लागले की सद्गुरु याला काय शासन देतात वा प्रायःचित्त करायला सांगतात, पण गुरुजींनी त्याला एका आश्रमाचा व्यवस्थापक बनविला. सर्व विचार करू लागले, की हा कसा न्याय आहे? अपराधाचं शासन म्हणून पदोन्नती? एका शिष्यानें घाबरतच सद्गुरुंकडे विषय काढला तेव्हा ते म्हणाले, अरे! येथे तुम्ही परमेश्वर प्राप्ती साठी येतां. त्यासाठी तप करून प्रथम आपल्या सर्व दोषांचे निवारण केले जाते. त्यानंतरच ईश्वर प्राप्तीचा मार्ग सुरु होतो. या मार्गावर व्यवस्थापक म्हणजे अधिकाराचं स्थान. जागोजागी क्रोध, अहंकार, लोभ, उफाळून येणार, म्हणजे ईश्वर प्राप्ती पासून दूर राहणं. अज्ञानी अवस्थेत या विकारांना दूर ठेवणारा विरळाच. दामाजीपंत, शिवाजी महाराज, जनार्दन स्वामी, सोयरोबा नाथ यांच्यासारख्या थॊर पुरुषांना हे शक्यं झालं. इतर कोणी त्यामार्गाने गेल्यास अधःपतन निश्चित. तेव्हां हे शासनच आहे. ही पदोन्नती नांही! परंतु याचा अर्थ या मार्गाने जात असतां कुणी काही चुकीचं करीत असेल तर चूक त्याच्या निदर्शनास आणणे, तरीही नाही ऐकलं तर त्याला विरोध करणे. परंतु, हे सर्व करतांनां आपल्या मनाचा तोल सतत सांभाळणें हाही साधनेचा एक प्रकारच आहे. परंतु कूणी काही चूक करताना आढळल्यास मूग गिळून गप्प बसणें ह्या सारखा गुन्हा नाही. किंबहुना अन्याया विरुद्ध आवाज न उठवणे भ्याड पणाचें आहे. तसेंच ते सद्गुरुंनी घेतलेल्या परीक्षेपासून पळून जाण्यासारखें भ्याड कृत्य होईल. या सर्व परिस्थितीत अन्याया विरुद्ध आवाज तर उठलाच पाहिजे पण मनाचा तोल ही सुटू नये. हीच खरी ईश्वर प्राप्तीकडे नेणारी साधना! या साधनेच्या काळात सद्गुरूंच अस्तित्व सभोवार जाणवणं हा या साधनेचा खरा आधार होय!

एखादा सद्गुरुंचा भक्त काही अध्यात्मिक कार्य करीत असेल त्या कार्यात मदत करण्याचा अंतरंगातून आवाज आला तर त्या कार्याला तन मन धनाने मदत नक्की करा! त्या वेळी कोणाला विचारत बसू नका लगेच निर्णय घ्या आणि आत्मानंदाचा लाभ घेऊन बघा! सद्गुरु कोणाच्या ऋणात राहत नाहीत. स्वानुभव!

सद्गुरुनाथ महाराज की जय!

— पाध्ये काका, वसई.

पाध्येकाका, वसई
About पाध्येकाका, वसई 10 Articles
वासुदेव शाश्वत अभियान,वसई गेली 24 वर्षे आपणा सर्वांच्या सहकार्याने तसेच सद्गुरुंच्या आशीर्वादाने स्वामी महाराजांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करीत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..