सदैव जागृत रहा

झोप घ्या हो शांत, जागृत राहूनी तुम्ही,
विचित्र वाटे ही रित, परि येई तुमचे कामी …१

विश्रांती लागत असते, गरज म्हणून शरिराला
ती तर मिळत नसते, केव्हांही तुमच्या मनाला ..२

चंचलता हा स्वभाव, आहे आपल्या मनाचा,
शांत करण्या मना, उपाय नसे झोपेचा..३

एकाच दिशेने धावूनी, मिळवते मन विश्रांती
एकाग्र चित्त असणे, उपाय हाच त्यावरती…४

चित्त करूनी एकाग्र, दिशा त्यास या प्रभूसाठीं
मिळेल सारे तुम्हां, जागृत राहण्या पोटीं…५

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 

 



Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1466 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

1 Comment on सदैव जागृत रहा

  1. डॉ. भगवान सर…. 👌
    फारच सुंदर रचना.. साक्षात परमेश्वर सांगतो की, “जागृत रहा”. अगदी साधी पण छान मांडणी केली. नकळत दिलेलं, “💉 इंजेक्शन”. रसिकांना गुण आलाच म्हणुन समजा. बोधपर कविता… 👌

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…