नवीन लेखन...

रिक्षावाला आणि जयललिता

वेळ आज सकाळी १०-१०.३० ची..मी बोरीवली स्टेशनहून वजीर नाक्याकडे जाण्यासाठी रिक्षा पकडली..रिक्षावाला मध्यमवयीन आणि तरतरीत माणूस दिसला..माझ्या नेहेमीच्या सवयीनुसार प्रथम त्याला त्याचे नाव विचारलं..आता कोणालाही कोणालाही नाव विचारलं की बरं वाटतंच, आपणही त्याला अपवाद नाही..विशेष करून ड्रायव्हर, वेटर यांसारख्या नेहेमी गृहीत धरल्या जाणाऱ्या लोकांना तर याचा खूप अप्रूप असत..सर्व्हिस मध्ये नक्की फरक पडतो..प्रयोग करून बघा.!

रिक्षावाल्याने त्याचं नाव आनद नाडर असं सांगितलं..आता थोडसं विषयांतर. बोलण्याच्या पद्धतीवरून मी त्याला साउथ इंडिअन ठरवून मोकळा झालो होतो..महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेल्या सर्वाना आपण ‘मद्राशी’ ठरवून मोकळे होतो.. ते त्यांच्यातील नेमका फरक ओळखता न आल्याने..आपल्यासारखेच ते ही या देशाचेच नागरिक असल्याने त्यांच्या त्यांच्यात प्रचंड भेद, पोटभेद आणि साहजिकच मतभेद आहेत..सरसकट सर्वाना मद्राशी म्हणल्याचा त्यांना राग येतो.

ही सर्व गणितं लक्षात ठेवून त्याला मी तो कुठला ते विचारले..त्यावर त्याने तो तामिळनाडूचा असल्याच सांगितलं..तामिळनाडू म्हटल्यावर मी त्याला ‘सु.श्री.(म्हणजे काय?) जयललिता’ मॅडमची तब्येत कशी आहे ते विचारलं..ती हॉस्पिटलमध्ये असल्याच पेप्रात वाचून मला ठाऊक होत..त्यावर त्याने जे सांगितलं ते आपल्या, म्हणजे माझ्या, मनात येणच शक्य नव्हत..

तो म्हणाला की, ‘साब ये सब पोलिटिकल है..वो दिखती है उताणी बिमार नाही है..पर तामिळनाडू और कर्नाटका मे जो पानी का जगडा चालू है ना, उसकी वजा से ये बिमारी का नाटक चालू है..” मी विचारलं की “ते कसं काय बुवा?”. त्यावर त्याने जे सांगितलं ते मला तरी नवीनच होत..तो म्हणाला, “साब ये जयललिता हमारी मुख्यमंत्री है मगर उसका जनम और सब एज्युकेशन कर्नाटका मे हुवा है. अबी उसके सामने तकलीफ ये है की पानी जगडे मे वो किसकी बाजू से खडी रहे..कर्नाटका और तामिळनाडू दोनो उसके है. इसमे कूच बोलने से बिमार पडना अच्चा है और वो ऐसी बिमार है..उस्का बी बराबर है ”

रिक्षावाल्याच ते बोलण ऐकून जयललिताच्या भावना समजून घेणाऱ्या त्या रीक्षावाल्याबद्दल मला आदर वाटला..त्याहीपेक्षा आदर मला सु.श्री.(परत तेच. म्हणजे काय हो?) जयललिता बद्दल वाटला..कोणताही आणि कोणाचाही पाचपोच न ठेवल्या जाणाऱ्या राजकीय क्षेत्रातील व्यक्ती असूनही तीने लहानपणाच्या आपल्या आठवणी आणि कर्नाटकाबद्दलचा आपुलकी आणि जिव्हाळा अजून जपून ठेवलाय..रिक्षा वाल्याच्या म्हणण्यानुसार कोणाची बाजू घ्यायला लागू नये म्हणून तीने आजारी पडण्याच नाटक केल आणि लोकांचे लक्ष एका ज्वलंत विषयावरून बाजूला वेधून घेतले..कदाचित न्यायालयाच्या भीतीमुळे असेल परंतु तीने कोणाच्याही भावना भडकतील असं विधान केल्याचं मी वाचलं नसल्याच आठवलं..

— गणेश साळुंखे
9321811091
salunkesnitin@gmail.com

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..