नवीन लेखन...

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू जॉर्ज डकवर्थ

जॉर्ज डकवर्थ यांचा जन्म 9 मे 1901 मध्ये इंग्लंडमधील लॅकेशायर येथे झाला. त्यांनी कसोटी क्रिकेट इंग्लंडकडून खेळले तर फर्स्ट क्लास क्रिकेट लॅकेशायर कडून खेळले. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट 1921 ते 1942पर्यंत खेळले. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट हे दोन महायुद्धाच्या मधल्या कालखंडात खेळले. त्या काळात क्रिकेटच्या खेळाडूंना खूप प्रसिद्धी मिळत असे. ते जेव्हा अपील करत असत तेव्हा त्यांचा आवाज हा मोठा होता , अपील करताना ते मोठयाने विशिष्ट शब्द म्हणजे ‘ ऑझ दॅट ‘ हे शब्द बोलत . ह्याचा खरा उच्चार ‘ हाउज दॅट ‘ असे . पुढे तो शब्द खूप पॉप्युलर झाला. त्यामुळे ते अनेकांच्या लक्षात रहात असत. त्याचप्रमाणे त्यांचे अंतःकरण अत्यंत मोकळे आणि विशाल होते. मोठया मनाचे ते गृहस्थ होते. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर जबरदस्त होता.

ते उत्तम यष्टीरक्षक होते. त्याचप्रमाणे अत्यंत कठीण वेळेस ते सावधपणे फलंदाजीची करत असत. त्यावेळी यष्टीरक्षक हा उत्तम यष्टिरक्षक असला पाहिजे असे होते , तो जरा कमजोर फलंदाज असेल तर काही फरक पडत नसे . आजच्यासारखी त्यावेळी स्थिती नव्हती की यष्टरीक्षकावरही फलंदाजीची जबाबदारी असली पाहिजे कारण सलामीचे चार पाच फलंदाज ती धावांची उणीव सहसा भासू देत नसत अर्थात क्रिकेट हा बेभरवशाचा खेळ आहे काहीही होऊ शकते.

ते 1924 पर्यंत इंग्लडसाठी २४ कसोटी सामने खेळले. त्यावेळी त्यांना केंटच्या लेस एम्स यांच्याशी स्पर्धा होती विशेषतः 1930 मध्ये कारण त्यांची फलंदाजी उत्तम होती. लेस एम्स यांनी कसोटी सामन्यात ऐकून 97 जणांना बाद केले तर डकवर्थ यांनी 60 जणांना बाद केलं तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये लेस एम्स यांनी 1121 खेळाडू बाद केले तर डकवर्थ यांनी 1096 खेळाडू बाद केले. दोघांमध्ये स्पर्धा होते परंतु क्वालिटीच्या बाबतीत जॉर्ज डकवर्थही काही कमी नव्हते.
1928 हा त्यांचा बेस्ट सिझन होता त्यांनी त्या सीझनमध्ये एकूण 107 फलंदाज बाद केले त्यामध्ये त्यांनी 77 झेल पकडले आणि 30 जणांना स्टंपिंग करून बाद केले. त्या सीझनमध्ये लॅंकेशायरला तीन चॅम्पिअनशिप्स मिळाल्या. त्यावेळी त्यांचे कप्तान होते लिओनार्ड ग्रीन , ग्रीन त्यावेळेला म्हणाले डकवर्थ हे लहान खेळाडू दिसतात परंतु सर्व क्रिकेटपटूंमध्ये सर्वात जास्त आवाज करतात म्हणजे अपील करतात.

त्यानंतर 1030 आणि 1934 मध्ये लँकेशायरने परत दोनदा चॅम्पिअनशिप जिकल्या. त्यामुळे जॉर्ज डकवर्थ यांच्या लॅंकेशायर टर्ममध्ये म्हणजे त्यांच्या कालखंडात पाच चॅम्पिअनशिप जिंकून देण्याचा सन्मान त्यांना मिळाला. अर्थात यामध्ये त्यांचाही मोठा वाटा होता.

जॉर्ज डकवर्थ यांनी त्यांचा शेवटचा कसोटी सामना 18 ऑगस्ट 1936 रोजी भारताविरुद्ध खेळला . त्यांनी 24 कसोटी सामन्यात 234 धावा केल्या , त्यांची सर्वात जास्त म्हणजे नाबाद 39 धावा केल्या. तसेच यष्टीरक्षक म्हणून 45 झेल पकडले आणि 15 जणांना स्टंपिंग करून बाद केले. परंतु फर्स्ट क्लास क्रिकेटमधील त्यांची कामगिरी मात्र जबरदस्त आहे. त्यांनी 504 फर्स्ट क्लास सामन्यात 4,947 धावा केल्या. त्यामध्ये त्यांनी 6 अर्धशतके केली. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी एका इनिंगमध्ये सर्वात जास्त म्हणजे 75 धावा केल्या. त्याचप्रमाणे 755 जणांना झेल करून बाद केले तर 343 जणांना स्टॅम्पिंग करून बाद केले.

जॉर्ज डकवर्थ यांनी निवृत्तीनंतर क्रिडा पत्रकार म्हणून काम केले आणि ब्रॉडकास्टर म्हणून क्रिकेट आणि रग्बीसाठी काम केले. त्याचप्रमाणे त्यांनी टूर ऑर्गनाइजर आणि बॅगेज मास्टर म्हणूनही काम केले तसेच एम.सी . सी. च्या टूरवर असताना स्कोरर म्हणून काम केले.

जॉर्ज डकवर्थ यांचे सगळेच वेगळे होते त्यांनी त्यांच्या गावी शेंगदाण्याच्या आकाराचे मोठे घर बांधले त्यांच्यानंतर त्या घराला त्यांचे नाव दिले. त्यांचा पुतण्या जॅक डकवर्थ वॉरिग्टन साठी रग्बी लीग खेळत असे.

जॉर्ज डकवर्थ यांचे 5 जानेवारी 1966मध्ये वयाच्या 64 व्या वर्षी लॅंकेशायर , इंग्लंड येथे निधन झाले.

– सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..