नवीन लेखन...

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ब्रायन लारा

ब्रायन चार्ल्स लारा याचा जन्म २ मे १९६९ त्रिनिनाद येथे झाला. वयाच्या सहाव्या वर्षी त्याच्या वडिलांनी आणि बहिणीने त्याला हारवर्ड कोचिंग क्लीनिक मध्ये दर रविवारी घेऊन जात असत. त्यामुळे त्याला लहान वयातच अत्यंत अचूक पद्धतीचे क्रिकेट कोचिंग मिळाले. वयाच्या १४ व्या वर्षी लाराने शाळेच्या लीगमध्ये ऐकून ७४५ धावा केल्या होत्या १२६.१६ या सरासरीने प्रत्येक इनिंगला . मला आठवतंय त्यावेळच्या लाराच्या बॅटिंगची चित्रफीत मला एका पार्टीच्या निमित्ताने बघायला मिळाली आणि माझ्या बाजूच्या टेबलवर स्वतः ब्रायन लारा ती चित्रफीत पहात होता त्यावेळी आजूबाजूला क्लाइव्ह लॉईड , इयान चॅपेल , सुनील गावस्करा असे अनेक देशाचे टॉप क्रिकेट स्टार्स होते. ते सर्व पहाताना प्रत्येकाची नजर कधी लारावर तर कधी स्क्रीनवर जात होती आणि तो मस्त पैकी ड्रिंक्स एन्जॉय करत होता. तसे तर लाराबद्दल खूप आठवणी माझ्याकडे आहेत .

ब्रायन लारा वयाच्या १५ व्या वर्षी वेस्ट इंडिजकडून अंडर-१९ क्रिकेट खेळला. ब्रायन लारा त्याचा पहिला फर्स्ट क्लास क्रिकेट सामना खेळला तो लिवॉर्ड आयर्लंड विरुद्ध . दुसरा फर्स्ट क्लास सामना खेळला तो बार्बाराडोस विरुद्ध त्यावेळी बार्बाराडोसकडून गोलंदाजी करत होते वेस्ट इंडिजचे ‘ बाप ‘ गोलंदाज जोएल गिरनार आणि माल्कम मार्शल.

जेव्हा ब्रायन लाराची वेस्ट इंडिजच्या संघासाठी निवड झाली परंतु त्यावेळी त्याच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्याचे कसोटी सामन्यामधील खेळणे पुढे ढकलले गेले. १९८९ मध्ये तो वेस्ट इंडिजच्या ‘ बी ‘ टीमचा कप्तान झाला. त्यावेळी त्याने झिबावे विरुद्ध १४५ धावा काढल्या. वयाच्या २० व्या वर्षी तो त्रिनिनाद आणि टोबॅगो चा सर्वात तरुण कप्तान झाला आणि ह्याच वर्षी त्याने कसोटीमधील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध खेळला त्यामध्ये त्याने ४४ आणि पाच धावा केल्या. त्याचवर्षी त्याने पाकिस्तानविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.

१९९३ मध्ये लाराने २७७ धावा ऑस्ट्रलियाविरुद्ध सिडने येथे केल्या. त्याची आठवण म्हणून त्याच्या मुलीचे नाव ‘सिडने’असे ठेवले. लाराने खूप रेकॉर्डस् केले, १९९४ मध्ये वॉर्कशायर विरुद्ध फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये नाबाद ५०१ धावा केल्या. ह्या नाबाद धावा त्याने ४७४ मिनिटामध्ये ४२७ चेंडूंमध्ये केल्या. या धावा लाराने ६२ चौकार आणि १० षट्काराच्या सहाय्याने केल्या. तर १९९४ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३७५ धावा केल्या. पुढे हा ३७५ चा रेकॉर्ड २००३ रोजी म्यॅथु हेडनने २००३ साली झिम्बावे विरुद्ध ३८० धावा काढून मोडला. ब्रायन लारा १९९८ ते १९९९ वेस्ट इंडिजचा कप्तान होता. ज्या वेळी लारा कप्तान होता त्या आधीच वेस्ट इंडिजला दक्षिण आफ्रिकेने ‘व्हाईटवॉश ‘ दिलेला होता. जेव्हा लारा कप्तान झाला वेस्ट इंडिजने ती सिरीज २-२ ने राखली. त्यावेळी ब्रायन लाराने त्या सिरीजमध्ये तीन शतके आणि एक डबल शतक काढून ५४६ धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये किंग्स्टनमध्ये २१३ धावा केल्या होत्या आणि तिसऱ्या कसोटीमध्ये नाबाद १५३ धावा केल्या. वेस्ट इंडिजने त्यावेळी ३११ धावा ‘ चेस ‘ केल्या होत्या आणि एक विकेट बाकी होती. त्यावेळी ब्रायन लारा मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज ठरला होता.

त्यानंतर ब्रायन लारा २००३ साली परत कप्तान झाला . त्याने पहिल्या कसोटीमध्ये ११० धावा केल्या तो कप्तान असताना वेस्ट इंडिजने दोन कसोटी सामने जिंकले. त्यानंतर वेस्ट इंडिजने श्रीलंकेविरुद्धची दोन कसोटी सामन्याची सीरिज १-० ने जिकली. त्यावेळी लाराने पहिल्या कसोटीमध्ये द्विशतक केले.

त्यानंतर ब्रायन लाराने २००४ साली म्यॅथु हेडनने केलेला रेकॉर्ड लाराने इंग्लंडविरुद्ध नाबाद ४०० धावा काढून मोडला. सर डॉन ब्रॅडमन नंतर ट्रिपल शतके करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. विझडेनच्या १०० रेट्स मध्ये ब्रायन लाराने ज्या १९९८-९९ मध्ये केलेल्या नाबाद १५३ धावा ही लाराची इनिंग सर डॉन ब्रॅडमन च्या इंग्लंडच्या विरुद्ध केलेल्या मेलबोर्नच्या १९३६-३७ नंतरच्या इनिंगनंतर श्रेष्ठ ठरली.

२००६ साली ब्रायन लारा परत वेस्ट इंडिजचा कप्तान झाला. १६ डिसेंबर २००६ साली तो वेस्ट इंडिजचा एकदिवसीय सामन्यांमध्ये १०,००० धावांचा आकडा ओलांडणारा पहिला खेळाडू ठरला. ब्रायन लारा शेवटचा कसोटी सामना २७ नोव्हेंबर २००६ रोजी शेवटचा कसोटी सामना खेळला.

ब्रायन लाराने १३१ कसोटी सामन्यामध्ये ११,९५३ धावा ५२.८८ सरासरीने केल्या त्यामध्ये ३४ शतके आणि ४८ अर्धशतके होती तर त्याची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद ४०. लाराने २९९ एकदिवसीय सामन्यामध्ये ४०.४८ सरासरीने १०, ४०५ धावा केल्या. त्यामध्ये १९ शतके आणि ६३ अर्धशतके होती. त्याची सर्वोच्च धावसंख्या होती १६९. ब्रायन लाराने २६१ फर्स्ट क्लास सामन्यामधून ५१.८८ सरासरीने २२, १५६ धावा केल्या त्यामध्ये ६५ शतके आणि ८८ अर्धशतके होती तर त्याची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद ५०१ धावा . ब्रायन लाराची ही आकडेवारी थक्क करणारी आहे जी आपल्या सचिन तेंडुलकरच पार करू शकला . कारण सरासरीने सचिन तेंडुलकरच ब्रायन लाराच्या पुढे आहे.

ब्रायन लाराने मला दोन बॅटवर त्याचे ‘ ३७५ ‘ आणि ‘ ४०० ‘ धावा स्वाक्षरी करून दिल्या आहेत तर सचिन तेंडुलकरने जेव्हा ब्रायन लाराचा ११,९५३ जेव्हा मोडला तेव्हा बॅटवर तो रेकॉर्डचा आकडा ‘ स्टार ‘ काढून बॅटवर स्वाक्षरी करून दिला आहे . सुदैवाने मला लारा-सचिनचा खेळ अनेक वेळा प्रत्यक्ष बघायला मिळाला .

ब्रायन लाराला बघीतले तर तो इतर वेस्ट इंडिजच्या इतर खेळाडूच्या मानाने कमी धिप्पाड असेल परंतु त्याचे मनगटामधील स्किल जबरदस्त होते, त्याचे स्ट्रोक्स जबरदस्त होते.

सचिन तेंडुलकर श्रेष्ठ की ब्रायन लारा श्रेष्ठ असे नेहमी विचारले जाते तर एकच उत्तर दयावे लागेल दोघेही श्रेष्ठच आहेत.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..