नवीन लेखन...

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू किथ मिलर

किथ रॉस मिलर यांचा जन्म २८ नोव्हेंबर १९१९ रोजी सनशाईन , व्हिक्टोरिया , ऑस्ट्रलियामध्ये झाला.

त्यांचे वडील यशस्वी स्थानिक क्रिकेटपटू होते . ते त्यांच्या मुलांना ऑर्थडॉक्स आणि उत्तम तंत्राने क्रिकेटचे धडे देत असत. किथ मिलर वयाच्या सातव्या वर्षी त्यांचा कुटुंबासह एस्टर्नवीक येथे रहाण्यास गेले. हे मेलबोर्नच्या दक्षिणेकडे आहे.

मिलर वयाच्या १२ वयाचं वर्षी अंडर-१५ चा शाळेच्या संघातून खेळू लागले. त्यावेळी त्यांची उंची जेमतेम ४ फूट ९ इंच होती. तशी त्यांच्या अंगात मोठी बॅट घेऊन मोठे फटके मारण्याची ताकद नव्हती परंतु त्यांचे फुटवर्क आणि खेळण्याची स्टाईल अत्यंत आकर्षक होती. त्याचप्रमाणे त्यांना क्रिकेटर किंवा फुटबॉल खेळाडूपेक्षा जॉकी होण्याचीदेखील इच्छा निर्माण झाली होती. त्यांनी तसा प्रयत्नही केला होता. मिलर ज्या मेलबॉर्न हायस्कुलमध्ये शिकत होते त्याच शाळेमध्ये त्यांना ऑस्ट्रलियाचे कसोटी क्रिकेट कप्तान बिल वुडफूल हे गणित शिकवायला होते. मिलर यांना गणित विषयामध्ये फारसी रुची नव्हती त्यामुळे वुडफूल नाराज होते , परंतु थोड्या कालावधीमध्येच वुडफूल यांना मिलर यांचे क्रिकेटमधील स्किल लक्षात आले. वयाच्या १४ व्या वर्षी मिलर शाळेच्या टीममध्ये खेळू लागले आणि त्यांनी ४४ धावा केल्या. त्यांचा खेळामधला संयम आणि तत्परता पाहून त्यांना ‘ अनबॉलेबल ‘ हे वुडफूल यांचे ‘ टोपणनाव ‘ प्रेक्षक मिलर यांच्यासाठी वापरू लागले.

१९३४ मध्ये मिलर नापास झाले , वुडफूल यांच्या भूमिती विषयामध्ये शून्य गुण मिळाले आणि त्यांना परत दुसऱ्या वर्षी त्याच वर्गात बसवण्यात आले. त्यांच्या शाळेच्या टीमचा कप्तान त्यांना एक लोकल क्लबमध्ये घेऊन गेला आणि १९३४-३५ च्या मोसमासाठी , परंतु मिलर यांना तेथील पाचही टीममध्ये स्थान मिळाले नाही. त्यामुळे ते लोकल सब-डिस्ट्रिक्ट क्लबमध्येगेले परंतु तेथेही पहिल्या सामन्यांमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी मिळाली नाही मग ते दुसऱ्या स्कुल ११ च्या सामन्यामध्ये त्यांच्या असमाधानकारक क्षेत्रक्षणामुळे त्यांना ‘ ड्रॉप ‘ केले गेले. साऊथ मेलबर्नमध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाचे भावी कप्तान इयान जॉन्सन आणि लिंडसे हास्सेट्ट भेटले. पहिल्याच सामन्यांमध्ये मिलर यांनी नाबाद १२ धावा काढल्या. परंतु तेथे जे निरीक्षक होते त्यांच्या लक्षात आले की मिलर यांच्या दणकटपणामुळे त्यांना पुढे यश मिळेल. १९३६ साली वुडफूल यांनी शाळेच्या मासिकामध्ये त्यांनी लिहिले होते , ‘ भविष्यात मिलर कसोटी सामने खेळण्याची शक्यता आहे .’

१९३६ मध्ये मिलरने साऊथ मेलबोर्नकडून खेळताना कार्लटनच्या विरुद्ध ३२ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या. फलंदाजीमध्येही त्यांनी ऐकूण १४१ धावांमध्ये ६१ धावा केल्या .

दुसऱ्या महायुद्धामुळे मिलरचे क्रिकेट खेळणे होऊ शकले नाही कारण २० ऑगस्ट १९४० रोजी त्यांनी आर्मी सर्व्हिसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर १९४०-४१ च्या दरम्यान त्यांना थोडी सुट्टी मिळाली तेव्हा त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटचा पहिला सामना खेळला त्यामध्ये त्यांनी २८ च्या सरासरीने १४० धावा केल्या आणि पहिली विकेट घेतली. ते फ़ुटबाँलही उत्तम खेळात असत. पुढच्या फुटबॉल सीझनमध्ये त्यांनी १६ गेम्स मध्ये २८ गोल केले तर एक गेममध्ये ८ गोल केले. पुढे १९४२ मध्ये ते एक फुटबॉल सामना खेळले तेव्हा त्यांची पोस्टिंग साऊथ ऑस्ट्रेलियामध्ये होती. त्याचवर्षी डिसेंबर मध्ये त्यांना प्रमोशन मिळाले आणि ते फ्लाईट सार्जंट झाले.

युद्धाच्या शेवटी १९४५ मधील क्रिकेट सीझनमध्ये ते लॉर्ड्सला राफा विरुद्ध ब्रिटिश एम्पायर ११ हा सामना खेळले त्यामध्ये त्यांनी ५० धावा राफा साठी केल्या. त्यांची ही टूर चांगली चालली , त्यांनी ऑकलंडविरुद्ध त्यांनी १३९ धावा केल्या. त्यांचे क्रिकेट सामने चालूच होते परंतु त्यांनी पहिला कसोटी सामना खेळाला तो २९ मार्च १९४६ रोजी न्यूझीलंड विरुद्ध. त्यावेळी त्यांचा कप्तान होता क्वीन्सलँडचा बिली ब्राऊन . त्या कसोटीमध्ये मिलर यांनी ३० धावा केल्या होत्या. दुसऱ्या इनिंगला त्यांनी नवीन चेंडू टाकण्यासाठी घेतला . त्यांनी सहा षटके टाकली त्या सहा षटकांमध्ये त्यांनी ६ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या. परंतु त्यांची पाठ दुखावयास लागल्यामुळे त्यांना खेळातून माघार घ्यावी लागली . १९५०-५१ मध्ये ते ऑस्ट्रेलियामध्ये झालेले अँशेस सामने खेळले. किथ मिलर यांनी शेवटचा कसोटी सामना ११ ऑक्टोबर १९५६ रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला .

किथ मिलर यांनी ५५ कसोटी सामन्यांमध्ये २९५८ धावा केल्या त्या ३६.९७ या सरासरीने . त्यामध्ये त्यांची ७ शतके आणि १३ अर्धशतके होती. त्यांची कसोटी सामन्यामधील सर्वोच्च धावसंख्या होती १४७. त्याचप्रमाणे त्यांनी २२.९७ या सरासरीने १७० विकेट्स घेतल्या. त्यांनी एका इनिंगमध्ये ६० धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या आणि ३८ झेलही पडले. युद्ध आणि त्यांची आर्मी मधील नोकरी यामुळे त्यांना कमी कसोटी सामने खेळावयास मिळाले परंतु त्यांनी २२६ फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये १४,१८३ धावा केल्या त्या ४८.९० या सरासरीने . त्यामध्ये त्यांची ४१ शतके आणि ६३ अर्धशतके होती. त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद २८१ धावा . त्यांनी २२.३० या सरासरीने ४९७ विकेट्स घेतल्या आणि एका इनिंगमध्ये फक्त १२ धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या. तसेच १३६ झेलही पकडले.

निवृत्तीनंतर ते पत्रकार झाले त्याचप्रमाणे ते ‘ डेली एक्सप्रेस ‘ मध्ये क्रिकेटवर २० वर्षे लिहीत होते.

किथ मिलर यांचे ११ ऑक्टोबर २००४ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये निधन झाले.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..