नवीन लेखन...

ऐन तारुण्यात हार्ट अटॅक येण्याची कारणे

बऱ्याच वेळेला पेपरचं पान उघडलं की कोणाच्या तरी अचानक मृत्यूची बातमी आपलं लक्ष वेधून घेते. इतक्या लहान वयात असं कसं झालं? नुकतंच लग्न झालं होतं. लहान मुलं देखील आहेत, आता त्यांचं कसं होणार? यासारख्या विचारांनी त्याच्या कुटुंबियांबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनात एक सहानुभूतीची भावना निर्माण होते. त्याच्या जागी आपणही असू शकतो या जाणिवेने एक थंड शिरशिरी डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला अक्षरशः थिजवून जाते. एखाद्या दिवशी ऑफिसला गेल्यानंतर घरी परत येऊ का? असा अपशकुनी विचारही मनात येऊन जातो. नेमका काय हा प्रकार आहे?

Image result for हार्ट अटॅक येण्याची कारणे

उच्च रक्तदाब, मधुमेह, हाडांचे किंवा सांध्यांचे रोग आणि हृदय विकार हे वास्तविक पन्नाशीच्या आसपासचे किंवा त्यानंतरचे आजार समजले जायचे. आता मात्र हे चित्र हळूहळू पालटताना दिसतंय. या आजारांना ठराविक असं काही ‘एज फॅक्टर’ राहिलेलं नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार  उच्च रक्तदाब आणि हृदयविकार 1950 मध्ये बी.पी.च्या रुग्णांचं प्रमाण 1-3 टक्के इतकं होतं, तर आता ते 10-31 टक्क्यांवर पोहचलं आहे. याच बरोबर १९६० च्या दशकामध्ये हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या 4 टक्के होती, आता ती  तब्बल 11 टक्के आहे. त्यामध्येही 30-40 वय असलेल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

1990 मध्ये 24 टक्के मृत्यु हे हृदय विकारामुळे होत होते. परंतु 2020 पर्यंत भारतामध्ये याचे प्रमाण 40 टक्के इतके होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही वर्षांपूर्वी हृदय विकार वयोवृद्ध व्यक्तींना होत होता परंतु, आजकाल हा आजार युवा पिढीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्याचे गंभीर चित्र बघण्यास मिळत आहे. या सर्वांबरोबरच तरुणांमधील वाढत्या हार्ट अ‍ॅटॅकच सर्वात महत्त्वाचं आणि सर्वभूत कारण म्हणजे, आपली बदलती लाईफस्टाईल आणि बदललेली मानसिकता.

1) धकाधकीच्या आणि घाईगडबडीच्या जीवन शैलीमुळे सतत मनावर, हृदयावर एक प्रकारचा ताण घेऊन आपण वावरत असतो. हा ताण हे दडपण अनेकदा उच्च रक्तदाब आणि पुढे जाऊन हार्ट अ‍ॅटॅकला कारणीभूत ठरू शकतो.

2) सिगरेटचा धूर उडवणे आज युवकांमध्ये फॅशन ट्रेंड बनले आहे. सिगरेट आणि तंबाकूमुळे हृदयातील धमन्या लहान होण्यास सुरुवात होते आणि रक्ताचा प्रवाह कमी होतो. अतिमद्यपानामुळे शरीरातील इतर अवयवांवर होणारे अनिष्ट परिणाम व व्यसनाधीनतेची शक्यता लक्षात घेता दररोज मद्यपान न करणे हेच बरे. मद्यपानानंतर स्निग्ध आहार व मांसाहार जास्त प्रमाणात केला जातो. त्यामुळे लठ्ठपणा उत्पन्न होऊ शकतो.

3) फास्ट फूड, जंक फूड आणि अती चरबीयुक्त आहारामुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये अतिरिक्त चरबीचा साठा होऊन हार्ट अ‍ॅटॅक येऊ शकतो. ज्या व्यक्ती आहारामध्ये अति फॅट, अंडे अ आणि मांसाहार करतात अशा व्यक्तींना इतर व्यक्तींपेक्षा ह्रदय विकाराचा झटका येण्याची भिती 35 टक्के अधिक असते. याशिवाय अनहेल्दी लाइफस्टाइल, ताण आणि व्यायामाची सवय नसल्याने देखील हा आजार होऊ शकतो.

4) हार्ट अटॅक येण्याआधी हलके अपचन आणि मळमळ होण्याच्या लक्षणांना दूर्लक्षीत केले जाते. हार्ट अटॅक येण्याची समस्‍या साधारणपणे मोठ्या व्यक्तींमध्ये बघण्यास मिळते. मोठ्या व्यक्तींमध्ये अपचन होण्याचा त्रास जास्त असतो. पोटात दुखणे, अपचन, उल्‍टी हे लक्षणे हार्ट अटॅकची असू शकतात. अशावेळेस आपण नेहमीच आपल्या खाण्यापिण्याकडे रोजच्यारोज लक्ष्य दिले पाहिजे.

5) जी माणसे स्वभावाने  अत्यंत उतावळी, अती महत्वाकांक्षी, जास्तीत जास्त गोष्टी मिळविण्यासाठी आसुसलेली, तसेच कुठल्याही नकारात्मक गोष्टींनी लवकर चिडणारी व रागावणारी असतात त्यांना हृदयविकार होण्याचा धोका अधिक असतो. हृदयविकार झालेल्यांनी मानसिक तणावापासून दूर राहणे खूपच गरजेचे आहे. बरेचदा आपण आपल्या रोजच्या जीवनात त्रासदायक गोष्टी टाळू शकत नाही; पण अशा गोष्टींमुळे मानसिक संतुलन बिघडू न देणे हे मात्र आपल्या हातात नक्कीच आहे.

हार्ट अटॅक एक मोठा आजार असून जो कुठली चाहूल न देता अचानक पुढे उभा राहतो. काही जणांना येणारा हार्ट अटॅक हा कमी तीव्रतेचा असतो तर ब-याच वेळी या आजाराने तुमचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. आज ब-याच जणांना हार्ट अटॅक येणाची पूर्व लक्षणे माहित नाही. तर, ब-याच जणांना माहिती असून देखील ते या गंभीर समस्येकडे दूर्लक्ष करतात. एका नव्या शोधानुसार हार्ट अटॅक येण्याची लक्षणे साधारण एक महिना आधीपासून दिसण्यास सुरुवात होते. म्हणूनच आपण ह्याकडे जाणीवपूर्वक लक्ष्य दिले पाहिजे.

Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..