नाम घेण्याची वृत्ती दे

सतत नाम घेण्यासाठीं,  बुद्धी दे रे मजला

आठवण तुझी ठेवण्याची,  वृत्ती दे रे मनाला ……।।धृ।।

श्वासात प्राण म्हणूनी,  अस्तित्व तुझेच जाणी

श्वास घेण्याची शक्ती,  तुझ्याचमुळे असती

जीवनातील चैतन्य,  तुजमुळेच मिळते सर्वांना…..१

सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला

 

अन्नामधले जीवन सत्व,  तूच ते महान तत्व

सुंदर अशी सृष्टी,  बघण्या ते दिली दृष्टी

आस्वाद घेण्या जगताचा,  जागृत ठेवी भावनेला…२

सतत नाम घेण्यासाठी,  बुद्धी दे रे मजला

 

निनादाच्या लहरी,  तन्मयतेने श्रवण करी

आभार मान्यता मति,  परि शब्दही कमी पडती

जगणेच कठीण वाटते,  क्षणभर तुजविण कुणाला…३

सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला

 

जाणून तव उपकार,  मानावे सदैव आभार

ही भावना येते मनी,  जावे तुझ्यात समावूनी

रोम रोमातूनी माझ्या,  नामाच्या दे गतिला….४

सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1528 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…