राधे..

राधे, आठवाचे आसु
कागं डोळ्याशी झरती
त्या दुष्ट कान्ह्यासाठी
साऱ्या गोपिका झुरती

त्याची निराळी विरक्ती
सारी आगळीच तऱ्हा
तुझी सय का न येई
का तो गोपिकांचा सारा?

का गं राधे तो माधव
क्रूर स्मितातून हासे
तुझ्या डोळ्यात आसवं
त्याच्या विरहाचे ठसे

सांग त्याला का न येई
कधी कधी तुझी सय
का न तुझिया डोळ्यांचा
कधी तो न घेई ठाव

कधी सांग तो रडला
तु ना दिसली म्हणून
का कधी न हसला
कळी खुलली म्हणून

राधे सांग आता तरी
कसे एकरूप दोघे
एका एकाचे बोलणे
का ग सांगणे न लगे

डोळे मिटता का होई
सांग त्याचेच दर्शन
एक इथे एक तिथे
कसे दोघांचे मिलन

— विशाखा विकास कुलकर्णी

About विशाखा विकास कुलकर्णी 1 Article
मी बायोटेक या विषयात मास्टर्स करत आहे. पण तरी वाचनाचे प्रचंड वेद आणि लिखाणाची आवड यामुळे कादंबरी या नावाने फेसबुकवर लिखाण सुरु केले, हळूहळू ते वाढवत नेले आणि आता लोकप्रभा या साप्ताहिकात लिखाण करते. स्वान्तसुखाय लेख, कथा, कविता लिहायला आवडते. विविध विषयांवर खासकरून तरुणाई साहित्याशी संबंधित लिखाण आवडते. पुस्तक परिचय सुद्धा लिहायला आवडतो.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…