नवीन लेखन...

क्वांटम कॉम्प्युटर

क्वांटम कॉम्प्युटर हा अशा प्रकारचा संगणक असतो ज्यात क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे पुंज यांत्रिकीचा थेट वापर केलेला असतो. सुपरपोझिशन व एन्टँगलमेंट अशी दोन तत्त्वे वापरून त्यात माहितीचे संस्करण केले जाते. क्वांटम गुणधर्मांचा वापर करून डेटाचे रूपांतर केले जाते.

क्वांटम ट्यूरिंग मशिन हे या संगणकाचे सैद्धांतिक प्रारूप आहे. क्वांटम कॉम्प्युटिंग हे तंत्र अजूनही बाल्यावस्थेत आहे. अतिशय छोट्या अशा क्विबिटस (क्वांटम बीटस) चा वापर यात केलेला असतो. मोठ्या प्रमाणात क्वांटम कॉम्प्युटर्स तयार करता आले तर ते जटील प्रश्न आताच्या संगणकापेक्षा वेगाने सोडवू शकतील.

यात क्वांटम याचा अर्थ काही मूलकण असा होतो. ते एकाच वेळी अनेक अवस्थेत राहू शकतात, त्यामुळे कुठलेही क्वांटम स्वीच हे एकाचवेळी कितीही किमती धारण करू शकते, म्हणून क्वांटम संगणक वेगवान असतो. क्वांटम संगणकात बिटची किंमत १ किंवा अशी नसते तर ती या दोहोंचा समुच्चय किंवा कितीही असू शकते. त्याला क्विबिट असे म्हणतात. दहा बिट्सवर चालणाऱ्या साध्या संगणकात १०२४ अवस्था असतात, पण एका क्षणी तो एकाच अवस्थेत असू शकतो.

क्वांटम संगणकात या १०२४ अवस्था एकाचवेळी कार्यरत राहू शकतात. क्वांटम संगणक फार नाजूक असतो, कारण क्वांटम स्वीच एकाचवेळी अनेक अवस्थेत ठेवण्यासाठी त्याच्यावर कशाचा परिणाम होऊन चालत नाही. त्यावर हवा लागून किंवा प्रकाश पडून चालत नाही त्यामुळे उणे २७३ अंश सेल्सियस तापमानाला तो निर्वात परिस्थितीत ठेवावा लागतो.

३०० क्विबिटच्या संगणकात १० चा ९० वा घात इतक्या अवस्था असू शकतात. संगणनाचा वेग वाढवण्याची माणसाची तहान मोठी आहे त्यामुळेच मूरच्या नियमानुसार सूक्ष्म संस्कारकातील ट्रान्सिझस्टर्सची संख्या दर १८ महिन्याला दुप्पट होत आहे. याला पर्याय म्हणजे क्वांटम संगणक हा आहे. त्यात अणूरेणूंच्या शक्तीचा वापर स्मृती व माहिती प्रक्रियेसाठी केला जातो.

१९८१ मध्ये अरगॉन नॅशनल लॅबोरेटरीचे पॉल बेनिऑफ यांनी क्वांटम कॉम्प्युटिंगची संकल्पना प्रथम मांडली. त्यापूर्वी अॅलन ट्युरिंग यांनी संगणन यंत्र तयार केले होते, त्याच धर्तीवर नंतर क्वांटम ट्युरिंग मशिन तयार करण्यात आले होते. २००७ मध्ये कॅनडात १६ क्विबिटचा क्वांटम कॉम्प्युटर तयार करण्यात आला. जेवढे जास्त क्विबिट तेवढे संगणक जास्त वेगाने गणिती क्रिया करू शकतो. यात शोरच्या अलगॉरिथमचा वापर केलेला असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..