नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग पंचवीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक सहा

पोटात खड्डा पडावा – भाग तीन

पाण्याला गती असते ती वरून खालच्या दिशेत. पाणी म्हणजे सगळे द्रव पदार्थ. पंप लावल्या शिवाय किंवा कोणते यंत्र लावल्याशिवाय जलमहाभूत उर्ध्व दिशेत काम करीत नाही.

हीच पाण्याची गती शरीरात अन्नाला पुढे सरकवायला मदत करीत असते. जेवताना पाणी पिणे यासाठी फायदेशीर ठरते. पाण्याचा / जलमहाभूताचा आणखी एक गुण म्हणजे सखल जागी हे पाणी खेचले जाते.

समजा आपल्या घराच्या सभोवती पाणीच पाणी साठलेले असेल, तर त्याचा परिणाम म्हणून घरामधे ओल येते, जी आपल्याला त्रास देते. ही ओल नको असेल तर काय करावे लागेल ?

घराबाहेर जमलेल्या पाण्याचा लवकरात लवकर निचरा करणे. यासाठी जिथे खोलगट भाग आहे तिथून या पाण्याला मार्ग तयार करून द्यावा. पाणी शांतपणे तिथून निघून जाईल. जिथे उंचवटा येईल, तिथे पुनः ते अडकून अवरोध निर्माण करेल. तिथे पुनः मार्ग मोकळा करून द्यावा. असं करत करत रस्त्यावरील मुख्य गटारापर्यंत हे पाणी ढकलावे लागेल. एकदा का हे पाणी मुख्य गटारात गेले की आपले काम संपले.

तस्संच शरीरात होतं. आपण हे ओळखून त्या अतिरिक्त पाण्याला मुख्य स्रोतसात आणण्यासाठी मदत करायची की झाले.

मुख्य स्रोतस म्हणजे मुखापासून गुदापर्यंत ! ही एकच पोकळी आहे. आकाश महाभूत. यामधे नैसर्गिकरीत्या काही जलमहाभूत पाझरत असते. साहाजिकच त्याची गती अधोगती असते. वरून खाली असा हा प्रवाह असतो. या आकाश महाभूतात्मक आतड्यांमधे आपण खाल्लेल्या पृथ्वी महाभूतात्मक अन्नातील चिकटून राहीलेला काही भाग तिथे असलेल्या अतिरिक्त जलमहाभूतामुळे अवरोध निर्माण करतो. तिथेच चिकटलेल्या मळाला मागाहून येणारे चांगले अन्न पाणी चिकटत जाते.

वायु महाभूतामुळे आतड्यांची योग्य हालचाल जर होत असेल तर यातील जल महाभूत अडचणीतून, अडथळ्यातून वाट काढत पुढे पुढे जात रहाते.

पाण्याचा निचरा वृक्कावाटे केला जातो, तर घन भाग मलावाटे शरीराबाहेर टाकला जातो. या दोघांचेही मार्ग वेगवेगळे आहेत, हे लक्षात ठेवावे. उगाचच जास्ती पाणी पिऊन ते काही मलावाटे जात नाही. ते किडनीतूनच बाहेर काढले जाईल.

शरीराची गरज नसताना अधिक पाणी घेतले तर आतमधे नुसता चिखल होईल. आणि या रबडा झालेल्या चिखलातून पुनः पाणी वेगळे करून ते मूत्रावाटे बाहेर काढणे, हे आणखी कठीण काम होऊन बसते.

यासाठी हेच लक्षात ठेवावे, पाण्याला शरीराबाहेर पडून जाण्यासाठी जे नैसर्गिक उतार किंवा सखल भाग हवा, तो करून द्यावा. कपालभाती, नौली, नमनमुद्रा, मंडुकासन, शशांकासन, सूर्यनमस्कार, पवनमुक्तासन, बटरफ्लाय, यासारख्या आसनांनी, यौगिक क्रियांनी आतड्यातील आमाचे अडथळे दूर होत जातात, खड्डे पडत जातात, अतिरिक्त पाण्याला पुढे जायला योग्य रस्ता करून दिला जातो.

आमरूपी चिखलातून पाणी वेगळे करीत गेलो, की पचन सुधारतेच ! पचन म्हणजेच अग्नि.
शुद्ध तेजमहाभूत !!!

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
05.05.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..