नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग चौवीस – अ

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक सहा

पोटात खड्डा पडावा – भाग दोन

खड्ड्यात पाणी आपोआप ओढले जाते.
पण केव्हा ?
जर तो खड्डा रिकामा असेल तरच ! जर तो पाण्याने भरलेला असेल तर ? पाण्याने तुडुंब भरलेल्या खड्ड्यात आणखी पाणी कसे ओढून घेतले जाईल ?

अगदी तसेच पोटाचेही होते. सकाळी उठल्यापासून जी काही खायला सुरवात होते, ती रात्री झोपेपर्यंत ! अगदी ओव्हरफ्लो. अगदी पुलंचा अतिशोयोक्ती अलंकार वापरायचा झाला तर…..
……एवढे श्रीखंड हाणले की, “नको आता. पुरेऽऽ” एवढे शब्दही त्याच्या तोंडून उच्चारवेनात. त्याच्या घशात बोट घातले असते तर, बोटाला पोटातले श्रीखंड लागले असते…….इथे पोटात खड्डा कुठचा ? मिठी नदीचा जणुकाही महापूरच लोटतो.

अतिशोयोक्ती सोडून देऊया, पण अगदी आकंठ जेवल्यावर जी सुस्ती येते, ते सुख पुढे जाऊन, दुःखाचे कारण बनणारे असते.

बरं त्यानंतर काही किरकोळ काम करावे, त्याने पोट थोडे फार हलेल, तर तेही नाही. एवढे टम्म जेवल्यावर पोट हलायची बातच नाही. अंथरूण पसरून, पांघरुण घेऊन, पाय ताणून दिले, की पोटात पचनासाठी आलेल्या भगवान विष्णुंनी करायचे तरी काय ?
( संदर्भ – अहं वैश्वानरोभूत्वाम्…..पचाम्यति चतुर्विधम )
ते बिचारे ताटकळत वाट बघताहेत, “आता याची कुस बदलेल, मग तिथल्या कुशीखाली दबले गेलेले अन्न, मला पचनासाठी घेता येईल”.
पण कुठचे काय ! दोन तास झाले तरी, पोट हलायची बातच नाय. खड्डा कसा पडणार ? बिचारे भगवान वाट बघून निघूनही जातात. मग काय होणार ?
बरं असं एखादा दिवस झाले तर ठीकाय, पण असं दररोज व्हायला लागलं तर काय करणार ?

दरवाज्याला कुलुप बघून भांडी कामवाली बाई जशी परत निघून जाते, आणि दुसऱ्या दिवशी आपल्या नेहेमीच्या वेळेवर परत येते, तोपर्यंत बाथरूममधल्या, तसेच पाणी खात पडलेल्या भांड्यांमधे पुनः रात्रौची भांडी अस्ताव्यस्त अडकून पडलेली असतात., ‘तिची’ वाट बघत ! बाथरूममधे अगदी पाय टाकायला पण जागा उरलेली नसते.

तसंच पोटातल्या अन्नाचं होतं. वेळेत पचन झालं नाही. जर हा खड्डा तयार झाला नाही तर काय होणार ? हा खड्डा, ही रिकामी जागा तयार होणं महत्त्वाचे असते.

मुख्य नदीतील पाणी जर ओहोटीच्या वेळी समुद्रात गेले तरच, नदीला जोडल्या गेलेल्या छोट्या छोट्या ओहोळातील पाणी, कचरा, घाण इ. अडकलेले पदार्थ पुनः नदीच्या पात्रात ढकलले जातील तसे, मुख्य स्रोतसातील अन्न पुढेपुढे ढकलत जाऊन, तिथे जागा झाल्याशिवाय आजूबाजूच्या छोट्या स्रोतसातील चांगले वाईट स्राव मुख्य स्रोतसामधे कसे पोचणार ?

तसेच पोटातही, खड्ड्याची जागा होणे, जागे राहून, अन्नाला, आणि अन्न पचनासाठी आलेल्या इन्शुलीन सारख्या स्रावांना, जागा करून देणे महत्त्वाचे असते. जर आत जागाच नसेल तर, “पॅन्क्रीयाज” मधे तयार झालेले “इन्शुलीन” आत जागा नाही या एका कारणास्तव, कुलुप असलेल्या दरवाजासमोर वाट पहाणाऱ्या कामवालीसारखे, काहीच करू शकत नाही. बिचारे पोटात उतरूच शकत नाही. आणि परत आपल्या स्वस्थानी जाते. तिचे अधिपती भगवान विष्णु स्वरूपी मेंदू महाराजांना ही बातमी कळते, ते देखील “दखल घेतली”, असं म्हणण्या पलीकडे काही करू शकत नाहीत.

अशी जागा, असा खड्डा जर तयार नसेल तर……??
तर पालक विष्णुंचा कोप होऊन ते एक दिवस म्हणतील, “जावा खड्ड्यात! ”

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
04.05.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..