नवीन लेखन...

कवी सुनील गंगोपाध्याय

सुनील गंगोपाध्याय म्हणजे सुनील गांगुली यांचा जन्म ७ सप्टेंबर १९३४ रोजी फरीदपूर यथे झाला जे आता बांगला देशामध्ये आहे. त्यांचे शिक्षण सुरेंद्रनाथ कॉलज, डम डम मोतीहिल कॉलेज आणि कोलकत्यामधील सिटी कॉलेजमध्ये झाले. त्यांनी १९५४ मध्ये कोलकत्यामधून बंगालीमधील मास्टर्स डिग्री मिळवली.

त्यांनी आनंद बझार ग्रुपमधून लिहिण्यास सुरवात केली. तेव्हा त्यांची मैत्री अलेन्स गिन्सबर्ग या अमेरिकेन कवीशी झाली जेव्हा अलेन्स गिन्सबर्ग भारतात प्रवासासाठी झाले होते. त्यांना सुनील गंगोपाध्याय यांच्या कविता आवडत होत्या. सुनील गंगोपाध्याय यांनी सुमारे २०० पुस्तके लिहिली. त्यांची निखिलेश आणि नीरा ही कवितांची मालिका खूप गाजली.

त्यांच्या कवितांप्रमाणे त्यांचे गद्य लेखनही खूप गाजले ते त्यांच्या वेगळ्या पद्धतीमुळे. त्यांची पहिली कांदबरी ‘ आत्मप्रकाश ‘ ही खूप गाजली. त्यावेळच्या गाजलेल्या ‘देश ‘ या मासिकामध्ये ती आली होती. त्यांच्या आक्रमक वृत्तीच्या लिखाणाच्या पद्धतीमुळे वादही निर्माण झाले. ह्या कादंबरीमुळे खरे तर त्यांना जरा भीतीच वाटली होती. खरे तर सत्यजित रे ह्यांना या कादंबरीवर चित्रपट निर्माण करायचा होता परंतु त्यांना ते शक्य झाले नाही. त्यांची ही गाजलेली ‘ आत्मप्रकाश ‘ कादंबरी लिहिण्यास त्यांना प्रेरणा मिळाली ती जॅक केरॉक यांच्या ‘ ऑन द रोड ‘ या कादंबरीमुळे.

सुनील गंगोपाध्याय यांना १९८५ मध्ये साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाले ते त्यांच्या ‘ सई सोमय ‘ या कादंबरीला. या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केला अरुणा चक्रवर्ती यांनी ‘ दोज डेज ‘ या नावाने. त्याचप्रमाणे अरुणा चक्रवर्ती यांनी त्यांच्या त्यांच्या ‘ प्रोथोम आलो ‘ या कादंबरीचा अनुवाद इंग्रजीमध्ये ‘ फर्स्ट लाईट ‘ या नावाने. त्यांची आणखी एक कादंबरी गाजली ती ‘ फाळणी ‘ वर होती त्या कादंबरीचे नाव होते ‘ पूरब-पश्चिम ‘. ही त्यांची कादंबरी ‘ बेस्ट सेलर ‘ ठरली.
सुनील गंगोपाध्याय यांनी मुलांसाठी विपुल लेखन केले. मुलांसाठी त्यांनी एक काल्पनिक ‘ काकाबाबू ‘ हे पात्र निर्माण करून खूप लिहिले होते. आनंदमेळा मॅगेझीनसाठी ३५ कादंबऱ्यां लिहिल्या.

सत्यजित रे यांनी सुनील गंगोपाध्याय यांच्या कादंबऱ्यांवर दोन चित्रपट बनवले. त्याचप्रमाणे त्याची कविता ‘ स्मृतीर शोनार ‘ यावर एका चित्रपटामध्ये अपर्णा सेन यांनी गाणे तयार केले.

त्यांच्या ‘ काकाबाबू ‘ या कादंबऱ्यांच्या मालिकेवर तपन सिन्हा, पिन्की चौधरी, श्रीजित मुखर्जीं यांनी यांनी असे पाच चित्रपट तयार केले. त्यांच्या अनेक कादंबऱ्यावरून चित्रपट तयार केले गेले त्यांची नावे अपराजिता तुमी, एक टुकारो चांद,काकाबाबू हेरे गेलेन अशी काही चित्रपटांची नावे आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या कादंबरीवर मल्याळम चित्रपटही तयार केला गेला त्याचे नाव होते ‘ ओरे कडाल ‘.

सुनील गंगोपाध्याय हे ‘ क्रितीबस ‘ ह्या कविताविषयक मासिकचे एक निर्माते म्हणून ओळखले जातात. हे मासिक १९५३ मध्ये सुरु झाले. ह्या कवितेच्या मासिकामुळे नवीन कवींच्या पिढीला एक व्यासपीठ मिळाले. नीट पाहिले तर आजही मराठी भाषेत संपूर्ण कवितेला वाहिलेली मासिके किती आहेत जेणेकरून तरुण कवींना वाव मिळेल, एक व्यासपीठ निर्माण होईल. परंतु सुनील गंगोपाध्याय हे नवीन विचारधारेचे कवी आणि लेखक होते. म्ह्णून त्यांनी कवितेसाठी वेगळे मासिक काढले.

त्यांच्या लॆखानावबद्दल वादही झाले. त्यांच्या कादंबरीवर आधारलेला सत्यजीत रे यांनी केलेला ‘ प्रतिवादी ‘ हा चित्रपटही त्यातील कथानकांमधील प्रसंगामुळे वादात सापडलेला होता. त्याचप्रमाणे २००६ साली त्यांच्या ‘ अर्धेक जिबोन ‘ ह्या कादंबरीच्या बाबतीत अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यांना कोलकता हायकोर्टमध्ये जावे लागले होते.

असे अनेक वाद-विवाद त्यांच्या मताबद्दल आणि कादंबऱ्यांबद्दल निर्माण झाले होते. त्यांनी सुमारे १० पुस्तकांचे भाषांतरही केले होते.

सुनील गंगोपाध्याय यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यामध्ये त्यांना २ वेळा आनंदा पुरस्कार, आकाशवाणी कोलकतातर्फे राष्ट्रीय कवी म्हणून पुरस्कार मिळाला, बंकिम पुरस्कार, दोन वेळा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. सेरा बंगाली लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे ते २००२ मध्ये कोलकत्याचे ते शेरीफ होते.

सुनील गंगोपाध्याय हे आजारी असताना त्यांनी काही काळ मुंबईमधील हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. थोडे बरे वाटल्यावर ते कोलकत्यास परत गेले.

२३ ऑक्टोबर २०१२ रोजी कोलकत्यात त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे रहात्या घरी निधन झाले.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..