नवीन लेखन...

कवी शंकर वैद्य

 

कवी शंकर वैद्य यांचा जन्म १५ जून १९२८ रोजी पुणे जिल्ह्यातील ओतूर यथे झाला. शंकर वैद्य हे मराठीमधील साहित्यकार होते. ते व्यासंगी समीक्षक तर होतेच त्याचप्रमाणे ते शिक्षक , ललित लेखक , उत्तम वक्ते , आणि सूत्रसंचालक म्हणून सर्वाना परिचित होते.

ओतूर या जन्मगावातून निघून, जुन्नरसारख्या गावी माध्यमिक शिक्षण घेऊन शंकर वैद्यमुंबईला नोकरीसाठी स्थायिक झाले. वैद्य सर बी.ए . आणि एम .ए . ला मराठी विभागात प्रथम आले होते. मुंबईच्या कॉलेजमध्ये मराठीचे ते अध्यापक होते.

वयाच्या सहाव्या वर्षापासूनच शंकर वैद्यांना कवितेची गोडी लागली. या आवडीचा पाठपुरावा करता-करता ते कविता करू लागले. ‘ कालस्वर ‘ हा पहिला काव्यसंग्रह होता. त्यांच्या अनेक कविता गाजल्या . त्यापैकी ‘ आम्ही पालखीचे भोई ‘ ही कविता तर अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण होती. पहिल्या काव्यसंग्रहानंतर २७ वर्षांनी त्यांचा ‘ दर्शन ‘ हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दरम्यान अनेक मासिके , विशेषांकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. अत्यंत सोपे आणि सहजसुंदर शब्द हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. कवी म्ह्णून ते आत्ममग्न होते. संयत आणि शांत स्वभाव असल्यामुळे ते कधीही चढा स्वर लावत नसत. अगदी नवखा वाचकही त्यांच्या काव्याशी पटकन जोडला जायचा. ते अत्यंत विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. त्यांनी सतत तरुणांना प्रोत्साहन दिले. इतका मोठा कवी परंतु त्यांनी अनेक वेळा तरुण कवींच्या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन केले.

कवी कुसुमाग्रजांच्या निवडक कविता असलेल्या ‘प्रवासी पक्षी’ या काव्यसंग्रहाचे, आणि कवी मनमोहन यांच्या कविता असलेल्या ‘आदित्य’ या काव्यसंग्रहांचे संपादन शंकर वैद्य यांनी केले होते. शंकर वैद्य सरांच्या काही गाजलेल्या कविता आहेत त्यापैकी ‘ स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला ‘ किंवा ‘ शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला ‘ ही गीते सुप्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे प्रवीण दवणे आणि शंकर वैद्य याची बालगीते एका रेकॉडमध्ये होती. ती गायली होती देवकी पंडित यांनी आणि संगीतकार होते नंदू होनप , ही खूप जुनी गोष्ट आहे. माझ्या महितीप्रमाणे रेकॉर्डसाठी तिघांचे ही पाहिली गाणी होती.

त्यांचा ‘ आला स्वर गेला स्वर ‘ नावाचा कथा संग्रह प्रसिद्ध आहे.

कवी शंकर वैद्य यांना कोकण मराठी साहित्य परिषदेचा पूरस्कार मिळाला होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता , मास्टर दीनानाथ प्रतिष्ठानचा पुरस्कार आणि वाग्विलासिनी पुरस्कारही मिळाला होता . शंकर वैद्यांच्या पत्‍नी सरोजिनी वैद्य याही एक प्रतिभाशाली कवयित्री , चरित्र लेखिका आणि समीक्षक होत्या. त्यांचाही 15 जून हा जन्मदिवस , विलक्षण योगायोग आहे हा , असेच म्हणावे लागेल.

कवी शंकर वैद्य सरांचे २३ सप्टेंबर २०१४ रोजी मुंबईत निधन झाले.

— सतिश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 426 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..