नवीन लेखन...

फुंकर

मूल लहान असताना दुडुदुडु धावायला बघते. अजून पायात बळ नाही. चालण्याची रित माहित नाही पण आई आपल्या सोबत आहे या एकाच विश्वासाने ते धावते. आणि पडते. आईचा जीव कासावीस होतो. मग त्याची इच्छा पाहून ती खाली वाकून त्याचे दोन्ही हात धरून सगळा भार आपल्या वर घेऊन चालायला शिकवते. त्यामुळे आपण पडलो होतो हे ते विसरुन जाते. उमेद असते खात्री असते ती की आई आपल्या पाठीशी आहे. मग थोडे मोठे झाले की अनेक वेळा पडले की खरचटते. जखम होते. वेदना होतात. आई असे म्हणून विव्हळत असते. आणि आई धावत आलेली पाहताच. रडण्याचा आवाज मोठा होतो. आई येते कुठे लागल. कसा पडलास असे विचारत त्याच्या जखमेवर फुंकर मारून छू मतंर असे म्हणत हवेत ती वेदना फेकून देते. आणि वेदना कमी होतात. खर तर असे नाही होत. तो आपलेपणा. ती माया. त्यामुळे मिळालेला आत्मविश्वास यामुळे ती वेदना ते विसरुन जाते. मोठेपणी तर अनेक प्रसंगी त्याला आईबाबा धीर देतात. त्याला मार्गदर्शन करतात. आणि म्हणतात की अरे आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. तू प्रयत्न करत रहा. फक्त लढ म्हणा असो की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशी उर्जा देणारी शक्ती. त्यामुळे वेदना. संकट. अडचणी अशा अनेक गोष्टीतून तारुन जाता येते..

फुंकर ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी मन मोठे तर असावेच लागते. आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी असते. पण नेमके हेच मिळत नाही. मान्य आहे की आत्ताच्या पिढीला अनेक ताणतणाव आहेत. नोकरी. शिक्षण. दवाखाने. वाढवलेला व्याप त्यात गुरफटून गेलेले आहेत. शिवाय वैयक्तिक आरोग्याचे प्रश्नही आहेत. त्यामुळे आईबाबांना काही झाले की ते मुलाजवळच आपले मन मोकळे करतात. अशा वेळी तो तुमचा प्रश्न आहे. आता हे सगळे या वयात होणारच आहे. ते सहन करणे आवश्यक आहे. आम्ही काय काय करणार.? बरोबर आहे एकदम ज्याचे भोग त्यालाच भोगायचे असतात पण… मग ती मुले असोत की आणखी कोणीही असो उडवून लावले की खूप वाईट वाटते. नको ते जगणे असही वाटायला लागतं. पण अशा वेळी हेच पण जरा वेगळ्या शब्दात व्यक्त करता आले तर मनं दुखावली जात नाहीत. आम्ही आहोत ना तुम्ही नका काळजी करू. एवढेच म्हटले की आपण फुंकर मारली होती ती वाया गेलेली नाही याचे समाधान ही सुद्धा एक फुंकरच आहे. होय ना?

— सौ कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..