नवीन लेखन...

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 14

अष्टांग संग्रह सूत्रस्थान या ग्रंथामधे अकराव्या मात्राशीतीय नावाच्या अध्यायात श्लोक क्रमांक 64 ते 68 या मधे काय सांगितले आहे ते पाहूया. फार सुंदर आहे. त्यातील मतीतार्थ सांगतो.

” जसे रेल्वेचं इंजिन धावत असताना, त्याला इंधन जास्ती प्रमाणात लागते. इंजिन सुरू आहे, पण नुसते उभे असेल, तर इंधन कमी प्रमाणात लागते, तसेच शरीराला इंधनाची जास्ती आवश्यकता असते. पण रात्रौच्या वेळी इंधनाची फार आवश्यकता नसते.”

व्यवहारातील अत्यंत समर्पक उदाहरण ग्रंथकारांनी दिले आहे. कोणत्याही यंत्राचे असेच असते. जेव्हा काम जास्ती तेव्हा इंधन जास्ती. काम नसेल तर इंधनाची गरज जास्ती रहात नाही.

समजा आपल्याला तीन चारशे किलोमीटरचा प्रवास करायचा असेल तर सुरवातीला गाडीमधे आपण इंधन पूर्ण भरून घेतो. मग लवकर रिझर्व्ह लागणार नाही. दर वीस पंचवीस किलोमीटरला दोन दोन लीटर इंधन घालत पुढे जायचे , असं करतो का आपण ? नाही ना ! मग दर दोन चार तासाने खायचे हा नियम कुठुन काढला ?

एकदा दहा माणसाना पुरेल एवढा चहा करायचा हे ठरलं तर एक एक कप चहा करीत रहायचं की एकदम दहा कप चहा करायचा ? की एक कप चहा उकळला कि त्यातच परत एक कप पाणी घालून पुनः साखर पावडर घालायची ? असं दहा वेळा करायचं ?
एकदा ठरलं की प्रश्नच संपला. तसंच जेवणाचं पण आहे. माझं आजचं काम कसं आहे, किती काम करायचं आहे, त्याला इंधन किती लागणार आहे, हे सुरवातीला (सकाळी) ठरवून घ्यायचं आणि इंधन भरायचं.
एवढं मी जेवलंच पाहिजे, नाहीतर ताकद येणारच नाही, असा नियम करून जेवू नका. कारण प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे,

आपली कामे देखील दिवसाचीच खूप असतात. म्हणून सकाळचे जेवण जास्ती प्रमाणात घ्यावे. ज्या दिवशी कामे कमी असतील तेव्हा खाणेही कमी असावे. पण व्यवहारात नेमके उलटे घडते. जेव्हा सुट्टी असते, तेव्हाच पोटावर अत्याचार जास्ती होतात.

अगदी क्वचित रात्रपाळीला प्रश्न येईल, पण नियम तोच जेव्हा काम जास्ती तेव्हा अन्न जास्ती. आणि सूर्यास्तापूर्वी जेवण संपलेच पाहिजे. तरच उर्जा निर्माण होईल. जेव्हा रात्रपाळी असेल तेव्हा सायंकाळी जेवणाचे प्रमाण जास्त आणि सकाळी कमी जेवावे. आणि जेव्हा नियमितपणे दिवसा काम असेल तेव्हा सकाळी जेवण जास्ती प्रमाणात आणि सायंकाळी अगदी कमी जेवावे.
……म्हणजे गाडी ओव्हर लोड होत नाही.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
09.03.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..