नवीन लेखन...

जेवणाची योग्य वेळ कोणती – अंतिम भाग 20

घड्याळ दोन तास पुढे करा. जेवणाची वेळ सायंकाळी सात वाजता करणे हे “आताच्या प्रमाणित सरकारी वेळेनुसार शक्य नाही.” प्रत्येकाचा हाच एक प्राॅब्लेम. त्यालाही एक पर्याय सुचवतो. आपले राष्ट्रीय घड्याळ दोन तास पुढे करावे. म्हणजे काही प्रश्न आपोआपच सोडवले जातील. मी त्या क्षणाची वाट पहातोय, जेव्हा मा. पंतप्रधान मोदीजी रात्री आठ वाजता, कधीतरी रात्री राष्ट्र के नाम […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 19

गणपती बाप्पाचा सकाळच्या महापूजेचा नैवेद्य पंचपक्वान्नाचे भरलेले ताट असते. पण सायंपूजेचा नैवेद्य काय असतो ? तर वाटीभर पंचखाद्य किंवा एखादा लाडू. कशासाठी ? जे जे देवासाठी, ते ते देहासाठी. या न्यायाने देवाच्या भोजनाचा नियम आपल्यालादेखील तसाच लागू होतो. सकाळचे भोजन आणि सायंकाळचे भोजन याच प्रमाणात घ्यावे, असे आपली संस्कृती पण सुचवते. कमळ कधी उमलते ? कमळ […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 18

दिवस हा देवांचा आणि रात्र ही राक्षसांची, जंतुंची… सर्व शुभकार्ये दिवसा आणि सर्व निषिध्द कामे रात्रीची. कारण ? ….. त्यांचा रात्रीस खेळ चाले… काही भारतीय धारणा अश्या आहेत, ज्याचा पुरावा दाखवता येत नाही. पण त्यांचे अस्तित्त्व भारतीय संस्कृतीला मान्य आहे. आता “अणु” कुठे दाखवता येतो ? ती धारणा आहे. दाखवता येणार नाही. गृहीत धरून विज्ञानातला अख्खा […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 17

अष्टांग संग्रहातील मात्राशीतीय नावाच्या अध्यायातील हे श्लोक म्हणजे आयुर्वेदातील भौतिकशास्त्रच नव्हे काय ? विज्ञान विज्ञान म्हणजे दुसरे आणि काय ? उष्णतेमुळे पदार्थाचे प्रसरण होते आणि शीत स्पर्शाने पदार्थ आकुंचित पावतो, हा भौतिकशास्त्रातील नियम या श्लोकात वर्णन केलेला दिसतो. आपली दृष्टीची कक्षा वाढवली की सगळं स्पष्ट समजायला लागतं. सूर्याच्या उष्णतेच्या प्रभावाने स्रोतसांचा विकास होतो. जेवढा पाईप मोठा […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 16

दिवसा सूर्य असताना काय होते हे ग्रंथकारांनी सांगितले पुढे ते आणखी स्पष्ट करून सांगतात, परंतु, रात्रौ ह्रदय ( आशय) म्लान राहाते. आणि रस रक्त वाहून नेणारी स्रोतसे कमी कार्यशील असतात. मुख्य कोष्ठ देखील काहीसे अवरूद्ध असते. दिवसाच्या हालचाली जशा होतात, तशा हालचाली किंवा व्यायाम रात्रीच्या वेळी होत नाही. त्यामुळे स्रोतसांमधे क्लेदाची उत्त्पत्ती होते. धातूमधील किंवा आशयामधील […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 15

दिवसा (सूर्याच्या उष्णतेमुळे) प्राण्यांचे आशय ( म्हणजे ह्रदयादि सर्व अवयव) विकसित अवस्थेत असतात. क्रियाशील असतात. सूर्य उगवला की, कमळ उमलते. सूर्य मावळला की कमळ मावळते. ग्रंथकारांची सौंदर्य दृष्टी इतकी विलक्षण प्रतिभावान आहे, की शरीरातील अवयवाला ते कमळाची उपमा देतात. त्या अवयवांना ते ह्रदय म्हणतात. सूर्यनारायणांच्या प्रकाश आणि उष्णतेमुळे प्राण्यांचे ह्रत्कमळ प्रफुल्लित अवस्थेत असते. दिवसभरातील उष्णतेने आणखीन […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 14

अष्टांग संग्रह सूत्रस्थान या ग्रंथामधे अकराव्या मात्राशीतीय नावाच्या अध्यायात श्लोक क्रमांक 64 ते 68 या मधे काय सांगितले आहे ते पाहूया. फार सुंदर आहे. त्यातील मतीतार्थ सांगतो. ” जसे रेल्वेचं इंजिन धावत असताना, त्याला इंधन जास्ती प्रमाणात लागते. इंजिन सुरू आहे, पण नुसते उभे असेल, तर इंधन कमी प्रमाणात लागते, तसेच शरीराला इंधनाची जास्ती आवश्यकता असते. […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 13

एवढा सगळा खटाटोप कशासाठी ?….. गेली चाळीस पन्नास वर्षे झाली, आमची वाढ होऊन, आत्ता कशाला एवढं बदलायचं ?… आमची अर्धी लाकडं गेली मसणात….. काय वाढणारे आयुष्य असं वाढून वाढून…. आणि खाव्या लागल्या अॅलोपॅथीच्या गोळ्या म्हणून कुठे बिघडणार आहे ?…… जगात एवढी लोक खातातच आहेत ना या अॅलोपॅथीच्या गोळ्या. ती काय सगळी वेडी आहेत का ?…… विज्ञानावर, […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 12

सायंकाळी सातला जेवण्याचा प्रयत्न केला. पण पुनः रात्री झोपताना भूक लागते. गेल्या अनेक वर्षांची सवय आहे. जात नाही.. पित्ताची प्रकृती आहे, काय करावे ? अशा सर्व सामुदायिक शंका लक्षात घेऊन ही सोयीस्कर टीप. आपण आजच्या काळातील बिझ्झी लाईफमधील जेवणखाण कसे करतो ? सकाळी उठतो आधी चहा. त्याबरोबर मैद्यापासूनचे टोस्ट, बटर, बिस्कीट, मारी, खारी. ती वचावचा खाऊन […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 11

“आम्हाला हे असं लवकर जेवणं अजिबात शक्य नाही, हो!” असं सांगणाऱ्या करीता खास टीप…. सक्काळी सकाळी उठायचं, भराभरा आवरायचं डब्बा बनवायचा, पोरांना शाळेत हाकलायचं, नवरा कामाला पाठवलं की कसाबसा चहात पाव बुचकळून खायचा, म्हणजे झाला नाश्ता. वर पाणी ढोसायचं, आपला डबा करायचा, धावधाव करीत ऑफीस गाठायचं, बाॅसची बोलणी खायची, परत घरी येताना मार्केट मार्गे खरेदी करून, […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..