नवीन लेखन...

परमपूज्य देवास पत्र

|| हरि ॐ ||

आपण दैनंदिन जीवनात बरीच पत्र या ना त्या कारणाने लिहिली असतील पण आपल्या भावना लेखी स्वरुपात पत्राने देवास कश्या पाठवता येतील वा कसे याचा विचार करत असताना सुचलेली कल्पना सर्व वाचकांपर्यंत पोहोचावी या भावनेने देत आहे, तरी चूकभूल द्यावी घ्यावी ही विनंती.

परमपूज्य देवाधिदेवा,

स्वर्ग निवास,

पिन कोड : अनंतकोटी ब्रम्हांड.

साष्टांग दंडवत वि.वि.

विषय : मनातील व्यथा

हे देवाधिदेवा तुला पत्र लिहिण्याची पहिलीच वेळ आहे काही चुकल माकल तर सांभाळून घे रे बाबा काही कमी जास्त लिहिले असेल तर क्षमा कर.

पृथ्वीवरील सर्व मंडळी सुखात आहेत म्हणण्याचे धाडसच होत नाही रे बाबा. कारण तू जाणतोसच. सकाळी वर्तमानपत्र वाचायचे म्हणजे मनावर दगड ठेऊनच वाचावे लागते. तू म्हंणशील का तर काय सांगू? पृथ्वीवरील सर्व मिडीयाज कमी पडतात म्हणून आम्हीं आता मनावरच घेतले आहे की प्रत्येक गाव, शहर व राज्या राज्यातून खून, दरोडे, फसवाफसवी, स्त्रियांच्या अबृंची लक्तरे व धिंडवडे काढायची, माणसा माणसात, राष्ट्रा राष्ट्रात कुठला वाद नाही तेच विचार! आमच्यात चंगळवाद, भोगवाद, नक्षलवाद, दहशतवाद तसेच अनेक कारणांनी सर्व वयोगटातील स्त्री/पुरुषांच्या आत्महत्या, या बरोबरीने महागाई, पायाभूत सुखसोयींची कमतरता, वाढती लोकसंख्या, आत्मकेंद्रित स्वभाव, दुसऱ्याचे ते माझे आणि माझे ते माझेच ही वृत्ती, अतृप्ती, हव्यास, कर्म स्वातंत्र्याचा नको तेवढा चुकीचा वापर, या सगळ्याची परिणीती व त्याची प्रत्याक्शिकेच करून दाखवायचाच विडा उचलला आहे. जेणे करून असलेली तरुण पिढी व येणारी पिढी पूर्ण रसातळाला जाण्याच्या बेतात आहे. पण जे काही शहाणे सुरते आहेत त्यांना वेडयात काढले जाते, काही तुझे नामस्मरण, गुणसंकीर्तन करतात त्यांना हे हसतात, वेडे ठरवतात. तू आखून दिलेल्या सत्य, प्रेम व आनंदाच्या देवयान पंथावर चालतांना अडखळतात, ठेचकळतात, लंगडतात तरी तू त्यांना तुझ्या हाताचा आधार देऊन पुन्हा पुन्हा चालण्यासाठी मदत करतोस हेच त्यांना पहावत नाही. काय करणार ‘कालाय तस्मेन नम:’ कलीयुग आहे. पण मला नक्की खात्री आहे की हे चित्र कधीतरी नक्की बदलेल व आम्हीं शहाणे होऊ !

आम्हांला कर्मस्वातंत्र्या बरोबर मन व बुद्धी दिल्यामुळे आंम्ही खुपच प्रगती केली आहे. परंतू आज पृथ्वीवर मानव सुखी व सामाघानी का नाही? का तो एकमेकांचे पाय खेचत असतो? मर्यादांचे पालन करताना दिसत नाही! मोहात पदोपदी अडकत असतो व इतरांना अडकवतो. आम्हांला वाटते की त्याला तू मन व बुद्धीचे रसायन दिलेस व त्यात भर म्हणून की काय कर्म स्वातंत्र्य दिलेस. अमर्याद कर्म स्वातंत्र्याचा आपल्या स्वार्थ व भोगावादासाठी असा काही उपयोग करून घेत आहे की तो आज स्व:लाच विसरला आहे की तो प्रथम एक माणूस आहे. आम्हांला दिलेल्या कर्मस्वातंत्र्याचे आता अपचन होत आहे. जास्त खाल्ले की अपचन होऊन तब्बेत बिघडते व शरीरात जास्त वात होऊन त्याचा मन व बुद्धीवर परिणाम होतो. देवा खरंच सांगतो मानवाच्या मेंदूतील कर्म स्वातंत्र्य नावाचे व आपण देवाच्या वर नाही, श्रेष्ठ नाही याचे भान ठेवणारे स्मरणशक्तीचे PCB (Printed Circuit Brain (Board) बदलण्याची वेळ आली आहे.

तेव्हां कधी कामाला लागतोस? एकदा आम्हांला कळले की तू कर्म स्वातंत्र्यात ढवळा ढवळ करतोस की आम्ही जरा सांभाळूनच राहू व शहाणे होता येते का याचा प्रयत्न करू. तुझ्याकडे खूप युक्त्या प्रयुक्त्या आहेत पण तू तुझ्या अकारण करुण्यामुळे वापरत नाहीस. पण काय सांगू बाबा ‘तसे’ भक्त आता खुपच कमी आहेत. कली युगातील मानव चमत्काराशिवाय नमस्कर करीत नाही. तुला मानवाचे कर्म स्वातंत्र्य टप्या टप्याने कमी करता आले तर बघ म्हणजे त्यांना त्याची जाणीव होईल व ते सुधारतील अशी आशा बाळगूया. सुख्या बरोबर ओले जळतं ना तशी परिस्थिती आहे. पटल तर बघ ! तू आम्हांला कितीही संध्या दिल्यास, माफ केलेस तरी “उपड्या घागरी वर पाणी” अशी अवस्था आहे.

पाप क्षालनासाठी २४ तासातील कमीत कमी २४ मिनिटे नामस्मरण करण्यास सांगितलेस पण बाबा २४ मिनिटांच्या नामस्मरणात आमचे कुठे लक्ष लागते त्यात सुद्धा कळत न कळत पाप होतेच त्याचे काय? तू प्रत्येक गुन्ह्यास शिक्षा ताबडतोब दे. नाहीतर म्हणशील त्याचे स्थळ, काळ, वेळ व वय तसेच शंभर अपराध होईस्तोवर वाट बघिन तर आंम्ही जाम पोचलेलो आहोत. आमचा वकील सांगेल व्हिटनेस आणा, कागदपत्र सादर करा, मग सवाल जबाब, कागद पत्र तपासणी, तारखांवर तारखा वर्षच्या वर्ष जातील त्यात तो गचकला तर झालीना पंचाईत. हा खटला या कोर्टात चालणार नाही. एक ना अनेक सबबी सागण्याची सवय आहे आम्हांला. तरी मी सांगतो, कली युगात बाबा जशास तसे हाच मार्ग कळतो. ही तर नुसती झलक आहे. प्रत्येक बाबतीत प्रत्येक कामात असे व याहून भयानक व विदारक चित्र बघण्यास व ऐकण्यास मिळेल, तुझी आमच्यावरील श्रद्धा व सबुरीची कसोटीच आहे बर का. तू या आधीच्या युगात कधीही बघितले नसशील असे किस्से व आठवणी आहेत. काय सांगू?

आम्हां मानवांना तू कितीही समजविण्याचा प्रयास केलास तरी आमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, ती फक्त काही चमत्कार केलेस तरच ठिकाणावर येईल व ती म्हणजे कर्मस्वातंत्र्यावर तुझा अंकुश ठेवणे. एवढे जरी केलेस तरी पुढे येणारी कितीतरी संकटे टळतील. अर्थात तू भूत, वर्तमान व भविष्यकाळ जाणतोसच, पण एवढ्या संधी देतोस तर हे एक करू बघ. आता इकडील सर्व मंडळी खुशाल राहतील, बघू तू कर्मात ढवळा ढवळ केलीस तर आणि तरच….!

कळावे सदैव लोभ आहेच तो अधिक वाढवा हीच सदिच्छा.

आपला विनम्र सेवक,

जगदीश पटवर्धन

पृथ्वीवरील एक गाव,

वझिरा, बोरिवली (प)

आम्हांला कर्मस्वातंत्र्या बरोबर मन व बुद्धी दिल्यामुळे आंम्ही खुपच प्रगती केली आहे. परंतू आज पृथ्वीवर मानव सुखी व सामाघानी का नाही? का तो एकमेकांचे पाय खेचत असतो? मर्यादांचे पालन करताना दिसत नाही! मोहात पदोपदी अडकत असतो व इतरांना अडकवतो. आम्हांला वाटते की त्याला तू मन व बुद्धीचे रसायन दिलेस व त्यात भर म्हणून की काय कर्म स्वातंत्र्य दिलेस. अमर्याद कर्म स्वातंत्र्याचा आपल्या स्वार्थ व भोगावादासाठी असा काही उपयोग करून घेत आहे की तो आज स्व:लाच विसरला आहे की तो प्रथम एक माणूस आहे. आम्हांला दिलेल्या कर्मस्वातंत्र्याचे आता अपचन होत आहे. जास्त खाल्ले की अपचन होऊन तब्बेत बिघडते व शरीरात जास्त वात होऊन त्याचा मन व बुद्धीवर परिणाम होतो. देवा खरंच सांगतो मानवाच्या मेंदूतील कर्म स्वातंत्र्य नावाचे व आपण देवाच्या वर नाही, श्रेष्ठ नाही याचे भान ठेवणारे स्मरणशक्तीचे PCB (Printed Circuit Brain (Board) बदलण्याची वेळ आली आहे.

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..