नवीन लेखन...

पी.एन.गाडगीळ ॲन्ड सन्सचे मालक दाजीकाका गाडगीळ

प्रसिद्ध सराफी पेढी पी.एन.गाडगीळ ॲन्ड सन्सचे मालक दाजीकाका गाडगीळ ऊर्फ अनंत गणेश गाडगीळ यांचा जन्म ११ सप्टेंबर १९१५ रोजी झाला.

मूळचे कोकणातले असणारे गाडगीळ कुटुंब २०० वर्षांपूर्वी सांगलीमध्ये स्थिरावले आणि सराफी, सावकारी असा जोड व्यवसाय करत राहिले. २९ नोव्हेंबर १९३२ रोजी `गणेश नारायण गाडगीळ सराफ व ज्युवेलर्स’ या दुकानाचा शुभारंभ झाला. या व्यवसायात थोरले बंधू पु. ना. ऊर्फ आबा गाडगीळ, मधले गणेश नारायण ऊर्फ दादा (हे दाजीकाकांचे वडील) आणि तिसरे बापूकाका अशा तिघांची भागीदारी होती. आबांची सत्शीलता, निर्व्यसनीपणा, समतोल वृत्ती, मितभाषी व्यवहार, जनहिताची तळमळ यांचा खोल ठसा दाजीकाकांवर उमटला. माधुकरीसाठी येणारे विद्यार्थी, जेवायला येणारे वारकरी, वाईचे, काशीचे विद्वान ब्राह्मण, सख्खे, सावत्र, चुलत नातेवाईक, सुना-मुलींचा गोतावळा असा सतत माणसांचा राबता असणाऱया सांगलीच्या घरात दाजीकाकांची जडणघडण झाली. वयाच्या विसाव्या वर्षी दाजीकाकांनी दुकानात पाऊल ठेवले आणि हा परिपाठ पुढे सत्तर वर्षे टिकून राहिला.

`आधुनिक पाणिनी’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या काशीनाथशास्त्री अभ्यंकर यांची पुण्यात राहणारी बुद्धिमान कन्या कमलाबाई दाजीकाकांच्या पत्नी होत. दाजीकाकांनी पुण्यासारख्या चोखंदळ बाजारपेठेत १९५८च्या प्रारंभी ‘मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ आणि कंपनी’ या नावाने दुकान थाटले. सांगलीहून आणलेले कुशल कारागीर आणि दाजीकाका व त्यांच्या पत्नी कमलाताई यांच्या आपुलकीमुळे पुणेकरांनी दाजीकाकांना आपलेसे केले. संपूर्ण कुटुंबाला व्यवसायात जोडून घेण्याचा धडा देत दाजीकाकांनी सोन्या-चांदीप्रमाणे हिरे-माणके आणि कालानुरूप ज्वेलरीच्या व्यवसायाचे कौशल्यही आत्मसात करून घेतले. हिरे व रत्नां चा स्वतंत्र विभागही सुरू केला. ‘ब्रँड ॲम्बॅसिडर’ नियुक्त करण्याची दाजीकाकांची कल्पना सराफी व्यवसायात चमकून गेली.

दुकानाच्या उद्घाटनाला प्रीती झिंटा, लता मंगेशकर यांना बोलावले, पीएनजीची पहिली ब्रँड ऍम्बॅसिडर म्हणून लोकप्रिय अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांना नेमले होते.

बारकोड सिस्टिम, कॉम्प्युटराइज्ड रेकॉर्ड अशा आधुनिक माध्यमातून दाजीकाकांनी व्यवसायातील कालानुरूप व्यवस्थांशी लीलया जुळवून घेतले. गाडगीळांची आता सहावी पिढी या व्यवसायात काम आहे. पीएनजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पु.ना.गाडगीळ ॲन्ड सन्स या दुकानाच्या आज पुण्यात व पुण्याच्या बाहेर तसेच परदेशी अनेक शाखा आहेत.

दाजीकाका गाडगीळांच्या आयुष्यावर मंगला गोडबोले यांनी लिहिलेले ’सुवर्णमुद्रा’ नावाचे पुस्तक उत्कर्ष प्रकाशनाने छापून प्रसिद्ध केले आहे. दाजीकाकांना कालनिर्णय, पुणे महापालिकेतर्फे सत्कार, रोटरी एक्सलन्स ऍवॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळाले; तसेच दाजीकाकांच्या उद्योगाला `वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलची संलग्न भागीदारी’ हा दुर्मिळ सन्मानही मिळाला.

दाजीकाका गाडगीळ यांचे १० जानेवारी, २०१४ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2806 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..