नवीन लेखन...

ओळख मूलांकांची – मूलांक ७

अंकशास्त्रात (Numerology) प्रत्येक व्यक्तीच्या मूलांकानुसार (Mulank) त्या व्यक्तीचा स्वभाव तसेच गुण वैशिष्ट्य सांगितली जातात. व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मूलांक ठरवला जातो. या मूलांकाच्या आधारानेच व्यक्तीच्या भविष्याच्या संदर्भात अनेक गोष्टींचा अंदाज लावता येतो. आज आपण असाच एका मूलांकाविषयी जाणून घेणार आहोत ज्यांना काही घडण्याआधीच भाकीत करता येतं अंकज्योतिष शास्त्रानुसार, आज आपण मूलांक ७,विषयी जाणून घेणार आहोत.

कोणत्याही महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ७ असतो, ज्यांचा स्वामी ग्रह केतू (किंवा नेपच्यून) आहे. हे लोक अंतर्ज्ञानी, गूढ, स्वतंत्र आणि अध्यात्मिक विचारांचे असतात. मूलांक ७ मूलांक ७ (Mulank 7) बद्दल सविस्तर माहिती:

स्वभाव आणि व्यक्तिमत्व:
– हे लोक सर्जनशील (creative) असतात आणि त्यांना शांतता आवडते. ते कष्टाळू असून अनेकदा धनवान असतात
– रहस्यमयी: मूलांक ७ चे लोक थोडे अंतर्मुख आणि गूढ स्वभावाचे असतात, त्यांना समजणे कठीण असते
– स्वतंत्र विचार: हे लोक कोणावर अवलंबून न राहता स्वतःचे निर्णय घेतात आणि स्वतंत्र काम करणे पसंत करतात
– अंतर्ज्ञान (Intuition): यांची ‘सिक्स सेन्स’ (Sixth Sense) खूप तीव्र असते, ज्यामुळे त्यांना भविष्यातील घटनांचा अंदाज आधीच येतो.
– एक सुपरपॉवर या मूलांकाचा स्वामी ग्रह केतू आहे. केतू हा एक छाया ग्रह आहे. या जन्मतारखेच्या लोकांकडे असते ती म्हणजे यांना भविष्याचा अंदाज लावता येतो.
– अध्यात्मिक आणि विचारवंत: हे लोक अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि गूढ विज्ञानाकडे आकर्षित होतात
– धनवान: हे लोक धनसंपत्तीच्या बाबतीत नशीबवान असतात आणि त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा असते.
– स्वभावाने फार गंभीर आणि शांत असतात.
– मूलांक ७ असलेल्या व्यक्ती दिसायला सुंदर आणि आकर्षक असतात. त्याबाबत ते जागरुकही असतात, आपल्या रूपाची ते काळजीही घेतात. जसजसे वय वाढत जाते तसतसे त्यांचे रूप अधिकाधिक आकर्षक होत जाते. पण कधी कधी अतिकाळजी घेण्याच्या वृत्तीमुळे ते अनाकर्षकही वाटतात.
– व्यक्तिमत्व: जल तत्वाच्या प्रभावामुळे मूलांक ७ असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व चंचल व सतत बदलणारे असते. त्यांच्या आवडी-निवडी, खान-पान, कपडय़ांची निवड, विचार नेहमी बदलत असतात. ही माणसे इतरांपेक्षा वेगळी असतात आणि हजारांतही ओळखता येतात. आपल्या विचारांना आणि कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी त्यांना कोणाचे तरी सहकार्य लागतेच. बाह्य सहकाऱ्याशिवाय हे लोक असहाय आणि अयशस्वी ठरतात.
– संगीत आणि ललित कलांमघ्ये यांची रूचि स्पष्ट दिसते. संकुचित मनोवृत्तीपासून ही माणसं स्वतःला दूर ठेवतात. परंपरावादी असूनही ते परिवर्तनशील राहतात. परंतु परिवर्तनाला सुरुवात करत नाहीत.
– मूलांक ७ असलेल्या लोकांची जीवनशैली त्यांच्या आसपासच्या, कुटुंबियांतील लोकांपेक्षा उच्च पातळीवरील असते. त्यांचे मन सतत अशांत, बेचैन आणि संतप्त असते. यांच्यामध्ये एक विशेष रहस्यमय गुण लपलेला असतो. त्यांना कोणत्याही संकटाच्या पूर्वी चांगली आणि सुंदर स्वप्नं पडतात.
– शिक्षण : शिक्षणाची त्यांना आवड असते, पण अनेकदा त्यांना शिकण्याची संधी मिळत नाही. यांना भविष्य जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. तंत्र-शास्त्र आणि ज्योतिषावर यांचा विश्वास असतो, पण आपल्या अस्थिर मनामुळे ते नेहमी ज्योतिषी बदलत असतात. काव्य, चित्रकला, संगीत, लेखनाशी संबंधित प्रतिभा यांच्यामध्ये असूनही अनेकदा ती अव्यक्त राहते.
– बदल करत राहणं हा मूलांक ७ असलेल्या लोकांचा मुख्य गुण आहे. त्यांची कलात्मक दृष्टी त्यांना स्वतंत्र तेज देते. प्रतिकूल परिस्थितीचा ते सहज स्वीकार करतात. वैचारिक चंचलता ह्या त्यांच्या गुणामुळे त्यांना ओळखले जाते.
– त्यांना परिस्थितीची खोल समज आणि अंतर्दृष्टी असते. ते त्यांच्या बाजूने जनमत एकत्रित करू शकतात.
– वैवाहिक जीवन सुखी राहते. मुळांक ७ असलेल्या लोकांचे प्रेम संबंध जास्त दिवस टिकत नाहीत. तुमचे स्वतंत्र विचार प्रेम संबंधाला प्रभावित करतात. या लोकांना प्रेमाचा दिखावा करणे आवडत नाही. हे लोक कुटुंब आणि सामाजिक संबंधांना जास्त महत्त्व देतात यामुळे यांचे कौटुंबिक संबंध चांगले राहतात.
– मूलांक ७ चे जातक स्वतःच्या मेहनतीनेच धन अर्जित करतात. जेवढी मेहनत करतात तेवढेच धन प्राप्त होते. जेवढे पैसे कमावतात त्यानुसारच खर्च करतात. दान-पुण्यावर हे जास्त खर्च करतात. मोक्ष प्राप्तीसाठी काहीही खर्च करण्यासाठी तयार राहतात.
– मूलांक सातचे जातक शारीरिक स्वरूपात कमजोर राहतात. याना पोटाचे आजार वारंवार होण्याची शक्यता राहते. मस्तिष्क संबंधित आजार उदा: डिप्रेशनने पीडित राहू शकतात. या व्यतिरिक्त ब्लडप्रेशर कमी किंवा जास्त होणे, त्वचा रोग, दृष्टी कमजोर अशा आजारांना सामोरे जावे लागू शकते.
– ज्यांचा मूलांक किवा भाग्यांक ७ असतो अशा सर्व व्यक्तींवर केतु आणि नेपच्युनचा प्रभाव असतोच. केतु ला वरचे शीर नाही. त्यामुळे ७ नंबरच्या व्यक्ती ह्या आपल्या विश्वात असतात.
– इंद्रिय डेव्हलप असतात. ह्यांना कोणत्याही गोष्टीचा वास सुवास लगेच जाणवतो. घरात दूध जरी ऊतू जात असेल तर ह्यांना आधी वास येतो. नेहमी स्वतःला अलिप्त आणि असमाधानी मानतात. खूप काही प्राप्त झाले तरी त्या अचिव्हमेंट चा ते शो करत नाहीत. चेहऱ्यावर खूप काही मिळविल्याचा आनंद दाखवीत नाहीत. हे प्राणी प्रेमी असतात.

दुर्गुण:
– अधीर स्वभाव, शौर्याचा अभाव आणि नेहमी इतरांवर अवलंबून राहणे हे यांचे मुख्य दुर्गुण आहेत. योग्य वेळेवर निर्णय न घेणे किंवा शेवटपर्यंत निर्णय न घेणे हे त्यांच्या अयशस्वीपणाचे प्रमुख कारण आहे,
– मूलांक ७च्या लोकांवर मूलांक २च्या लोकांचा सर्वाधिक प्रभाव असतो आणि ते त्यांना सर्वाधिक सहकार्य करतात. ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे की, मूलांक ७च्या लोकांवर मूलांक ९च्या लोकांचाही प्रभाव असतो.
– त्यांचे व्यक्तिमत्व दुहेरी असू शकते,
– मूलांक ७ नंबर च्या तरुण मुलींना खास सल्ला देण्यात येतो कि जास्त कुणावर विश्वास ठेऊ नये.

करिअर:
संशोधन (Research), गूढ विद्या, ज्योतिष, लेखक, तत्त्वज्ञ, कलाकार आणि समाजसेवा अशा क्षेत्रात हे लोक मोठी प्रगती करतात

आरोग्य – तुम्हाला रक्ताशी संबंधित समस्या, पोटाचे आजार, खोकला, चिंताग्रस्तपणाचा त्रास होऊ शकतो. कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहा. फळे आणि हिरव्या भाज्या खा. सकाळी चालणे फायदेशीर ठरेल.

सावधगिरी:
यांचे मन अनेकदा अशांत आणि बेचैन राहू शकते खूप हळवे आणि भावनिक असल्याने इतर लोक त्यांचा गैरफायदा घेऊ शकतात. ज्या शंका आणि प्रश्नांची उत्तरे तुमच्या हातात नाहीत त्याबद्दल फार काळजी करण्यात वेळ घालवू नये. काही गोष्टी पटकन सोडू देणे चांगले कारण वेळेनुसार बरेच प्रश्न आपोआप सुटतात.

शुभ दिवस/रंग:
यांच्यासाठी पांढरा, पिवळा, हिरवा आणि फिकट रंग शुभ मानले जातात. थोडक्यात सांगायचे तर, मूलांक ७ चे लोक हे स्वतःच्या विश्वात राहणारे, विचारप्रवण आणि आध्यात्मिक व्यक्ती असतात.

भाग्यशाली तिथी: प्रत्येक महिन्याची २, ४, ७, ११, १३, १६, २०, २२, २५, २९ आणि ३१ तारीख तुमच्यासाठी शुभ आहे.

भाग्य दिवस: प्रत्येक आठवडय़ातील सोमवार व रविवार तुमच्यासाठी भाग्यवान आहे. जर याच दिवशी तुमची भाग्यशाली तिथी असेल तर हा योगायोग तुमच्यासाठी शुभ ठरेल.

शुभ रंग: क्रीम, सफेद, पिवळा, गुलाबी तुमच्यासाठी भाग्यशाली आहेत. याशिवाय, विशेष कार्यासाठी फिक्कट लाल व फिक्कट पिवळा रंगही तुमच्यासाठी शुभ आहे.

भाग्यशाली वर्ष:
७, ११, १३, १६, २०, २२, २५, २९, ३१, ३४, ३८, ४०, ४३, ४७, ५२ व ६१वं वर्ष तुमच्यासाठी अत्यंत अनुकुल व लाभदायक आहे.

भाग्यशाली देव:
मूलांक ७च्या लोकांना चंद्राच्या बरोबरच गणपति आणि शंकराची आराधना केल्यास विशेष लाभ, यश , शांति व शक्ति संपादन करता येईल.

भाग्य मंत्र:
ॐ सौं सोमाय नम
ॐ नम शिवाय शुभम शुभम कुरु कुरु शिवाय नम ॐ
ॐ गं गणपतये गं नम

मूलांक ७ चे २०२६ चे भविष्य:
नवीन वर्ष २०२६ मूलांक ७ च्या लोकांसाठी नवीन संधी घेऊन येईल. नवीन वर्षात मूलांक 7 च्या लोकांना अनेक अनुभव घ्यावे लागतील. ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या ७, १६ व २५ तारखेला झालाय, त्यांचा मूलांक ७ असतो. मूलांक ७चा स्वामी ग्रह केतू आहे, तर २०२६ चा स्वामी ग्रह सूर्य आहे, जो ग्रहांचा राजा आहे.

नवीन वर्षात मूलांक ७ च्या लोकांनी जास्त काळजी घ्यायची आहे, खासकरून आपल्या करिअरबद्दल. जर तुम्ही कामाबद्दल गंभीर नसाल, तर तुमच्या नोकरीवर किंवा व्यवसायावर संकट येऊ शकते. तुम्हाला पुढे काय करायचे आहे, त्याबद्दल नवीन वर्षात पक्का निर्णय घ्या आणि कामाकडे लक्ष द्या. नाहीतर अडचणी वाढू शकतात. अंक ज्योतिषनुसार मूलांक ७ साठी नवीन वर्ष कसं असेल, त्यांच्या नोकरी, व्यवसाय, आरोग्य आणि आयुष्यात काय बदल होतील, ते पाहूया.
जे लोक राजकारणात आणि समाजसेवेत आहेत, त्यांच्यासाठी नवीन वर्ष खूप चांगली संधी घेऊन येणार आहे. त्यांचे पद आणि मान-सन्मान वाढेल. नेत्यांना मोठी जबाबदारी मिळू शकते, तर समाजसेवा करणाऱ्यांना जास्त आदर मिळेल. नवीन वर्षात तुमचे नाव उज्वल होऊ शकते.

करिअर आणि व्यवसाय – मूलांक ७ च्या लोकांनी जे करिअर निवडले आहे, ते तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, याचा पक्का निर्णय नवीन वर्षात घ्या. जर ते योग्य असेल, तर तुम्ही पूर्ण लक्ष देऊन काम करा आणि त्याला स्वतःला समर्पित करा. नाहीतर नवीन वर्षात तुमची नोकरी धोक्यात येऊ शकते.

अडकलेली कामे नवीन वर्षात पूर्ण होतील -जर तुमचे कोणतेही काम खूप दिवसांपासून अडकले असेल आणि पूर्ण होत नसेल, तर तुम्हाला नवीन वर्षात त्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. काळ अनुकूल असेल आणि यश मिळेल. प्रॉपर्टीचे वाद, कोर्ट केस अशा प्रकरणांमध्ये तुमच्या बाजूने निर्णय येऊ शकतो. जुलै ते डिसेंबर दरम्यानचा काळ तुमच्यासाठी खूप चांगला राहणार आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
१३. ०३. २०२६

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 114 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..