नवीन लेखन...

प्रसारमाध्यमातून झिरपणारी ‘नग्नता’

 

उदात्त प्रेम आज का निपजत नाही? पूर्वीची प्रेमगीते ही उदात्त होती, संस्कारक्षम होती, शरीर स्पर्शसुध्दा नव्हता. नग्नता मनाला शिवतही नव्हती. कालांतराने शरीर महत्वपूर्ण बनलं व शरीराचा एक्स-रे नग्नतेपर्यंत पोहोचला. आजची नग्नता बलात्काराच्याही पुढे तुकडे करणं, मारणं इतक्या विकृतीपर्यंत गेली आहे. उतान गाणी, दृश्ये यांनी मानवी मनेच नाही तर शरीरही उघडी केली आहेत.   पायातल्या वहाणा व त्याच्या जाहिरातीसाठी नग्नतेचा बहाणा करणारी आपली मधूमिलिद संस्कृती. आदीमानव नग्न होता, आजही काही आदिवासी नग्न राहतात. नग्न राहूनही संस्कृती जोपासता येते. नग्न म्हणजे विकृती असं बिंबवल्यानेच फार मोठे प्रश्न निर्माण झालेत. नग्नतेचं परिमाणच नव्या पिढीसमोर योग्य रितीने येत नाही. नग्नतेचा महामार्ग वासना व विकृतीकडेच जातो. असं बिंबवल्यामुळेच त्याचे परिणाम समाज भोगतोय.

नग्नतेतही सौंदर्य शोधायचं असतं. सत्यम्, शिवम्, सुंदरम् या दृष्टीने पहायचं असतं. नग्नतेतून वासनेकडे, भोगाकडे, विकृतीकडे जाण्याचे धडे लहानपणापासून मिळत आहेत. प्रेम हा सुंदर अविष्कार, पण त्याची परिणीती ‘न्यूड’ च्या रोडवरुन सेक्सकडेच जाणारी असते. अशी गाणी, दृश्ये  माध्यमाद्वारे, तंत्रज्ञानाद्वारे तरुण पिढीवर बिंबवणं चालू आहे.

उदात्त प्रेम दुर्मिळच झालय. ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर के तुम नाराज न होना’ म्हणणारे नायक गेले व शिस्त, अभ्यास, संयम याला तिलांजली देत पोरगी पटवणं हेच जीवनाचे अंतिम ध्येय तरुण पिढीला वाटत आहे. सैराट झालली पिढी धडकपणे हे सर्व करत आहे. माध्यमांनी त्यांच्यापुढे चुंबन, आलिंगन, कवटाळणे हे पर्याय ठेवले. त्यामुळे ही दृष्ये पाहून ही पिढी शॉक प्रुफ झालीय. याच्यानंतर नग्नतेचा चाप्टर हीच आपली इतिकर्तव्यता प्रत्येकाला वाटायला लागली.

काय पहायचं, किती पहायचं, कसं पहायचं, का पहायचं ही दृष्टीच न शिकवली गेल्यामुळे नग्नतेचं उदात्तीकरण झालं. एकेक अवयवावर लोक भाळू लागली. अभंग, श्लोक, म्हणी, अध्यात्म जावून स्त्रीचं सौंदर्य, शरीर महत्वाचं बनलं. फुल उमलण्याआधीच एकेक पाकळी तोडून फुलाचं अंतरगं पाहणं सुरु झालं. या दशेत अभ्यासक्रमातून सेक्स एज्युकेशन रुचत नाही, रुजत नाही, कारण जे रुचतं तेच रुजतं. सेक्स, अश्लीलता, नग्नता रुजतेय. रिमोट नसलेली प्रसारमाध्यमे हात जोडून सेवेला हजर आहेत. केवळ वैधानिक इशारा देणार्‍या दशेत, बलात्काराला फाशीची शिक्षा दिली तरी बलात्कार होतच आहेत. नग्नतेकडे पाहण्याची वेगळी दृष्टी कुटुंब, शैक्षणिक संस्था, समाजच देउ शकते. ज्ञानेश्वरीच्या काळात नग्नता मनाला ही शिवत नसेल, कारण अध्यात्मतेचे संस्कार असायचे. परिस्थिती बदलत गेली, शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रीकडे वाईट नजरेने बघितल्यास त्याचा चौरंगी करायच. नंतर प्रसार माध्यमांनी नको ते वाचायला, पहायला, नको ते करायला शिकवलं. लहान मुले ही नको ते नको त्या वयात पहायला लागली, जणू हेच जीवनाचं अंतीम फलीत.

‘ये मेरा प्रेमपत्र पढकर……’ म्हणणारा नामक, ‘तेरे चेहरे से नजर नही हटती’, ‘बाहों में चले आवों’, ‘तेरी आँखो के सिवा दुनिया में रख्खा क्या है’, म्हणत मूल्ये पायदळी तुडविलेल्या समाजात, शिस्तीचा बुरुज ढासळलेल्या समाजात संस्काराचे सोपस्कारच काही करु शकतील. कपडे शरीर झाकू शकतील, पण मनाचं काय? मनातून नग्नता जायला हवी. ती जाण्यासाठी प्रलोभनांना टाळायला हवं, मनाला, शरीराला गुंतवून घ्यावं लागेल. भौतिक प्रगती, पैसा. सदसदविवेक बुध्दीलाच नग्न करीत आहेत. व्हॉटस्अपवर प्रेयसीला कपडे काढून विवस्त्र व्हायला लावून तिला ब्लॅकमेल करणारी घटना नुकतीच घडलीय.

पोथीचं पारायण करणारी पिढी गेली, पोर्नच पारायण करणारी पिढी आली आहे. नग्नता विचारातली आचारातली जाणार कशी? ‘विरे दि वेडिग’ सिनेमात स्त्रीचं हस्तमैथून दाखवलय. इंग्रजी चित्रपटात, तर संभोग असतोच. भावना चाळवणारं आजुबाजुला असतांना नग्नता उफाळनूच येणार.

नग्नतेचं डॉक्युमेंटेशन इतकं झालय की ती समाजातून, मनातून जाण्यासाठी संस्काराचीच शिदोरी कामाला  येणार आहे. फ्राईडने म्हटलय की लोक ९०% सेक्सचाच विचार करतात. हा अविभाज्य भाग आहे, पण सर्वस्व नव्हे, वयात आल्यावर नग्नता, लैंगिकता ठिक, पण चिमुरड्यांपासून ते वृध्दांनाही ही लक्ष्मणरेषा नकोशी झालीय. वासनेनं बखटलल्या चिखलांत नग्नतेचीच कमळं उगवणार.   प्रसारमाध्यमांतनू फार भयंकर झिरपत आहे. जाहिरातीत सुध्दा ‘ती’च, ती सुध्दा ओले‘ती’. स्त्री शिवाय जाहिरातच नाही. कंडोमच्या डॉटची महती गाणार्‍या समाजात ‘नग्नताच’ कुरवाळली जाणार. कंडोमच्या जाहिरातीवर बंदी घालता आली नाही हे अपयश कोणाचे? नग्नतेच्या बाबतीत समाज इतका स्वमग्न झालाय की, भग्न व्हायच्या मार्गावर आहे. मन चांगल्या आचारविचारात मग्न झालं तरच नग्नता हद्दपार होईल. केवळ ‘नग्नतेला’ कुरवाळणार्‍या समाजाला काही भवितव्य नाही. अश्लीलता, लैंगिकतता, विकृती, वासना ही रांगेत उभी राहून दार ठोठावणारच.

‘तेरे चेहरे से नजर नही हटती, नजारा हम क्या देखे’, स्त्री सौंदर्यापुढे निसर्ग ही दुय्यम ठरु लागला. नग्नताच्या नादात स्त्रियांसमोर हस्तमैथून करण्यापर्यंत मजल गेली आहे. सौदर्याचा आस्वाद घेणारा  aesthetic Sense जावून नग्नता, वासना भोगणे एवढाच Sense राहिलाय. संभोगातून समाधीकडे नाही तर संभोगातून संभोगाकडे असा प्रवास सुरु आहे. अध्यात्मच्या नावाखाली अनेक संतानी, बुवांनी नग्नतेवरच आपला डोलारा, वैभव उभारले, तिथे सामान्यांची काय कथा. अनेक संत, बुवा आज गजाआड आहेत. Beauty lies in the eyes of beholder  जाऊन  Sex lies in the eyes of beholder आलं आहे.

सौंदर्याचे आयाम इतके बदलले की केवळ नग्नतेच सौंदर्य शोधणं सुरु झाले. नग्नतेपलिकडेही काही सात्विक, सुंदर आहे, सत्य आहे, शिवासारखे आहे हे जाणवायला हवं तरच विकृती संस्कृतीवर मात करणार नाही.

— डॉ. अनिल कुलकर्णी
मोबा. नं. ९४०३८०५१५३
ई-मेल – anilkulkarni666@gmail.com
अे-१३, रोहन प्रार्थना, गांधी भवन,
कोथरुड, पुणे ४११ ०३८.

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 26 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..