नवीन लेखन...

टिप्पणी – ६ : मोहेन-जो-दारो

बातमी : आशुतोष गोवारीकर यांचा ‘मोहेन-जो-दारो’ या सिनेमाबद्दल

संदर्भ : ‘लोकसत्ता’ मुंबई आवृत्ती, दि. २४ जुलै २०१६.

आजच्या लोकसत्तामध्ये (पुरवणीत) आशुतोष गोवारीकर यांच्या ‘मोहेन जो दारो’ या चित्रपटावर लेख आला आहे. या विषयावर त्यांनी केलेला अभ्यास कौतुकास्पद आहे. या विषयावरील experts ना सुद्धा ते कन्सल्ट करतच आहेत.

गेली कांहीं वर्षें मी या संस्कृतीविषयीं वाचन करत आलेलो आहे, (archology, language, ऋग्वेद आणि सिंधु-सरस्वती संस्कृती यांचा परस्पर संबंध, वगैरेंवर) . त्यामुळे, हा लेख वाचून मनात आलेले कांहीं विचार, आणि माहीत असलेली कांहीं माहिती, हें सर्व मांडावे, असें मला वाटलें.

• या सिनेमात ‘सिंधु माँ’ हें गीत आहे. याचें कारण उघड आहे की, या संस्कृतीला पूर्वी ‘सिंधु संस्कृती’ म्हणून ओळखत असत. त्यामुळे, तसें, हें गीत योग्यच आहे. पण, १९४७ नंतर झालेल्या उत्खननांमध्ये राजस्थान, हरियाणा, गंगा खोरे, दिल्ली भाग, वगैरे ठिकाणीही या संस्कृतीची अनेक स्थळें मिळाली आहेत. ( जसें की, धोलावीरा, ज्याचा उल्लेख आशुतोष गोवारीकर यांनी केलेला आहे), लोथल, कालीबंगन, राखीगढी इत्यादी . त्यातील बरीच स्थळें ‘लुप्त’ सरस्वतीच्या तीरांवर आहेत. त्यामुळे आतां संशोधक, हिचा ‘सिंधु-सरस्वती संस्कृती‘ असा उल्लेख करतात.

• राखीगढीमधील अवशेषांचा , IIT Kharagpur व Archeological Survey of India यांनी हल्लीच केलेल्या टेस्टसवरून, या संस्कृतीचा काळ इ.स.पूर्व ७००० वर्षें इतका आलेला आहे. ( तो याआधी इ.स.पू. ३५०० हजार ते साधारण २००० इतका मानत असत). राखीगढी तर मोहेन जो दारो च्या तिप्पट मोठें आहे.

• या संस्कृतीत ‘देव’ कोणता होता तें माहीत नाहीं, ( म्हणजेच, आराधना कुणाची करीत असत, तें ) , असें आशुतोष गोवारीकर म्हणतात.

पण, एस. आर. राव यांना कालीबंगन येथें यज्ञवेद्या सापडलेल्या आहेत. (आतां अन्यत्रही मिळू लागल्या आहेत). त्यातून, ही संस्कृती व ऋग्वेदीय संस्कृती यांचें एकत्व दिसून येतें. (असें कांहीं संशोधक म्हणतात, व तें योग्य वाटतें).

या संस्कृतीच्या मुद्रांमध्ये ”पशुपती’ची मुद्रा आहे. ती शिवाची प्रतिमा आहे, असें समजलें जातें. ‘आदिनाथ’ म्हणजे शिव असें हिंदू समजतात. परंतु, माझ्या एक जैन स्नेह्यानें सांगितलें की, त्यांच्या अनुसार, ही ’आदिनाथ’ म्हणजे त्यांचा प्रथम तीर्थंकर याची प्रतिमा आहे. जैन धर्म हा बराच पुरातन आहे, हें खरेंच आहे. कारण त्यांचा २४ वा तीर्थंकर महावीर वर्धमान व गौतम बुद्ध हे समकालीन होते.

माझ्या या जैन स्नेह्याला माहीत नाहीं , परंतु, असें आहे की ऋग्वेदीय ऋचेतील कांहीं उल्लेखांत जैन , किंवा पूर्व-जैन (प्री-जैन, प्रोटो-जैन) परंपरा कदाचित असेलही . उदा. ‘स्वस्ति न इंद्रो वुद्धश्रवा:’ या ऋचेत पुढे ‘अरिष्टनेमीचें नांव आहे ; आणि, अरिष्टनेमि हा — नंतरच्या काळातील कां होईना , पण —- एक जैन तीर्थंकर होता. तो श्रीकृष्णाचा चुलत भाऊ होता, व जैनइमध्ये त्याला ‘नेमिनाथ’ म्हणतात.

मात्र, पशुपतीची प्रतिमा ही जैनांच्या प्रथम तीर्थंकराची आहे, हें संशोधकांना कितपत मान्य आहे, तें सांगणें कठीण आहे.

पण, मुद्दा विचारणीय आहे, हें खरें. आणि मी अजून तरी कुठल्याही संशोधकाच्या पुस्तकात वा लेखनात हा मुद्दा पाहिलेला नाहीं .

 हा पशुपती Yogic Posture मध्ये बसलेला आहे. आतां, या संस्कृतीच्या इतर ठिकाणी योगिक आसनांतील व्यक्ती मुद्रांवर दिसतात. म्हणजेच, योगाचा प्रसार त्या काळीं झालेला असावा.
 या संस्कृतीच्या स्थळांवर मिळालेल्या phallus च्या शिल्पांवरून ही पूजासुद्धा त्या काळीं तिथें होती, असें दिसतें. त्यासाठी शिवलिंग सापडायची ज़रूर नाहीं .
 समाजशास्त्रीय अभ्यासावरून , त्या काळीं ‘मातृदेवतेची’ पूजा करत असत. मातृदेवता हें प्रॉडक्टिव्हिटीचें प्रतीक आहे.
 डी.डी. कोसांबी यांनी दाखवलें आहे की, तत्कालीन समाज विविध Totems वापरत असे, व त्या प्रतिमा त्यांच्या टोटेम्स् वर असत. (जसें रामायणाच्या काळात, सुग्रीव-हुमान यांच्या टोळीचें टॉटेम होतें ‘वानर’ ). यावरूनही, आराध्यांची कांहीं कल्पना येऊं शकते.
 सिंधु–सरस्वती संस्कृती व ऋग्वेदाचें एकत्व मान्य केलें तर, ऋग्वेवीय देवतांची (डेइटी) आराधनाही सिंधु-सरस्वती संस्कृतीत होत असली पाहिजें, जसें इंद्र, वरुण, मित्र / सविता/ आदित्य, अश्विनीकुमार इ.
• त्या काळीं चालत असलेल्या देवाणघेवाण व व्यापार, यांचा कितपत वापर आशुतोष गोवारीकर करत आहेत, त्याचा उल्लेख हा लेख करत नाहीं.
 मात्र, सिंधु-सरस्वती भाग आणि गंगा खोरें यांच्यात ‘लागवटीयोग्य पिकांच्या माहितीची’ देवाण घेवाण झालेली आहे. कांहीं पिकें सिंधु-सरस्वती मधून गंगा खोर्‍यात आलेली आहेत, तर कांहीं उलट दिशेनें गेलेली आहेत. ( त्याचा उल्लेख, लवकरच प्रसिद्ध होणार्‍या माझ्या एका हिंदी लेखात मी केलेला आहे).
 लोथलसारख्या स्थलांवरून, हें उघड आहे की, या संस्कृतीचा व्यापार मध्य-पूर्वेतील देशांशी चालत होता. तिकडे या संस्कतीच्या मुद्रा सापडलेल्या आहेत. ते लोक या संस्कृतीच्या भागाला ‘मेलुहा’ (Meluhha) म्हणत असत, हें आतां सर्वश्रुत आहे.
 भारतीय साहित्यात पणींचा उल्लेख येतो. ते म्हणजे, आफ्रिकेच्या उत्तर किनार्‍यावर वसत आलेले ‘फिनीशियन्स’.
 भारतीय साहित्यात असुरांचा उल्लेख येतो. ते म्हणजे, ‘अहुर(असुर) मज़्द’ चे पूजक इराणी लोक, व असुरीयन्स (असीरियन्स).
 या सर्वांवरूनही या संकृतीचा इंटरनॅशनल संबध दिसून येतो. तसेंच , या संस्कृतीचें नौकानयनातील प्राविण्यही दिसून येतें.

• एक महत्वपूर्ण गोष्ट. गेल्या पंधरावीस वर्षांमध्ये श्रीकांत तलगेरी यांनी सप्रमाण, ऋग्वेदीय ऋचांच्या सहाय्यानें , असें दाखवून दिलेलें आहे की, या संस्कृतीवा उगम गंगा-खोर्‍यात झाला, व तेथून ती सिंधु-सरस्वती भाग व अफगाणिस्तान-इराणकडे पसरली.

अर्थात, ’आर्यन परकोलेशन’ची थिअरी मानणार्‍या हार्वर्ड मधील विट्.झेल व इतर संशोधकांना हें मान्य नाहीं, व त्यावर बराच वादविवाद चालूं आहे.

टीप : ‘आर्यन इन्व्हेजन थियरी’ आतां कालबाह्य झाली आहे, व ‘आर्य हे भारतात बाहेरून, पश्चिमेकडून, आले’ असें मानणारे संशोधक आतां ‘आर्यन परकोलेशन थियरी’ मानतात, म्हणजेच, बाहेरून भारतात आगमन झालेल्या आर्यांचें भारतात हळूंहळूं सम्मीलन झालें. खरें तर, ‘आर्य’ हें कुठल्याही जनसमूहाचें नांव नाहींच. पण तो एका वेगळ्या लेखाचा विषय आहे.
मात्र, ही तलगेरी यांची थियरी महत्वाची आहे. या संस्कृतीला ‘सिंधु-सरस्वती-गंगा संस्कृती’ असें आतां नांव द्यायला हवें.

सुभाष स. नाईक.
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.

Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..