नवीन लेखन...

नव्या वाटा

नुकताच इयत्ता १२ वी. एच.एस.सी. चा निकाल जाहीर झाला. संपूर्ण महाराष्ट्रात नाव कमावलेली “सूर नवा ध्यास नवा” या संगीत कार्यक्रमातील एक सळसळते व्यक्तीमत्व शरयू दाते या परिक्षेत कला विभागात ८२ % गुण मिळवून ऊत्तीर्ण झाली. त्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा.

आता मुळ विषयावर येतो. शरयूचे कौतुक करणे हा मुळी या लिखाणाचा विषयच नाहीय. कारण ती एक हुशार अभ्यासू मुलगी आहे व तिच्या यशा बद्दल तिचे जरूर कौतुक आहे पण मला तिच्यापेक्षाही तिच्या आई वडिलांचे कौतुक करायला अधिक आवडेल व तोच माझा या घडीचा लेखन विषय आहे.

सध्या बरेच पालक आपल्या मुलास किंवा मुलीस ते मुल ५ / ६ वर्षाचे असतानाच गायन, वादन, नृत्य अशा कोणत्या तरी कलेचे शिक्षण घेण्यासाठी क्लास लावतात. सर्वच मुलांना त्यांची आवड असते असेही नाही. काहींना जन्मजात देणगी असते अशी मुले योग्य मार्गदर्शन व परिश्रम घेतल्यास उत्तम कलाकार बनतात. शरयू दाते हे ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे.

आता होतं काय के जे पालक मुलाला गायन किंवा वादन शिकण्यासाठी चौथी पाचवी पासून जिवाचा आटापिटा करतात तेच पालक मूल नववी किंवा दहावीत गेले की त्याचे हे शालाबाह्य शिक्षण बंद करतात व फक्त अभ्यास एके अभ्यास एवढेच सुरु. मग १० वी नंतर सायन्सला प्रवेश व १२ वी पर्यंत त्या मुलाला अक्षरशः अभ्यासात डांबून ठेवतात. बारावी बरोबरच मग अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय प्रवेश परिक्षा व एकदा का आपले मुलाला ईंजीनियरींग ला प्रवेश मिळाला की जग जिंकल्याचा आनंद. वैद्यकीय विभागामधे जर चुकून माकून प्रवेश मिळालाच तर मग स्वर्ग दोन बोटेच ऊरतो. अशा वेळी त्या मुलाने गायन वादन ही कला आत्मसात करण्यासाठी जे कष्ट घेतले ते मातीमोल होतात. त्या साठी घेतलेले श्रम व पैसा व्यर्थ जातो. बरं प्रवेश घेताना आपल्या मुलाची खरोखर मेडीकल किंवा ईंजीनियरींगचे शिक्षण घेण्याची पात्रता आहे का याचा जराही विचार केला जात नाही. मुलाला कशाची आवड आहे तेही विचारात घेतले जात नाही. व मग तो मुलगा किंवा मुलगी ईंजीनियर होतात व जग रहाटीप्रमाणे जिवन जगू लागतात. ज्यांची पात्रताही नसते व आवड तर त्याहून नसते ती अयशस्वी होतात त्यांची अवस्था तर फारच वाईट होते. त्यामुळेच मी वर लिहिल्याप्रमाणे शरयूचे पालक अभिनंदनास अधिक पात्र आहेत. त्यांनीही जर तिला १० वी नंतर सायन्सला घातले असते व नंतर सर्वांप्रमाणे १२ वी व मग ईंजीनियरींग असे चाकोरीबद्ध शिकवले असते तर तिही गायन सोडून त्या चक्रात अडकली असती व महाराष्ट्र एका चांगल्या गाईकेला मुकला असता. असा चाकोरी बाहेरचा निर्णय घेणारे पालक फार कमी असतात. माझ्या एका मित्रानी सुध्दा त्यांच्या बोर्डात नंबर आलेल्या मुलीची कला विषयांची आवड पाहून तिला त्या प्रमाणे शिक्षण दिले ती मुलगी बी.ए. ला गोल्ड मेडलीस्ट म्हणून पास झाली नंतर एम.ए. करुन आता पी.एचडी. करतेय. त्यामुळे अशा चाकोरी बाहेरील शिक्षण घेणाऱ्या मुलांचा व विषेषतः त्यांच्या पालकांचा मला कायम अभिमान वाटतो.

पुन्हा एकदा शरयू व तिच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन.

— सुरेश काळे
मो. ९८६०३०७७५२
सातारा.
३१ मे २०१८

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..