नवीन लेखन...

प्रख्यात पटकथा लेखक, दिग्दर्शक नासीर हुसेन

नासीर हुसेन यांच्या चित्रपटाचे प्रत्येकच गीत अप्रतिम असायचे. त्यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९३१ रोजी झाला. नासीर हुसेन हे भोपाळवरून मुंबईला आले व शशाधर मुखर्जी यांच्या फिल्मीस्तान स्टुडीओत पटकथा आणि संवाद लेखक म्हणून नोकरीला लागले. तेव्हा ते कारदार साहेबांच्या सहाय्यकाची पण भूमिका निभावत होते. कारदार साहेब म्हणजे त्या काळातले नामवंत दिग्दर्शक. त्याकाळात मा.नासीर हुसेन यांनी ‘अनारकली’, मुनीमजी आणि ‘पेइंग गेस्ट’ या चित्रपटांचे पटकथा लेखन केले होते. १९५८ मध्ये अचानक शशाधर मुखर्जी यांना एक वेगळी आणि स्वतंत्ररीत्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिली चित्रपट होता.. ‘तुमसा नही देखा’. या चित्रपटापासूनच शम्मी कपूर सिनेसृष्टीत प्रस्थापित झाले, सिनेमा खूप गाजला. त्यांचे यश बघून लगेच शशाधर मुखर्जी यांनी त्यांना दुसरा चित्रपट दिग्दर्शित करायला दिला. चित्रपट होता ‘दिल देके देखो’. या चित्रपटाचे विशेष असे कि यात दोन महिलांनी पदार्पण केले होते. या चित्रपटाची नायिका ‘आशा पारेख’ आणि दुसऱ्या संगीतकार ‘उषा खन्ना’. चित्रपट संगीतामुळे खूप गाजला होता. चित्रपट संगीतामुळे खूप गाजला होता. या चित्रपटानंतर ‘आशा पारेख’ नासीर हुसेन यांच्या प्रत्येक चित्रपटात होती अगदी १९७१ च्या ‘कारवा’ पर्यंत. ‘दिल देके देखो’ च्या यशानन्तर ‘नासीर हुसेन’ यांनी आपली स्वताची निर्मिती कंपनी ‘नासीर हुसेन फिल्म’ ची स्थापन केली आणि स्वतःच निर्माता दिग्दर्शक ची भूमिका निभावीत पहिला चित्रपट काढला देव साहेबांचा ‘जब प्यार किसी से होता है’, हा सुद्धा चित्रपट खूप गाजला होता. चित्रपटातील सर्व गाणी सुपरहिट होती. त्यांचा दुसरा चित्रपट होता ‘फिर वही दिल लाया हु’. या सर्व नावांवरून एक कल्पना येते कि नासीर हुसेन यांच्या चित्रपटात गाण्यांना किती महत्व होते आणि संगीत हा त्यांच्या चित्रपटाचा कळीचा मुद्दा होता तो अगदी ‘क़यामत से क़यामत तक’ पर्यंत. ‘फिर वही दिल लाया हु’ मध्ये त्यांनी आपल्या गुरुचा म्हणजे शशाधर मुखर्जी यांचा मुलगा ‘जॉय मुखर्जी’ यालाच आपला नायक म्हणून निवडले होते तर नायिका मा.आशा पारेखच होत्या. बंदा परवर थाम लो जिगर बन के प्यार फिर आया हु ….खिद मत मे आप की हुज़ूर फिर वोही दिल लाया हु ….’रफी ने हे गायलेले गाणे …ओ. पी. नय्यर यांच खास रीदम….’मेलोडीयस गाणे’…..अशा अनेक ‘ सुमधुर ‘ ‘क्लास्सिक’ गाण्यांचा खजिना असलेला ‘फिर वोही दिल लया हू…’हा खूप गाजला. मा.नासिर हुसेन हे निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून चित्रपट बनवत. चमकदार, प्रणयप्रसंग, गीत, संगीत, रहस्य अशा वैशिष्ट्यांचे जब प्यार किसीसे होता है, तुमसा नही देखा, दिल देके देखो, यादों की बारात हे मा.नासिर हुसेन चित्रपट असत. पण त्यातही ‘तिसरी मंजिल’ वेगळाच मानला जातो. मा.‘मजरूह सुलतानपुरी’ हे मा.नासीर हुसेन यांचे आवडते गीतकार होते म्हणूनच सर्व तरुण वर्ग घेऊन काढलेला ‘क़यामत से क़यामत तक’ चे सुद्धा गाणी त्यांनी ७० वर्षांच्या मजरूह सुलतानपुरी यांच्या कडूनच लिहून घेतली होती. मा. नासिर हुसेन आपल्या काळातील एक यशस्वी निर्माते राहिले. त्यांचे पुत्र मंसूर खानदेखील यशाच्या शिखरावर पोहचले. आमीर खानसोबत मंसूर यांनी कयामत से कयामत तकच्या यशाचा इतिहास लिहिला. जो जीता वही सिकंदर, अकेले हम अकेले तुम आणि जोश चित्रपटांच्या यशानंतर मात्र ते दिग्दर्शनापासून दूर होत गेले. ताहिर हुसेन नासीर हुसेन यांचे भाऊ, त्यांच्या बरोबर ताहिर हुसेन यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. प्रारंभीच्या काळात त्यांनी नासीर हुसेन यांना निर्मिती आणि दिग्दर्शनात “तुमसा नही देखा’, “दिल दे के देखो’ अशा काही चित्रपटांसाठी मदत केली. आमिर खान चे मामा म्हणजे नासिर हुसेन.

आशा पारेख यांचे नासिर हुसेन यांच्या बरोबर सोबत नाते होते. अनेक अभिनेत्यांबरोबर पडद्यावर रोमान्स करणा-या आशा पारेख यांना त्यांच्या खासगी आयुष्यात मात्र प्रेम प्राप्त होऊ शकले नाही. त्यांनी लग्न केले नाही. १९५९ मध्ये ‘दिल दे के देखो’ सिनेमात दिग्दर्शक नासिर हुसेन यांनी आशा पारेख यांना शम्मी कपूर यांच्यासोबत कास्ट केले होते. या सिनेमानंतर त्यांची जवळीक वाढली होती. मा.नासिर हुसेन यांच्याबरोबर आशा पारेख यांच्या प्रेमाची चर्चा इंडस्ट्रीत खूप रंगली. नासिर हुसेन यांचे निधन १३ मार्च २००२ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

नासिर हुसेन यांच्या चित्रपटातील गाणी

https://www.youtube.com/watch?v=CC_Xndynj7E

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..