नकारात्मक विचारांची चांगली माणसं !!!

आपण सगळेच जगासाठी तरी सकारात्मक विचारांचे पाईक असतो. याचा अर्थ आपण फक्त सकारात्मकच विचार करतो, असं नाही. आपल्याही मनात नाकारात्मक विचार ठाण मांडून बसलेले असतातच. ते खूप चिवट असतात, लवकर निघत नाहीत, हाकलून दिले तर पुन्हा पुन्हा येतच राहतात मग या वर उपाय म्हणून आपण नाईलाजाने सकारात्मक विचार सुरू करतो, त्या वेळी आपलेच नकारात्मक विचार आपल्या कडे पाहून छद्मी हसत असतात…..

मग सकारात्मक विचारांचे खोटे मुखवटे घातल्या पेक्षा नकारात्मक विचारांचे खरे चेहरे मुलूल दिसत असले तरी ते खरे वाटतात !
*
मला नाकरात्मक विचारांची माणसे आवडतात ! (धाडसाने बोलतोय हं)
नकारत्मक विचारांची माणसे आपल्या विचारांवर खूप ठाम असतात !
म्हणजे बघा,
“डोळ्यांनी अधू असलेला अलेक्सझांडर जग जिंकायला निघाला, अर्ध्याच्या वर त्याने जग जिंकले सुद्धा, त्याला 10 फुटांच्या पुढचे दिसत नव्हते !”
हे वाक्य वाचून तुमचे डोळे नक्कीच विस्फारले असतील आणि मनोमन तुम्ही त्याच कोतुक केले असेल न ?
पण नकारात्मक विचसरांचा माणूस मात्र लगेच म्हणतो, “म्हणूनच जग जिंकायला निघाला.”
मी विचारलं म्हणजे रे काय?
तर म्हणे, “अरे ज्या माणसाला 10 फुटांच्या पलीकडचे दिसत नाही, त्याला वाटतं जग तेवढंच आहे, आपण जिंकू ! असं 10 – 10 फूट करत करत तो अर्ध्या जगापर्यंत पोचला, मग त्यात काय एवढं?”
मी मनोमन हात जोडले, लॉजीकली त्याचं म्हणणं पटलं मला !
*
एक मित्र आहे, कधीही भेटलं तर त्याची आयुष्य, नियती, परिस्थिती, राजकारण, सिस्टीम, घर, मुलं, मित्र, दुकानातले नोकर, MSEB, Net, मनपा यांच्या विषयी तकारारीच तक्रारी असतात. गेल्या 20 वर्षात त्याला एकदाही, एकाही गोष्टी बद्दल ‘चांगलं’ बोललेलं मला आठवत नाही !
या मित्राला आठवड्यातून किमान एकदा तरी मी आवर्जून भेटतोय भेटतो ! कारण याला भेटलं की “मी खूप सुखात” असल्याची जाणीव मला होते.
*
काही काही लोकं सतत काळजीत असतात, त्यांना सतत काही ना काहीतरी काळजी असतेच असते. त्यात अशी माणसं वयस्कर असतील तर विचारूच नका. या जगाचं काय होणार? पासून ते आज वरच्या टाकीतलं पाणी संपलं तर उद्या कश्याने ‘धु’ इथपर्यंत सगळी काळजी असते त्यांना !
या सगळ्या काळज्या मिटल्याच तर, “आता कशाची काळजी करू?” याची काळजी त्यांना लागून राहिलेली असते !

तळ टीप :- “नकारात्मक विचारांची माणसं मला आवडतात” हे वाक्य वाचून जर तुम्हाला मी विचित्र/विक्षिप्त वाटलो तर थोडं थांबा……
आता असा विचार करा, नकारात्मक विचारांचा सुद्धा कित्ती सकारात्मक पद्धतीने विचार केलाय या अवलीयाने…..

— विनोद डावरे, परभणी.
31-05-2018

●● सहजच सुचलं – 70 ●●विनोद डावरे
About विनोद डावरे 3 Articles
मुक्काम परभणी. विविध विषयांवर लेखन. सहजच सुचलेले विषय आणि त्यांची मांडणी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सोलापूर घोंगड्या

सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

Loading…