नवीन लेखन...

मूर्ख लक्षणे : ओळख आणि उपाय

समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या माध्यमातून संसारात सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालून संसारीक आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग लोकांना सांगितला आहे. सर्वांना वाटते की तो शहाणा आहे. आपण अनेकदा मूर्खासारखे वागतो, पण आपल्याला ते कळत नाही. मूर्खपणा  सोडल्याशिवाय आपण सांसारिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात सफल होऊ शकत नाही.

मूर्खलक्षण समजावून समर्थांनी मूर्खांचे विविध लक्षणांचे अत्यंत सूक्ष्म वर्णन केले आहे. त्याचा सार खालीलप्रमाणे आहे:

घरातील वागणुकीत मूर्खत्व प्रकट होते, जेव्हा एखादा व्यक्ती आई-वडिलांशी विरोध करून फक्त पत्नीलाच सखी मानतो. पत्नी आणि मुलांसमोर आई-वडिलांना शिव्या देतो. परिणाम भविष्यात त्याला ही तेच भोगावे लागेल. घरातील लक्ष्मीऐवजी परस्त्रीवर प्रेम करतो. भविष्यात त्याची दशा “धोबी का कुत्ता, घर का ना घाट का” सारखी होईल. घरातील पूर्वापार चालत आलेल्या सनातनी परंपरांचा विरोध करून देव-पितरांचा अपमान करतो, आई-वडिलांना कमी लेखतो—हे सर्व मूर्खत्वाचे लक्षण आहे. घरात दारिद्र्य असले तरी बाहेर पूर्वजांची/वडिलांची कीर्ती जो सांगतो, त्याची समाजात लोक खिल्ली उडवितात. त्याला मूर्ख म्हणतात.

समर्थ म्हणतात, घराबाहेरच्या वागणुकीत एखादा व्यक्ती श्रेष्ठांसमोर अहंकार दाखवतो, कारण नसताना हसतो, विवेक न धरणे किंवा अनेकांशी  वैर करतो. स्वकीयांना दूर ठेवून परक्यांशी मैत्री करतो, जागरणात जाऊन झोपतो, दुसऱ्याच्या घरी अतिशय जेवण करतो, व्यसनांत बुडून राहतो, आळशीपणात संतोष मानतो—ही मूर्खाची लक्षणे आहेत.

समर्थ पुढे म्हणतात, कामवासनेने निर्लज्ज होऊन मर्यादा सोडणे, रोग असूनही औषध न घेणे, सोबतीशिवाय विदेश जाणे, मान मिळणाऱ्या ठिकाणी वारंवार जाणे, श्रीमंत नोकराच्या अंकित होणे किंवा कारण न विचारता दंड देणे हीही मूर्खाची वागणूक आहे. एखादा व्यक्ती घरी विवेक सांगतो पण सभेत बोलताना लाजतो किंवा घाबरतो. श्रेष्ठ व्यक्तींशी फाजील सलगी करतो आणि आपले ज्ञान वाया घालवतो.

वरील दोषांपैकी अनेक दोष आपल्या मध्येही असतील. पण समर्थांनी फक्त मूर्खपणाची लक्षणे सांगितली नाहीत, तर ते दूर करण्याचा उपायही सांगितला आहे.

समर्थ म्हणतात, मूर्खत्व हे विवेकाच्या अभावी येते. म्हणून आपण प्रत्येक कृतीचा विचार करून योग्य-अयोग्य याचा निर्णय घेऊन मग कृती करावी किंवा बोलावे. यासाठी समर्थ सांगतात, आपण एकांतात बसून मनाचे परीक्षण केले पाहिजे. स्वतःच्या दोषांचा विचार करून त्यांचा त्याग करण्याचा उपाय शोधावा.

समर्थांनी दासबोधात मनाला योग्य दिशा देण्याचे मार्ग सांगितले आहेत—वासना, अहंकार, लोभ यांवर नियंत्रण ठेवणे आणि सात्विक विचार स्वीकारणे. समर्थ म्हणतात, इंद्रियजनित मूर्खपणाचा नाश करण्यासाठी ईश्वरभक्ती हा सर्वोत्तम उपाय आहे. भक्तीने मन शुद्ध होते आणि आत्मज्ञान प्राप्त होते.

समर्थ म्हणतात, दुसऱ्यावर अवलंबून न राहता परिश्रम करून स्वावलंबी व्हावे. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि मूर्खपणा दूर होतो. दररोज काही वेळ काढून आपल्या चुकीच्या कृतींचा विचार करून त्या कशा दूर करता येतील, याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करावा. हे सर्व उपाय केले की हळूहळू का होईना, आपल्यातील मूर्खपणाचे दोष आपण दूर करू शकतो.

– विवेक पटाईत 

Avatar
About विवेक पटाईत 201 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..