मुंगळा

मुंगीचे मिस्टर कोण आणि मुंंगळ्याची मिसेस कोण? या बालवयात निरागस जिज्ञासेपोटी विचारलेल्या माझ्या संयुक्त प्रश्णावर मास्तर खूपच कावले आणि निरुत्तर होउन उत्तरापोटी त्यांनी मला तास संपेपर्यंत वर्गाच्या दारात अंगठे धरुन उभे रहायची शिक्षा ठोठावली. शिक्षेच्या अम्मलबजावणीत केलेला माझा अगाउपणा माझ्या चांगलाच अंगाशी आला. पायानी हाताचे अंगठे पकडायला गेलो आणि उंब-यावर दुबुक्कन पडलो. वर्गातली मुल मला फिदीफिदी हसली. खासकरुन मुली हसल्यानी मी जास्तच अपमानित झालो आणि त्याच दिवशी शाळा सुटल्यावर घरा जवळच्या पानटरीत जाउन विडा उचलला, गुरुजीं एवढा मोठा झालो की नाही मुंगी आणि मुंगळ्याच्या नातेसंबंधांवर संशोधन केल तर शाळेच नाव नाही लावणार.

पन्नास-साठ वर्ष लोटली आणि परवा अचानक संधी आल्यासारखी वाटली. पार्किग लॉटमधे मधे गाडी पार्क करताना डाव्या बाजूच्या पुढच्या टायरला खेटून एक मुगळा तिरकस आणि संथ चालीनी एका वारुळाच्या दिशेनी सटकायला बघत होता. त्याची चाल बघुन दोन शंंका मनात आल्या एक तर तो मुंगळा मुळव्याधग्रस्त असावा किंवा माझ्या गाडीच पुढच डाव चाक त्याच्या मागच्या उजव्या पायाला खेटुन गेल असाव.

संथ गतीनी तो ज्या वारुळाच्या दिशेनी निघाला होता त्या वारुळाच्या दारात ब-याच काळ्या मुंग्या उषा मंगेशकरांच्या ” मुंगळा, मुंगळा” आयटेम सॉंगवर जल्लोश करत मुंगळ्याची वारुळाच्या प्रवेशद्वारापाशी वाट बघत होत्या. जसा व्याधीग्रस्त मुंगळा त्यांच्या टप्यात आला, काही धष्टपुष्ट मुंग्या पुढे सरसावल्या आणि पुल आणि पुष करत करत त्याला वाजतगाजत वारुळात घेउन गेल्या.

बिचा-याच आत काय होतय कोणास ठाउक? माझ संशोधन मात्र खोळंबलय. जेवणखाण सोडुन मी पार्किंगमधेच मुंगळ्याची वाट बघतोय!

— प्रकाश तांबे
8600478883

Avatar
About प्रकाश तांबे 44 Articles
मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..