नवीन लेखन...

राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन

तुम्ही या महिनाभरात दिल्लीत जाणार असाल, तर राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन पाहण्याची तुम्हाला संधी आहे. पंधरा एकरांवर असलेल्या या गार्डनमध्ये तुम्हाला असंख्य भारतीय व परदेशी फुले पाहायला मिळतील. मुघल गार्डन आज पासून, म्हणजेच ५ फेब्रुवारीपासून ६ मार्चपर्यंत सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. मात्र, दर सोमवारी ते देखभालीसाठी बंद राहील आणि होळीनिमित्तही ते बंद राहणार आहे. व, ते पाहण्यासाठी कोणतेही तिकीट नाही.

ही बाग पाहण्यासाठी भारतातूनच नाही तर परदेशातूनही हजारो पर्यटक येतात.

– राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन म्हणजे मुघल साम्राज्याच्या ऐश्वर्यपूर्ण सौंदर्याचा नजराणा आहे. या बागेवर मुघल-ब्रिटिश सौंदर्याची छाप आहे. फेब्रुवारी ते मार्च महिन्यात सर्वसमान्यांना या शाही बागेत फेरफटका मारण्याची संधी मिळते. १३ एकरात पसरलेली ही बाग राष्ट्रपती भवनाच्या पिछाडीस आहे.

– दिल्ली शहराची उभारणी करणारा सर एडवर्ड ल्युटन्स याने या मुघल गार्डनची उभारणी केली होती. कलेचे कोणतेच तांत्रिक शिक्षण घेतलेले नसताना अंगभूत हुशारी आणि कल्पकतेने सर एडवर्ड ल्युटन्सने इंग्लंडमध्ये अनेक अमीर, उमराव, सरदारांच्या इमारती बांधल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रपती भवनाचा आराखडाही त्यांनीच तयार केला. या मुघल गार्डनची निर्मिती करून सर एडवर्ड ल्युटन्स यांनी आपली सौंदर्यदृष्टी दाखवली आहे. ब्रिटिश काळातील भारतातील व्हाइसरॉय व गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग्जच्या पत्नीसाठी ते उभारण्यात आले.

– देशातील अप्रतिम बगीच्यांमध्ये ही बाग आजही आपला नावलौकिक राखत अग्रेसर आहे.

– रंगीबेरंगी ८ प्रजातींच्या ट्युलिप्सच्या बागा या राष्ट्रपती भवनातील प्रमुख आकर्षण आहे. एकट्या गुलाबाच्याच तिथे १५० हून अधिक जाती आहेत, शिवाय कधीच न पाहिलेली फुले आणि त्यांची झाडे तिथे आहेत. येथे ट्युलिप्सची एकूण १० हजार झाडे आहेत. ही ट्युलिप्स खास नेदरलँड्स वरून मागवण्यात आली.

– या बागेत असणारे सहा कमळाकृती कारंजी तिच्या सौंदर्यात आणखी भर घालताहेत मुघल गार्डनच्या भोवती कार्यालयीन इमारती, कर्मचारी निवास व्यवस्था आहे.

– ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या कलात्मक दृष्टीतून साकारलेली ही अनोखी बाग पाहणं हा पर्यटकांसाठी नेहमीच असीम आनंद असतो.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..