नवीन लेखन...

माझी तत्वसरणी :: धर्माचरणांचा कार्यकारणभाव.

गुरुवार ५ जानेवारी २०१२.

माझी तत्वसरणी कदाचित कुणालाही सहजासहजी पटणार नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीपण, ती सर्वाना सांगण्याचा मोह टाळता येत नाही. विचारांची दिशा म्हणजे विचारसरणी….तसेच तत्वांची दिशा म्हणजे तत्वसरणी असा अर्थ समोर ठेऊन मी हे लेख लिहिले आहेत. दैनंदिन जीवनात आपण, दिवसाचा काही भाग, विशेषतः आंघोळीनंतर, देवपूजा, पोथ्या वाचन, जपजाप्य, मंत्रपठण, ध्यानधारणा, एखादे स्तोत्र म्हणणे वगैरेत घालवितो. ही सर्व धार्मिक आन्हिके, पुरातन काळापासून आचरली जात आहेत. ही आन्हिके केव्हातरी, कुणीतरी, काही विशिष्ट उद्देश ठरवून प्रचारात आणली असावीत. दिवसाचाकाही काळ, इतर विचार बाजूस सारून, चांगले सात्विक विचार मेंदूत यावेत हाच असावा असे वाटते.विज्ञानीय दृष्टीकोनातून या सर्वांचे मनन केल्यास, बर्‍याच बाबींचा उलगडा होतो. पहिली महत्वाची बाब म्हणजे, ज्या उद्देशाने ही धर्माचरणे रूढ केली तो उद्देश म्हणजे स्वच्छ आणि पवित्र वातावरणात होणारी ध्यानधारणा, मेंदू शांत होऊन होणारे मंद श्वसन, चित्ताचे केंद्रीकरण वगैरे वास्तव घटकांचा शरीरावर होणारा चांगला परिणाम याचे फळ मिळते. आपल्या पूर्वज विचारवंतांनी नेमका हाच विचार केला असावा. याच पवित्र वातावरणात, धार्मिक पोथ्या वाचण्याऐवजी, वर्तमानकाळातील विचारवंत लेखकाचे सुविचार असलेले लेख वाचले तरी तोच परिणाम साधता येणे शक्य आहे असे मला वाटते. बहुसंख्य व्यक्ती सध्या जी धर्माचरणे करतात त्यामुळे त्यांचा उद्देश सफल होतोचअसे नाही. शरीर, ही आचरणे करीत असते पण मन मात्र भलतीकडेच भरकटत असते. बसमध्ये, गाडीत किंवा बसथांब्यावर, बर्‍याच व्यक्ती, पोथ्या किंवा स्तोत्रे वाचतांना आढळतात. दुसरा महत्वाचा निष्कर्ष म्हणजे, अंधश्रद्धा. उदा. शनीची साडेसाती. शनी ग्रह, त्याची ठरविक राशीच्या ्यक्तींना होणारी पिडा, ती पिडा कमी करण्यासाठी किंवा नाहीशी करण्यासाठी, रोज शनीच्या पोथीचे वाचन, म्हणजे शनीमहात्म या पोथीचे वाचन. चित्रातल्या हंसाने, मूर्त स्वरूपात जिवंत होऊन, वास्तव स्वरूपात असलेली मोत्याची माळ गिळून काही वर्षांनंतर तीपरत, होती तशीच पुन्हा पूर्ववत आणून ठेवणे वगैरे. शनीच्या पोथीतील कथानकावर तुमचा खरोखर विश्वास बसतो का? नीट विचार करून ठरवावे.वास्तविक शनीचे गुरुत्वाकर्षण, पृथ्वीवरच्या सर्व चराचरांवर, त्या प्रत्येकाच्या वस्तुमानानुसार कमीअधिक प्रमाणात असते. तर मग ठराविक राशींच्या व्यक्तींना बरोबर हुडकून काढून तो पिडा कशी देऊ शकतो? ज्योतिष्य शास्त्रानुसार, शनीमहाराज, नेहमीच कोणत्या ना कोणत्या राशीच्या व्यक्तींना, आपल्या वक्र दृष्टीची पिडा देत असतो. या सर्वांचा कार्यकारणभाव मात्र कुठेच दिलेला नसतो. तो जर शोधता आला नाही किंवा समजला नाही तर ही धर्माचरणे म्हणजे केवळ देखावा ठरून मानसिक समाधान मिळविण्यासारखे आहे. या आणि यासारख्या अनेक धर्माचरणांचा, विज्ञानीय दृष्टीकोनातून कार्यकारणभाव शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न, ‘माझी तत्वसरणी’ या लेखमालिकेत मी केला आहे.

— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..