माझं नाटक !

मला नाटकात काम करायची हौस कधीच नव्हती. लहानपणी नाटकात किंवा सिनेमात सगळं खोटं असतं हे सत्य भिनलं होतं. लहान मुलांच्या विविध वेष स्पर्धेत (Fancy Dress Competition) मध्ये मला एक गुराखी बनवला होता. “अहो मी गुराखी आलो, गुरे घेऊन चाराया ” हे गाणं म्हणत स्टेजवर नाचलो. मला बक्षीस मिळालं होतं. तोच अनुभव ! परत एकदा शाळेच्या वार्षिक समारंभात मला एका शूर लढवय्याची भूमिका मिळाली. संवाद विसरलो म्हणून मास्तरांनी माझ्या तंगडीवर छडी मारली. हेच निमित्त धरून मी नाटकात काम करणार नाही असं ठरवलं.

१९५२ साली मी कौलेजात प्रवेश घेतला. आभ्यासात मी जेमतेम होतो पण माझं सर्व लक्ष संगीताकडे वेधलं होतं. प्राध्यापक जी. बी. कुलकर्णी यांनी मला प्रोत्साहन दिलं. कौलेजच्याच विद्यार्थ्यांचा मी एक संच तयार केला. और्केस्ट्रा, स्वागत गीत, किंवा कोणी पाहुणे कलाकार आले तर यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाला साथ असे प्रकार झाले.

त्यावर्षी ” देवमाणूस” हे नाटक करायचं असं कौलेजात ठरलं. पात्रांची निवट झाली. हे “संगीत” नाटक असल्यामुळे यात मला वाव मिळेल म्हणून मी नांव दिलं. त्यातल्या त्यांत कमी संवादाचं पात्र मिळाल्यास मी संगीताचा भाग सहज सांभाळेन असं मीच सुचवलं. त्यानुसार मला “जिवबा” या एका खेडवळ शेतकर्याची भूमिका देण्यात आली. या पात्राला संवाद कमी आणि प्रवेशही कमी. मी माझे संवाद पाठ केले. आणि संगीताची सुद्धा तयारी चालू केली. मुख्य पात्र ‘अनिल’ च्या तोंडातली गाणी जुळवून ठेवली. अनिलची भूमिका करणारा स्वत: जनरल सेक्रेटरी असल्यामुळे त्याचा मान मोठा. “मी गाणार नाही” म्हणाला. “नको गाऊंस, फक्त ओठ हलव, मी पार्श्व संंगीतात गाईन” मी म्हणालो. त्यालाही तो तयार नव्हता. संगीताशिवाय नाटक असा त्याने फतवा केला. “मग माझं काय काम? मी नाटकात काम करणार नाही” असा मी नेट लावला. त्यावर सर्वांनी माझ्यावर दबाव आणला. मी माघार घेतली.

ऐन नाटक चालूं असतांना कांही अडचण आली. मुख्य पडदा उघडेना. खोळंबा होऊं लागला. प्रा. जी.बी.के. स्टेजच्या पाठीमागे होते. त्यांनी मला इशारा केला. माझा संचही तयार होता. मी स्टेजच्या पाठीमागे हातांत माईक घेऊन- “दिलरुबा मधुर हा, चांद माझा हा हासरा, सुखवीत या संसारा…….” ही गाणी म्हण्टली. गाणी रंगली, त्यहीपेक्षा वेळ निभावली. ” शाबास अनिल ” असा मला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला…… ! पडदा उघडला. मी जी.बी.के. सरांचे आभार मानले..!!

— अनिल शर्मा About अनिल शर्मा 15 Articles
वास्तव्य – बेंगलूरू-कर्नाटक, वय एक्क्यांशी, शिक्षण मराठी भाषेतून झाले. सध्या वृद्धाश्रमात रहातो. एके काळी वकीलीचा व्यनसाय केला. आता स्वस्थ बसून संगणकावर काहीेतरी लिहीत आसतो.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – करवंदे

'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...

कोकणचा मेवा – कोकम

आंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...

कोकणचा मेवा – आंबा

उन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...

कोकणचा मेवा – काजू

कोकणचा मेवा - काजू

उन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...

Loading…