नवीन लेखन...

मराठी शायर भाऊसाहेब पाटणकर

भाऊसाहेब पाटणकर म्हणजे वासुदेव वामन पाटणकर यांचा जन्म २९ डिसेंबर १९०८ रोजी झाला. भाऊसाहेब पाटणकर यांना ‘ जिंदादिल ‘ भाऊसाहेब पाटणकर म्ह्णून ओळखले जात होते. मराठीत गजल मोठ्या प्रमाणात लिहली जात असताना स्वतंत्र शेर मात्र कमीच म्हणजे जवळ जवळ लिहीले जात नसत . गंमत म्हणजे गजलांचा सुकाळ व्हायाच्या आधी मराठीत उच्च दर्जाचे शेर लिहणारा एक जबरदस्त शायर निर्माण झाला होता तो शायर म्हणजे भाऊसाहेब पाटणकर ते यवतमाळ येथे रहावयास होते. भाऊसाहेब पाटणकर हे प्रथितयश वकील. त्यांना संस्कृत काव्याचा, दर्शनांचा अभ्यास, शिकारीचा नाद आणि मराठीचा आणि मराठी संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान. माधव ज्युलिअन यांचे सुरवातीचे प्रयत्न अयशस्वी झाल्याने महाराष्ट्रात एक गैरसमज पसरू लागला होता की मराठी भाषाच या प्रकारच्या काव्याला पुरेशी पडणारी नाही. हा रस्ता आपला नाहीच. मराठीचा असा उपमर्द होत असलेला भाऊसाहेबांना सहन होणे शक्यच नव्हते. कोणीही मार्गदर्शक नसताना त्यांनी स्वत; सुरवात केली. आणि त्यावेळीच ठरवले की शेर मराठीत लिहावयाचे तर ते इथल्या मातीशी, संस्कृतीशी नाळ जोडणारेच पाहिजेत.

मराठीला गजल नवी राहिलेली नाही. जाणीवपूर्वक रचना म्हणून सुरवात जरी श्री. पटवर्धन यांनी केली असली तरी शास्त्रशुध्द रचना, कल्पनेची स्वैर भरारी इत्यादी गजलेची प्रमुख अंगे संभाळून केलेले काव्य गेल्या ३०-४० वर्षात इतक्या प्रकारे बहरून आले आहे . गजलेचे मुख्य अंग तिच्यामधले शेर. एकाच गजलेमधले शेर एकमेकाशी संबंधीत असलेच पाहिजेत असे बंधन नसल्याने शेर स्वत:चे अस्तित्व गजलेशिवायही टिकवून ठेऊ शकतात.संपूर्ण गजल माहित नसली तरी त्यातील एखदा शेर आपणास माहित असतो,काही वेळा पाठही. मैफ़लीत नुसते शेरही सादर केले जातात आणि दादही मिळवतात.

भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी अनेक वेळा प्रत्यक्ष ऐकली आहे तसेच त्यांची स्वाक्षरीही घेतली आहे.

भाऊसाहेब पाटणकर म्हणतात ‘ मराठी शायरी ’ आणि ‘ मराठी मुशायरा’ या दोन्ही पुस्तकात मराठी हा शब्द मी भाषेच्या दृष्टीने न वापरता संस्कृतीच्या अर्थाने वापरला आहे. मराठी शायरी म्हणजे मराठी भाषेत शायरी निर्माण करणे नव्हे. ज्या संस्कृतीत आमचा पिंड वाढला आहे, त्याच संस्कृतीचे विश्व आपण येथे बघाल. उर्दू काव्यातील विश्वाहून आमचे विश्व वेगळे आहे आणि म्हणूनच मय, कदा, साकी, सैयाद, कफस, शमा, परवाना या विश्वाला मी माझ्या काव्यात स्पर्शही केला नाही.’ ते त्यांच्या ‘ मृत्यू ‘ या गजल मध्ये म्हणतात ,

जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले
आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये
होती आम्हा जाणीव की, मी मेलो, आता बोलू नये..

आता या ओळींमध्ये ‘ मृत्यू ‘ गंभीर , दुःखदायक विषयावर हे लिहिले आहे ते वाचून जाणवते की भाऊसाहेब पाटणकर यांनी आयुष्यातल्या सर्व गोष्टी अत्यंत सहजपणे स्विकारल्या होत्या आणि त्याही खेळाडूवृत्तीने. भाऊसाहेबांना मी पुण्यात बघितले आहे , त्यांच्या तोडून त्यांच्या बहुतेक रचना मी ऐकल्या आहेत. त्यांना पाहताना किंवा वाचताना हा माणूस खरेच जिंदादिल आहे असेच जाणवते . आज साठी उलटल्यावर माणूस उगीचच मनाने ‘ आजी आजोबा ‘ होतो असे मला वाटते हे माणसाच्या अपरिपक्वपणाचे रूप आहे , मग त्यांचे संस्कृतीप्रेम, श्लील- अश्लील , आदर्श वगैरेंच्या गप्पा सुरु होतात. हल्ली व्हाट्स अप वर असे ‘ रियूनियन ‘ ग्रुप भरपूर आढळतील. अशा माणसांना बघीतले की वाटते खरेच तरुणपणी कामामुळे , विवंचनेमुळे त्यांना मोकळे होता आले नाही आणि आणि ६० वर्षांनंतरही त्याला मोकळे रहाणे , मोकळा विचार करणे जमत नसेल तर भाऊसाहेबांच्याच शब्दात सागावे लागेल….

सांगशी निष्काम कर्मा, कृष्णा अरे वेदांत तू
समजला की काय आम्हा किर्लोस्करांचा पंप तू
मोक्ष हा परमार्थ ऐसे सांगशी जेथे तिथे
तू तरी देवा कधी आहेस का गेला तिथे?
भोगीशी ऐश्वर्य, सारे वंदिति एच्छा तुझी
संन्यास पण सार्‍या जगाने, घ्यावा अशी एच्छा तुझी
निष्कामता अंगी, थोडी जरी असती तुझ्या
धावूनी सार्‍या येता, आमच्याकडे गोपी तुझ्या…

भाऊसाहेबांबद्दल सांगायचे म्हटले तर त्यांच्या शायरीमधूनच सांगावे लागेल , कारण तो माणूस खरा तर त्यांच्या शायरीमधूनच दिसत होता. भाऊसाहेब तसे स्वभावाने दिलदार तर होतेच परंतु कार्यक्रमात शायरी पेश करताना देखील त्यांचा कलंदर स्वभाव दिसत असे , तोंडात पान असे आणि पानाप्रमाणे शायरी घोळवून घोळवून पेश करत असत.

इ.स. १९२९ साली पाटणकरांचा विवाह इंदू दाते ह्याच्याशी झाला . पुढे उतार वयात कविता सुचल्यावर ते पत्‍नी इंदूताई यांना रचना ऐकवत आणि इंदूताई त्या कविता लिहून घेत असत. उमेदीच्या काळात पाटणकरांना शिकारीचा शौक होता त्यांनी सहा पट्टेरी वाघांना लोळवून शिकारी म्हणून त्यांनी नाव कमवले होते .

भाऊसाहेब पाटणकरांनी शायरीच्या सादरीकरणाचे कार्यक्रम पुणे, नाशिक, मुंबई इत्यादी महाराष्ट्रातल्या शहरांत तसेच महाराष्ट्राबाहेरील हैदराबाद वगैरे शहरांतही केले. त्यांच्या मैफिलींना रसिकांची भरपूर दादही मिळाली . मी जेव्हा जेव्हा भाऊसाहेबांना पाहिले तेव्हा एकच वाटले हा माणूस खरेच अमर रहाणार . परंतु भाऊसाहेब २० जून १९९७ रोजी या जगातून निघून गेले . खरे तर मला त्या वेळी हे खोटेच वाटले कारण त्यांची एक गजल डोक्यात , मनात घोळत होती त्याचे शब्द होते
एकदा मेल्यावरी मी परतुनी आलो घरी
तेच होते दार आणि तीच होती ओसरी ।
होती तिथे तसबीर माझी भिंतीवरी टांगली
खूप होती धूळ आणि कसर होती लागली….

ह्याचा अर्थ इतकाच होतो , ‘ अरे , मी कुठे गेलो आहे इथेच आहे , मस्तपणे ? ‘

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..