नवीन लेखन...

फळांचा राजा आंबा

फळांचा राजा म्हणजे आंबा. यालाच जास्त महत्त्वाचे आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातही आंब्याचे प्रमाण वाढत आहे. खुद्द अमेरिकेत १७व्या शतकात आंबा आला. एवढेच नाही तर संबंध युरोपातही आंब्याचा विस्तार झाला. आंब्याची चव, गोडी या कारणामुळे आंब्याला राजा म्हटले जाते. पोतुर्गाल आंब्याला मँगो म्हणत असत. मलेशियात याला मँगो असेही म्हणत असत. श्रीलंकेत याला मकाय असे सांगतात. एवढेच नाही तर आपल्या गोऱ्या लोकांनी आंबा बघून त्यांनी रोपटेच परदेशी पाठवण्यास सुरुवात केली. त्यात ब्रिटिश लोक जमेयका आणि अमेरिकेनेही हे रोप लावून झाड लावले. १७०३ रोजी कॅप्टन ब्लेग यांनी आंब्याचे भारतीय रोपटे ब्रिटनमध्ये लावले.

संपूर्ण आंब्याचे झाड साधारणपणे ११५ ते १३० फुट उंचीचे असते. तसेच आंब्याचा खोडाचा परीघ साधारणपणे ३० ते ४० फुट इतका असतो. आणि आंब्याचे आयुष्यमान सर्वात जास्त म्हणजे ३०० वर्षेही जगू शकते. आंब्याचे जमिनीखालील मूळ याला सोटमूळ असे म्हणतात. सर्वसाधारणपणे मुख्य सोटमूळ हे पहिले सरळ खाली जाते. २० फुटापर्यंत असते. व बाकीचे मूळ येथून सरसकट लांब होत जातात व ते १५ ते २० फुटही असू शकते. म्हणून साधारणपणे आपल्या घरी झाड लावले तर ते आपल्या बंगल्यापासून २० फुटापर्यंत लांबी असावी. नाहीतर ही मुळे जर एकाद्या बीमपर्यंत असली तर घराला तडे पाडू शकतात. झाडांची पाने साधारणपणे ५ ते १८ इंचापर्यंत लांब असतात. पाने येताना ते प्रथम नारिंगी रंगाची असतात व परत उन्हामुळे हळूहळू बदलत ते हिरवी होतात. हंगामाप्रमाणे आंब्याला मोहोर साधारणपणे १५ ते १६ इंच लांब असतो. मोहोराचा रंग साधारणपणे प्रथम हिरवा नंतर वाढून सोनेरी रंगाचा होतो व किंचित थोडा पांढराही असतो. मोहोराला अतिशय व मोहक असा सुगंध येतो.

जसजसे आंबे पिकत जातात तसे तसे आंब्याचा रंग व आकार बदलत जातो. आंब्यांना फार थोड्या प्रमाणात मोहोर येतो व तो गळत जातो. मोहोराचा रंग बदललास तर २ टक्के पाण्यात युरिया घालून ते पाण्यामध्ये मिसळून फवारावे. त्याने मोहोराची वाढ चांगली होते. आंब्याचा आकार लहान मोठा झाला व ज्यावेळी आंब्याच्या देठाला एक खळगी पडली तर आंबा तयार झाला असे समजतात. जे आंबे खाली येतात ते प्रत्येक मोहोराला आंबा खाली लटकत असता आंबे काढण्याची तयारी करावी लागते. हा आंबा कधीही झाडावरून खाली पडू देऊ नये. पडल्यास तो बाजूला ठेवावा. तसेच आंबा तोडण्याकरिता एका झोल्याची मदत अत्यंत आवश्यक असते. हा झोला एक कैचीसारखा प्रकार असून तो आंब्याचा देठ झाडावरून ओढावा व तो आपोआप झोल्यात खाली पडतो. जे आंबे अगदी हाताच्या उंचीवर ते कधीही तोडू नयेत कारण त्याने आंब्याचा चीक गळून पडतो व त्याने हाताला ब्लीस्टरसारखी जखम होऊ शकते. म्हणून आंबा असा तोडावा. आंब्यापासून चार बोटावर कैचीने तोडावा तो परत बादलीत अथवा घमेल्यात टाकावा. आंबे भरपूर अथवा सगळे जवळजवळ संपले की, झाडाला आढी घालावी लागते. हे आंबे स्वच्छ ओल्या फडक्याने पुसून घ्यावे व बाजूला ठेवावे. देठ मात्र अजिबात काढू नये. मग अढी घालताना एखादा खोका अथवा गवत घालावा व जागा असेल तर कागदावर टाकून कागद पसरून आढी ठेवावी. अशे दोन अथवा तीन थर ठेवावे.

कोणत्याही प्रकारचे केमिकल्स अथवा इतर काही वापरू नये. त्याने जीवाला धोका निर्माण होतो. आंबे साधारणपणे चार ते आठ दिवसात पिकतात. परत संपूर्ण पिकलेले आंबे व कच्चे आंबे बाजूला ठेवून परत आढी घालावी व असे परत परत सवयीने करता येते.

बाजारात आंबे पिकल्यावर काही कृत्रिम पदार्थ बाजारात विकत मिळतात. त्याला सरकारने आता बंदी घातलेली आहे. असे आंबे विकणे कायद्याने गुन्हा आहे. ही झाली

आंब्याची कथा. कोकणात आंबा साधारण दोन प्रकारचे असतात. एक हापूस व दुसरा पायरी. हापूस नंतर पायरी होण्यास थोडा वेळ लागतो हे लक्षात ठेवावे. तसेच उत्तर भारतातही फार चविष्ठ आणि गोड आंबे असतात. ते म्हणजे दशहरा, लंगडा वगैरे खूप प्रकारचे आंबे असतात. कोकणात तोतापुरी, राजापुरी वगैरे सर्व प्रकारचे आंबे असतात. काही आंबे फक्त लोणच्याकरीताच असतात तर काही पिकतच नाहीत.

आंब्याचे रस काढून पृथ्थकरण केल्यास खूप चांगल्या गुणधर्म यात आढळतात. आंब्यात कार्बोहायड्रेट, प्रथिम, चरबी, व्हिटामि ए, बी-१, बी-२, नियासीन वगैरे संपूर्ण जीवक अन्न देण्यात येते ते खालील प्रमाणे.

 

मध्यंतरी आंबे पिकवणारे मंडळी आंबा घाईने कृत्रिमरित्या पिकवून पैसे लवकर मिळवत असत. एक कॅल्शियम कार्बाईड नावाचे एक रसायन असते. हे केमिकल आंबा लवकर पिकवण्याकरिता खोक्यात अथवा गवतात ठेवतात. दोन रांगा झाल्यावर मधील आंब्याकरिता एक साधारण २० ते ३० ग्रॅमची कॅल्शियम कार्बाईड यांची पुडी ठेवून देतात. हे खोके व्यवस्थित वरती ठेवले तर रसायनाच्या उबेमुळे आंबे पिकावयास सुरुवात होते. आंबा साधारण तीन ते चार दिवसात पिकतो. असा पिकलेला आंबा खाल्ल्यास त्याला विषबाधा होऊ शकते. सरकारने या रसायनाला जरी बंदी असली तरी कोणीही जुमानत नाही व घातक प्रकार सतत चालू असतात. असे आंबे खाल्ल्यास मृत्यू ओढवू शकतो, असे दिहडीचे रसायनाचे प्रमुख डॉ. हरी दलाल यांनी सांगितले. दुसरी असे की, असे आंबे खाणाऱ्या व्यक्तीला खूप त्रास होतो. त्यामध्ये अतिसार, ओकारी अथवा उलटी, डोकेदुखी, चक्कर येणे, ब्लडप्रेशर कमी जास्त होणे त्याचप्रमाणे मानसिक गोंधळ वगैरे गोष्ट घडत असतात. अतिमहत्त्वाचे म्हणजे कॅल्शियम कार्बाईडची वाफ होते व त्याचा अॅसेटीलीन नावाचा गॅस तयार होतो व त्यामुळे व्यक्ती मनोरूग्ण होण्याचा संभव असतो. पण यावर उपाय काय? भारतीय आयुर्वेदात ताक या गोष्टीला फार महत्त्व असते. म्हणूनच जर माणसाने ताक नियमितपणे घेतल्यास त्यास निश्चित आराम येण्याची गरज असते. कारण ताकाबरोबर ताक घुसळल्यास त्यात लॅकटीक ॲसिडचे प्रमाण असते. त्या लॅक्टिक अॅसिडमुळे पोटातील सूक्ष्म जंतू अथवा व्हायरल जंतू हे पोटात घेतल्यास ते ताकामुळे विरघळून जातात व बाहेर फेकले जातात. हा एकमेव मार्ग आहे. त्याचप्रमाणे शक्य असते तर पाडाचे आंबे नीट आढी घालून तयार करणे त्यामुळे चांगले आंबे खायला मिळतात.

– मदन देशपांडे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..