मनतरंग

आकाश अगदी निरभ्र आहे. दुधापेक्षाही शुभ्र चांदणं पड़लं आहे. बाकी सार शांत आहे. खेळून दमलेलं लहान मुलं झोपावं तसा अवखळ वारा विसावला आहे. किंचितसा गारवा मात्र मनमोकळेपणाने सा-या माळरानावरून भिरभिरतो आहे. आणी त्याला साद घालीत आहे एक टिटवी. एवढा टिटवीचा आवाज सोडला तर बाकी शांत आहे. दूरवर पसरलेलं हिरवं लुसलुशीत गवत माना ड़ोलवीत असलं तरीसुध्दा मौनच .

तळ्यातल्या पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब उन्हातं काच चमकावी तसचं चमकतयं .मधूनच एखादा मासा ड़ुबकी मारून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतोय. या अशा सुंदरशा चांदण्या रात्रीत आपण आपल्याच धुंदीत . दोघेही मौनच . कुठे निघालोय हे ही माहीती नाही. चालता चालताच पाय कुठेतरी ठेचकाळून स्वप्नातील जगातून भानावर आल्यावरही या उलट सुलट विचारांच्या चक्रात माझी स्थिती कित्येकदा भांबावल्यासारखी होते. का कोण जाणे पण तू मनापासून मला आवड़तोस.

तसं पाहीलं तर तुझ्यामाझ्यात दोन ध्रुवाचं अंतर .ही दोन ध्रुव एका रिंगणात फिरतात खरी पण दिसत असतील खचीतचं .आणी भेटण्याचा तर प्रश्नच नाही . म्हणून उगीचचं स्वप्नांच्या मागे लागलो आहोत . असं वाटतयं . पण स्वप्नांची किमंत तृणपात्यावरील दवाच्या थेंबाला विचारावी. आणी मगच आपण स्वप्न पाहावीत. आणी जगून घ्यावं त्या स्वप्नातच …..न जगलेला क्षण अन् क्षण . पण तुला नाहीच कळायची स्वप्नांची किंमत .त्यासाठी निर्माल्य व्हावं लागतं . पण हे शक्यच नाही कारण तूझा जन्मचं मुळी फुलांच्या वंशावळीत झालाच नाही ना। मग कसं जमायचं तुला निर्माल्य व्हायला.
अर्थात हा दोष तुझा नव्हेच ….पण तरीही ठरवलं की बदलता येतं रे …कधीतरी बदलून बघ जमलं तर……

कधी कधी वाटतं मनातील या दुहेरी वादळात मी एकटीच भरकटतेय कदाचीत …….मग अशावेळी स्वःताशीच ठरवते की……आपण दूर निघून जावं कुठेतरी. अगदी कोशातून सुरवंटाने उड़ावे त्याप्रमाणे . पण मग लगेच दुस-या क्षणाला माझे मनोरथ जागच्या जागी विरून जातात. काठावर बांधलेल्या वाळूच्या किल्ल्यांसारखे आणी मग मी दुस-या दिवसाची वाट पहात.. उरलेली स्वप्न बघतच काढते. पून्हा एकदा निर्माल्य होऊन………

© वर्षा पतके-थोटे
4-01-2019Avatar
About वर्षा पतके - थोटे 12 Articles
मी लघू कथा,कविता ,ललित ,लेख इत्यादी साहीत्यातील लेखन प्रकार लिहीते.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…