नवीन लेखन...

मला भेंटलेला रिक्शावाला व त्याच्या नजरेतून मुसलमान समाज

मुंबईच्या उपनगरांतील रस्त्यावर दिवसाचे १२-२५ तास आपल्या तिन चाकांच्या रिक्शांवर मेहेनत करणारे रिक्शावाले माझ्या अखंड कुतुहलाचा विषय आहेत. बऱ्याचदा नडेल, अडेलतट्टू, उर्मट असंच यांचं वागणं असतं. प्रवाश्याला हवं त्या ठिकाणी न येणं हा तर त्यांचा व्यवसायसिद्ध हक्क आहे की काय अशी शंका यावी असंच यांचं वागणं असतं.

बाकी त्यांचे सर्व दुर्गूण सोडले तर ही माणसं अनुभवाने विलक्षण समृद्ध असतात. दिवसाचा अर्ध्यापेक्षा अधिक वेळ रस्त्यावर आणि प्रवासी वाहतूकीच्या व्यवसायात असल्याने मानवी स्वभावाचे असंख्य नमुने यांना रोजच्या रोज भेटत असतात व त्यांना अनुभवाने संपन्न बनवत असतात. ह्यानुळे यांचा अनुभव ‘एक्सपिरियन्स इन कॅश’ म्हणजे रोकडा म्हणावा इतका जिवंत असतो.

काही दिवसांपूर्वी असाच एक रिक्शावाला मला भेटला होता. मी दहिसरवरून वांद्र्याला निघालो होतो. प्रवासाला एखाद तासाचा वेळ लागणार असल्यामुळे मी माझ्या नेहेमीच्या सवयीनुसार त्याच्याशी गप्पा मारायला सुरूवात केली. मध्यम वयाचा तो चांगलं मराठी बोलणारा रिक्शावाला बुद्धीने तेज वाटला. कशा ते आता आठवत नाही पण गप्पा हळुहळू हिन्दू-मुसलमान विषयाकडे आल्या. आणि त्याने त्याच्या मराठी पण रोखठोख भाषेत हिन्दू-मुसलमान प्रश्नावर जे भाष्य केलं त्यांने मी ही अवाक झालो.

त्याचं म्हणणं होतं की मुसलमान समाज जो इतरांपासून वेगळा पडलाय तो त्यांच्यामुळेच. त्यांचा वेश, त्यांची दाढी-टोपी, अरबी-उर्दु शब्दांचा भरणा असलेली त्याची बदललेली भाषा इ. त्यांच्या धार्मिक भावनांशी निगडीत प्रश्न असला तरी त्याच गोष्टीने त्यांना इतरांपासून तोडलंय. स्वत:चं ‘वेगळे’पण दाखवण्याच्या नादात ते इतरांपासून ‘वेगळे’ पडत जात असल्याची जाणीव त्यांना आहे की नाही कळत नाही असं काहीसं त्याचं म्हणणं होतं.

त्याच्या म्हणण्यात तथ्य होतं हे थोड्याश्या विचारानंतर माझ्याही लक्षात येत होतं. मुसलमान समाज वगळता इतर धर्मिय रोजच्या व्यवहारात वेगळे ओळखता येत नाहीत परंतू मुसलमानांच्या विशिष्ट पेहेराव व धार्मिक प्रतिकांचं रोजच्या जीवनात आग्रहामे पालन करण्याच्या वृत्तीमुळे हा समाज चटकन वेगळा ओळखता येतो व उर्वरीत समाज त्यांच्यापासून आपोआप तुटत जातो.

मला आठवतंय, माझ्या लहानपणी मराठी शाळेत शिकत असताना माझ्यासोबत काही मुसलमान मुलं-मुलीही शिकत होती. आपल्या खेड-दापोलीकडचे असलेल्या त्या कोकणी मुसलमानांची ‘मातृभाषा’ ‘मराठी’च असल्याने ते मराठी भाषा बोलत व आपल्यालारखेच कपडे घालत. नांव वगळता ते आपल्यापेक्षा काही वेगळे आहेत हे लक्षातही येत नसे. आमच्याच आजुबाजूला राहात असल्यामुळे कधी त्यांच्या घरी जाण झालंच तर थोडंसं वेगळेपण जाणवायचं पण ते तेवढ्यापुरतंच..एरवी त्यांचं उठणं-बसणं, बोलणं-चालणं सर्व आमच्यासारखंच व म्हणून ती मुलं आम्हाला आमच्यातलीच वाटायची. मुलींनी सोडा, त्यांच्या आयांनीही तेंव्हा कधी बुरखा घातलेला पाहिलेला मला आठवत नाही.

हे मी मुंबई-महाराष्ट्रातलं सांगतोय. देशातल्या इतर प्रांतातही हेच झालं असावं असं मानण्यास जागा आहे. मुसलमान हा धर्म असला तरी आपल्या देशातले मुस्लीम धर्मिय मुळचे भारतीय आहेत व इथल्या संस्कृतीत त्यांची पाळमुळं खोलवर रुजली गेली आहेत ह्याची एकेकाळी त्यांना असलेली जाणीव नंतर नंतर नाहीशी होत गेली असा निश्कर्ष काढण्यास हरकत नाही.

गेली हजारो वर्ष आपले सण-समारंभ-कार्यक्रम वगळता एरवी चार-चौघांसारखीच वागणूक ठेवून सर्वांसोबत एकत्र नांदणारा हा समाज अलिकडे इतरांपासून वेगळा का पडू वागलाय ही सर्वांनीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या समाजातील खुपच कमी लोक असतील की ते अशी कट्टरता ‘दाखवत’ नाहीत. यात मुख्यत्वेकरून अर्थिक संपम्नता असलेल्या लोकांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे या समाजातील अनेक लोक डॉक्टर, शिक्षक, उच्चशिक्षित व सर्वधर्मसमभावाचा अवलंब करणारेही आहेत. त्यांच्या जगण्यात बदल झालेत परंतू धर्मपुढाऱ्यांच्या दबावामुळे आपल्याच समाजाला बदलायच्या दृष्टीने ते काहीही करीत नाहीत. आणि तसं करणं म्हणजे इतर समाजापासून तुटलं जाण्याचीही भिती असतेच.

आणखी एक, माणूस म्हणून, मित्र म्हणून जेंव्हा एखादी मुस्लीम व्यक्ती आपल्या संपर्कात येते तेंव्हा ती कोणाही माणसा-मित्राप्रमाणेच वागते. घाटकोपरच्या मोनिका मोरेच्या रेल्वे अपघातातानंतर तिच्या तुटलेल्या हातांसहीत तिला हाॅस्पिटलमधे दाखल करणाऱ्यात बाजूच्या शेकडो बघ्यांमधले केवळ अमजद चौधरी व त्याचा भाऊच होता हे मला पक्कं आठवतंय. त्यांनी त्याप्रसंगी केवळ माणूसकी हाच धर्म पाळला. वैयक्तीक वागताना आपण सारेच माणूस म्हणून वागत असतो पण एकदा का आपला ‘जमाव’ झाला की मात्र आपण विचित्र व संकुचित वागतो. हे सर्वच समाज व धर्नांच्या बाबतीत खरं आहे.

तरीही मुसलमान व मुसलमानेतर यांचं ध्रुवीकरण आता अगदी नजरेला जाणवेल, खटकेल इथपर्यंत आलेलं आहे. हा समाज मुख्य प्रवाहापासून दूर चाललेला दिसत आहे. मुख्य प्रवाहात त्यांना सामिल करावं हे मलाही पटतं परंतू त्यांचं ‘वेगळं’ असण्याचा आग्रह त्यांना व इतरांना मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखतो असं मला वाटतं. शिख समाजही असा दिसण्यात वेगळा असला तरी तरी सर्वांशी मिळून मिसळून वागतो व त्याच्याशी इतरांनी इतरांसारखाच व्यवहार करावा यात त्याला काही वावगं वाटत नाही. मुसलमान समाज मात्र इथे वेगळा वागतो व इतरांनी त्याच्याशी तो मुसलमान म्हणूनच वागणूक ठेवावी अशी अपेक्षा ठेवताना दिसतो व म्हणून तो मुख्य प्रवाहापासून दूर गेलेला आढळतो.

आपल्या देशाची प्रगती व्हायची असेल तर सर्वच जाती-धर्म एकाच प्रवाहात यायला हवेत आणि त्यांना तसं करायला त्यांच्यातूनच पुढे आलेलं समंजस नेतृत्व भाग पाडू शकतं. स्वत:ची वेगवेगळी चुल मांडून आपण कधीच समर्थ होऊ शकणार नाही याची जाणीव समाजातील सर्वच जाती-धर्मांनी ठेवायला हवी. धर्माचं पालन करण्यास कोणाचीच हरकत असण्याचं काहीच कारण नाही परंतू तसं पालन करताना अवडंबर माजलं जाणार नाही याची शिकवण त्या त्या समाजातील समंजस लोकांनी त्या त्या समाजाला दिली पाहीजे. ही जबाबदारी त्या त्या समाज-धर्मातील धुरीणांचीच असते कारण इतर समाजातील लोक दुसऱ्या समाजाला काही सांगायला गेल्यास मुख्य मुद्दा बाजूला पडून जातीय व धर्मिय अस्मिता नाहक दुखावल्या जाऊन तो त्यांच्या जाती-धर्मावरचा हल्ला समजला जाण्याचीच शक्यता जास्त असते.

जाता जाता ज्या एका रिक्शावाल्याने मला विचार करण्यास भाग पाडले त्यांचं नांव-गांव मी विचारलं नाही असं होणारच नाही. तर त्याचं नांव होतं ‘अरीफ’, आडनांव नक्की आठवत नाही आता पण ‘मुकादम’ की कायसं होतं आणि गांव आपल्या कोकणातील रत्नागिरीतील संगमेश्वरजवळचं ‘माखजन’ हे होतं हे सांगणंही आवश्यक आहे.

 — नितीन साळुंखे
9321811091

(वरील पोस्टमधला ‘रिक्शावाला’ खरा आहे. या पोस्टमधले विचार चर्चा करण्यासाठी आहेत, वादासाठी नव्हेत. संपूर्ण त्रयस्थ विचार करूनच आपलं मत मांडावं.)

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..