नवीन लेखन...

डोळे आपल्याला काय सांगतात?

Maintain your Eyes

जेवढ्या वेळा आपण डोळ्यांची उघडझाप करता त्या प्रत्येक वेळी डोळ्यांमध्ये अश्रू तयार होतात. अश्रू हे तेल, पाणी आणि बलगम यांचे मिश्रण आहे. अश्रू डोळ्यांचे रक्षण करतात. डोळ्यांमधील ओलावा टिकवून ठेवतात. पण काही वेळा डोळ्यांतून अश्रू येणे बंदच होऊन जाते. डोळे कोरडे पडतात. डोळ्यांना खाज सुटते. या समस्येतूनच पुढे डोळ्यांना जखम होण्याची आणि त्यातून संसर्ग होण्याची शक्यता असते. जर आपल्याही डोळ्यांना खाज सुटत असेल, डोळे खूप लाल होत असतील, डोळे थकल्यासारखे वाटत असेल तर आपल्याला आय सिंड्रोम हा त्रास होत आहे.

यावर उपाय काय? जाणून घ्या.

डोळ्यांची उघडझाप करा, डोळ्यांचा थकवा कमी होईल.

सतत कंप्युटरवर काम करण्यासाठी अथवा वाहन चालवल्यासाठी एकटक बघावे लागते. खूप वेळ एकटक बघताना डोळ्यांची उघडझाप कमी होते. डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. डोळ्यांची उघडझाप ही सामान्य प्रक्रिया आहे. हवेसोबत डोळ्यात विविध प्रकारचा कचरा जातो. डोळ्यांची उघडझाप केल्यावर निर्माण होणारे अश्रू हा कचरा साफ करतात आणि डोळ्यांचा ओलावा कायम ठेवतात.

कंप्युटरवर खूप वेळ काम करणे.

कंप्युटरवर खूप वेळ काम केल्यावर डोळे थकल्यासारखे वाटते. सतत एकटक कंप्युटरकडे बघताना डोळ्यांची उघडझाप कमी होते आणि डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. यावर उपाय म्हणून थोड्या वेळाने काम थांबवून मुद्दाम डोळ्यांची उघडझाप करा.
गाडी चालवताना डोळ्यात धूर, हवा आणि धुलीकण जाणे.

वाहन चालवताना डोळे कोरडे पडण्याची तसेच डोळ्यात कचरा, धूर, धुलीकण जाण्याची शक्यता आहे. धुरामुळे डोळ्यांचा ओलावा कमी होते. अश्रूंचे प्रमाण कमी होते.

वाढते वय आणि हार्मोनमधील बदलांमुळे डोळे कमकुवत होतात. वाढते वय आणि शरीरात होणारे बदल याचा डोळ्यांवर परिणाम होतो.

व्हेरिकोज व्हेन्स आणि मधुमेह.

व्हेरिकोज व्हेन्स आणि मधुमेहासारख्या आजारांनी पीडित असलेल्यांना डोळ्यांच्या समस्या हमखास जाणवतात. अशा मंडळींना डोळे कोरडे पडणे हा त्रास अनेकवेळा होण्याची शक्यता आहे. मधुमेहामुळे तर डोळे कमकुवत होण्याची शक्यता असते. काही वेळा तर थेट दृष्टीपटालवर परिणाम होऊन डोळे कायमचे कमकुवत होण्याची शक्यता असते.

डोळ्यांना पुरेसा आराम देण्यासाठी सोपे आणि प्रभावी उपाय. कंप्युटरवर काम करताना, वाहन चालवताना मुद्दाम थोडा वेळ थांबून डोळ्यांची उघडझाप करा, थोडे इकडेतिकडे बघा आणि पुन्हा आपले काम सुरू करा. आपण आय स्पा वापरुन डोळ्यांचा कोरडेपणा कमी करू शकता. आय स्पा डोळ्यांना सुटणारी खाज, डोळ्यांचा थकवा, डोळ्यांचा कोरडेपणा यावर उपाय करतो. बाजारात विविध चांगले ड्रॉप्स उपलब्ध आहेत.

— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..