नवीन लेखन...

मधली

भावी पिढी हुशार आणि संमजस आहे हे सगळ्यांना मान्य आहे तसेच मला मधल्या पिढीचे पण खूपच कौतुक वाटते. घरात मुले मुली असतात. आणि आता परिस्थितीनुसार मुलींना शिक्षण देणे गरजेचे आहे. त्याही शिकतात नोकरी करतात आणि योग्य वेळी योग्य जोडीदार बघून आपण लग्न लावून दिले की आपली जबाबदारी संपते. तसेही पुढे अनेक गोष्टी कराव्या लागतात. सणवार. बाळंतपण. बारसं. जावळ. मुंज व लग्न या बाबतीत तिचे करणे आवश्यक असते. पण मुलासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. कारण त्याच्या वर आपले पुढील आयुष्य अवलंबून असते. त्यामुळे मुलाच्या शिक्षणासाठी त्याला दूर पाठवावे लागते आणि इथूनच त्याची मानसिकता लक्षात घेऊन आपल्यात बदल करावा लागतो.
आईवडील. गाव मित्र आणि बऱ्याच गोष्टी सोडून देऊन इकडे मुलगा अनेक अडचणींना तोंड देत असतो. हॉस्टेल. खोली करुन रहातो. जेवण. एकत्र राहणं. अभ्यास. आजारपण. आईवडिलांकडून येणारा पैसा या सगळ्यात त्याची खूपच कुत्तर ओढ होते. तो स्पष्ट पणे सांगत नाही म्हणून पण आईबाबांना सगळे समजते. सणवार आले की आईच्या डोळ्यात पाणी येतेच. आवडीचे पदार्थ करत नाही. काळजाला भोक पडतात. काय खात असेल. कसा ॲ‍डजेस्ट करतो. रॅगिंग होतो का. पैसा पुरतो का फोन केला नाही म्हणजे आजारी पडला आहे का जेवण चांगले मिळते का. मित्र मैत्रिणी चांगले आहेत का. काही व्यसन लागले आहे का. थंडी पडली आहे गरम कपडे घातले असतील का. रात्री अभ्यास करतो पण त्याला झोप आवरत नाही म्हणून चहा दिला असता. लवकर उठून आवरुन कॉलेज मध्ये नियमित वेळी जातो का एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात येतात. आईपण गप्प बसू देत नाही. त्यामुळे बाबा देखिल अस्वस्थ होतात. शक्य असेल तर काही ओळखीच्या लोकांना त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगतात. जास्त मेहनत करून पैशाची सोय करतात. परगावी मुलाची आबाळ होऊ नये म्हणून पैसा भरपूर पाठवतात. सगळेच मन मारुन दिवस जगतात. आणि तो दिवस उजाडतो. मुलगा उच्च शिक्षण घेऊन नोकरीला लागतो. कृतकृत्य झालो असे वाटते प्रत्येकाला. मग अनुरुप स्थळ आले की लग्नाच्या वेळीही आईबाबा त्याच्या आनंदात आपला आंनद मानतात. वेळी तत्व बाजूला ठेवून. आणि ईथूनच सुरू होते मधल्या पिढीची घुसमट….
थोडे फार फरकाने मुलींचे पण असेच झालेले असते. आणि लग्नाच्या नतंर खरी कसोटी असते. आर्थिक स्वातंत्र्य व आधुनिक विचारसरणी यामुळे ती अनाठायी. अनावश्यक गोष्टी साठी वारेमाप खर्च करते. मन मारुन जगावे असे आम्ही म्हणणार नाही पण मनाला वाटेल तसे जगावे हे मात्र पटत नाही म्हणून अनुभवाच्या चार गोष्टी सांगितल्या की ठिणगी पडते. गैरसमज. शंका. संशय आणि मनात आढी ठेवून तू तू मै मै सुरू. आईबाबा प्रमाणेच मुलालाही पटते कष्टाचे दिवस आठवतात पण त्याला बोलता येत नाही. एकीने जन्म दिला आहे तर दुसरी जन्माची जोडीदार म्हणून तो कुणाचीच बाजू घेऊ शकत नाही. आणि घेतलीच तर भडका उडतो. वातावरण बिघडते. संवाद नव्हे तर वाद होतात. त्यामुळे आपणच स्थितप्रज्ञ राहावे. खर तर हा विषय नाजूक आहे प्रत्येकाचा वैयक्तीक अनुभव वेगळा आहे. आपल्या मुलांच्या आनंदात आपला आनंद आहे असे नुसतेच म्हणून भागत नाही तर मानून घ्यावे लागेल…
— सौ कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..