नवीन लेखन...

ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तालवादक लॉर्ड कॉवस

 

लॉर्ड कावस हे भारतीय चित्रपटसृष्टीच्या पाऊणशे वर्षांच्या इतिहासाचे ते साक्षीदार होते. त्यांचा जन्म १९११ रोजी पुणे येथे झाला. लॉर्ड कावस यांचा पुण्याच्या सधन पारशी कुटुंबात लॉर्ड कॉवस यांचा जन्म झाला. घरची आíथक परिस्थिती उत्तम. छोटय़ा कॉवसचे सांगीतिक मन तिथे रमत नव्हते. डोळय़ांत स्वप्न आणि डोक्यात फक्त एक विचार, मला सांगीतिक विश्वात करिअर करायचे आहे. आपला छंद जोपासण्यासाठी वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी आई बरोबर मुंबईत मामाच्या घरी स्थायिक होण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.

मुंबईत जिथून जसे संगीत शिकता येईल ते शिकण्यास त्यांनी सुरुवात केली. मेजर गुंडलखान या पठाण मिलिटरी अधिकाऱ्याकडून बॅग पाइप वाजविण्यास शिकले. दिवसातून दहा दहा तास ड्रम वाजविण्याचा सराव केला. पारंपरिक भारतीय तालवाद्यांची माहिती असावी म्हणून संगीतकार गुलाम मोहोम्मदकडे तबलाही शिकले. मि. वालिसकडून ट्रम्पेट आणि मि. लुईस मोरेनो या स्पॅनिश कलाकाराकडून कास्टनेट (हे छोटेसे वाद्य स्पॅनिश नर्तक दोन्ही हातांच्या मुठीत धरून वाजवत असत.) वाजविण्यास शिकले. ड्रम्सवर मात्र स्वत: अभ्यास करून प्रावीण्य मिळविले. ‘आलम आरा’ या पहिल्या हिंदी बोलपटाचे संगीतकार होते फिरोजशहा मित्री व बहराम इराणी.

बहराम हे लॉर्ड कॉवसचे चुलतमामा. त्यांच्याबरोबर कॉवसनी ‘आलम आरा’च्या पाश्र्वसंगीतात ट्रम्पेट वाजवून फिल्मी संगीतात प्रवेश केला. पुढे दोन-तीन वर्षे ब्रिटिश आर्मीमध्ये त्यांच्या बँडपथकात नोकरी केली व कॅप्टनपदापर्यंत पोहोचले. त्यामुळे माìचग ड्रम वाजविण्यात त्यांचा हातखंडा होता. सुनील दत्तच्या ‘उसने कहा था’ फिल्ममधील ‘जानेवाली सिपाही से पुछो’ गाणे आठवते? त्यातील माìचग ड्रम लॉर्ड कॉवस यांनी वाजविला आहे. दुसरे महायुद्ध संपले आणि त्यांची आर्मीमधील नोकरी संपुष्टात आली. त्यांना ब्रिटिश नागरिकत्व मिळाले होते, परंतु त्यांनी ते नाकारून मुंबईत राहणे पसंत केले.

४० व्या दशकात काही काळ ताज हॉटेलमध्ये बारमनची नोकरी करत असताना तिथे अनेक विदेशी बॅण्ड पाहायला व ऐकायला मिळाले. त्या वादकांशी दोस्ती करून तीन वर्षांत सर्व प्रकारची लॅटिन अमेरिकन वाद्य्ो ते वाजविण्यास शिकले. इतकेच नव्हे तर त्यांनी मिळेल त्या किमतीत ती वाद्य्ो विकत घेतली. स्वातंत्र्यपूर्व काळात ऑस्टोरिया, व्होल्गा, रिटज, व्हेनिस आदी ठिकाणी बॉलरूम डान्स चालत असे अनेक नाइट क्लब सुरू होते, तिथे पाश्चात्त्य नृत्य चालत असे. नौशादचा ‘जादू’ चित्रपट पाहिला असेल तर त्याची कल्पना येईल! ताजच्या बाजूला त्या काळच्या जाझ संगीतप्रेमींचे अत्यंत आवडते ग्रीन्स हॉटेल होते. इथे मोठमोठय़ाने ड्रम वाजविण्यास मुभा होती. पहाटेपर्यंत चालत असे, लॉर्ड कावस यांनी या हॉटेल्सच्या बॅण्डमध्ये वाजविण्यास सुरुवात केली.

१९४५ च्या सुमारास गोव्याहून प्रसिद्ध जाझ ट्रम्पेट वादक चिकचॉकलेट (चिको बाज) मुंबईला आले, त्यांनी आपला बॅण्ड चालू केला, लॉर्ड कावस आता त्यांच्या बॅण्डमध्ये वाजवू लागले. अॅककॉíडयनवादक गुडी सिरवाईना कावसनी आपल्या बॅण्डमध्ये बोलावून घेतले. सुट्टीमध्ये ते सर्व मसुरीच्या क्लबमध्ये बॅण्डवादन करत असत. त्यादरम्यान लाहोरहून कुक्कू डान्सर मुंबईत आली. आपल्या नृत्यसंगीताच्या कार्यक्रमांसाठी तीही एका चांगल्या बॅण्डच्या शोधात होती.

लॉर्ड कावस, जेरी फर्नाडिस व चिको वाजनी ‘जिरोम एॅण्ड हिज जाईव्ह क्लब बॉईज’ हा बॅण्ड तयार केला होता. कुक्कू त्यामध्ये सामील झाली. तिच्या पहिल्या फिल्मी नृत्याचे ध्वनिमुद्रण याच बॅण्डने केले. सी. रामचंद्र म्हणजे कल्पक व तल्लख बुद्धीचे संगीतकार. सतत काही तरी नवे आणि वेगळे संगीत देण्याच्या प्रयत्नात ते असत. जाझ संगीतावर त्यांचे विशेष प्रेम होते. दिवसभर गाण्यांचे ध्वनिमुद्रण करून मध्यरात्री ते बॅण्ड ऐकायला ग्रीन्स हॉटेलमध्ये चिक चॉकलेटकडे येत असत. त्यांना लॉर्ड कॉवस यांचे विविध पाश्चिमात्य तालवाद्यांवर असलेले प्रभुत्व भावले. त्या बॅण्डमधील सर्व कलाकारांना घेऊन पाश्चिमात्य शैलीचे संगीत देण्याचे त्यांनी ठरविले.

नेमकी त्याच काळात मुंबई इलाख्यात दारूबंदी जाहीर केली गेली. नाइट क्लब बंद झाले. उदरनिर्वाहासाठी काहीतरी करणे आवश्यक होते. लॉर्ड कावस, त्यांचा मोठा मुलगा केरसी, गुडी, जेरी सारे सी. रामचंद्रांच्या वाद्यवृंदात सामील झाले. कावसनी आपल्याबरोबर विविध प्रकारचे जाझ, ड्रम्स, बोंगो, कोंगो, कबास, रेसो, एॅकॉíडयन, कॅस्टनेट, ट्रांगल, खंजिरी, चायनीज ब्लॉक, वूडब्लॉक, व्हायब्रोफोन आदी लॅटिन अमेरिकन वाद्य्ो सोबत आणली आणि या सर्वानी एक नवीन प्रकारचे फिल्मी संगीत तयार केले. आमा ‘आना मेरी जान संडे के संडे,’ ‘जवानी की रेल चली जाएगी’ (शहनाई), ‘गोरे गोरे ओ बांके छोरे’ (समाधी), ‘मोम्बासा मोम्बासा’ (सरगम), ‘मेरे पिया गए रंगून’ (पतंगा) या गाण्यांनी सर्वत्र धमाल उडवून दिली. संगीतकार सी. रामचंद्र प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. संगीताची ही नवीन शैली यशस्वी होताच सर्व संगीतकार लॉर्ड कावस यांच्या मागे लागले. लॉर्ड कावस यांनी पारंपरिक िहदी फिल्मी संगीताला आपल्या असामान्य वादन शैलीने, कल्पकतेने आधुनिक वळण दिले.

हॉलीवूडच्या ‘लव्ह ऑफ कारमेन’ चित्रपटावरून कारदारनी ‘जादू’ या वेषभूषाप्रधान चित्रपटाची निर्मिती केली. त्यातील गाण्यांसाठी लॉर्ड कावसनी प्रथमच कॅस्टनेट यामूळ स्पॅनिश वाद्याचा उपयोग केला, गाणे होते ‘जब नन मिले ननों से, लारा लूं, लारा लूं’ आजही फिल्मी संगीतात सिंगल कॅस्टनेट वाजविणारे होमी मुल्लर, वकील बाबा, दीपक बोरकरसारखे काही कलाकार आहेत. परंतु डबल कॅस्टनेट वाजविणारे कलाकार फक्त दोन होते. लॉर्ड कावस आणि त्यांचा धाकटा मुलगा बजी. महमूदच्या ‘शबनम’ फिल्ममध्ये डबल कॅस्टनेट आहे, ‘हर नजर में सौ अफसाने.’ खंजिरीचा उपयोग यापूर्वीही भारतीय संगीतातून केला जात होता. वादक तालासाठी धातूच्या चकत्यांचा वापर करीत. लॉर्ड कावस यांनी खंजिरी वादनात अमेरिकन शैली आणून ते पूर्ण वाद्य वाजविण्यास सुरुवात केली.

अनेक लोरींमध्ये (अंगाई गीतात) हळुवार घंटानाद ऐकू येतो. फिल्मी संगीतात हा नवीन प्रकार लॉर्ड कावस यांनी आणला. घोडय़ांच्या टापांचा आवाज निर्माण करण्याचे प्रथम श्रेय आर. सी. बोराल व पंकज मलिकला जाते. (चले पवन की चाल) परंतु घोडय़ांच्या टापांचा अस्सल ध्वनी निर्माण करण्याची किमया लॉर्ड कावस यांचीच! दोन रिकाम्या करवंटय़ा फरशीवर वाजवून त्यांनी तो आभास निर्माण केला होता. ‘अनमोल घडी’, ‘उडन खटोला’, ‘नया दौर’, ‘तुमसा नहीं देखा’ आदी चित्रपटांतून त्यांनी वादन केले आहे. केवळ घोडय़ांच्या टापांचाच नाही तर बुटाच्या टापांचा (फूट स्टेपचा) अफलातून ध्वनीही त्यांनी आपल्या कल्पक बुद्धीने निर्माण केला आहे.

सी. रामचंद्रच्या ‘इना मिना डीका’ (आशा) गाण्यावरील वैजयंतीमालाच्या नृत्यात त्यांनी फूटटॅप डान्ससाठी, तिच्या पायातील बुटांच्या टापांचाही ध्वनी निर्माण केला आहे. काचेवर दोन नाण्यांनी वादन केले. मिष्किलपणा त्यांच्या रक्तातच होता. रेकॉìडगमध्ये ते खूप गमतीजमती करीत असत. ‘दिल का हाल सुने दिलवाला’ (श्री ४२०) मधील ‘चुकचूक’ आवाज ही त्यांचीच कल्पना होती. अलबेलामधील ‘ओ बेटा जी’ गाण्यात त्यांनी किचनमधील भांडी वाजवली तर नोकरीमधील किशोरच्या ‘अर्जी हमारी’ गाण्यात चक्क टाइपरायटर वाजवला आहे. गाईडमधील ‘पिया तोसे नना’मधील घुंघरांची साथही त्यांची होती.

भगवानचा ‘अलबेला’ त्यातील संगीतामुळे तुफान लोकप्रिय झाला. त्याचे बरेचसे श्रेय लॉर्ड कावस यांना द्यावे लागेल! ‘शोला जो भडके’मधील सुरुवातीचे बेंगो पीस व ‘दिवाना परवाना’मधील पाश्चिमात्य ऱ्हिदम काकांनी दिला. ‘दिवाना परवाना’च्या चित्रीकरणप्रसंगी भगवानदादांनी ते गाणे वाजविणाऱ्या प्रमुख कलाकारांनाही (चिक चॉकलेट, फ्रान्सिस, जेरी फर्नाडिस, सहृद कार) आपल्या समवेत नाचायला लावले आहे. बोंगो, कोंगो, चायनीज ब्लॉक, वूडब्लॉक, ड्रम, व्हायोब्रोफोन वादनात तर त्यांचा हात धरणारा कुणीही कलाकार फिल्मी संगीतात नव्हता. पुढील गाणीच त्याची साक्ष देतील!

‘जाने क्या तूने कहीं’ – प्यासा (चायनीज ब्लॉक), ‘आई ए मेहरबां’ – हावडा ब्रिज (बोंगो व वूडब्लॉक), ‘हूं अभी मं जवां ऐ दिल’ – भाई भाई (बोंगो), ‘लो प्यार की हो गई जीत’ – जादू (बोंगो), ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते’ – पतिता (बोंगो), ’जाता कहा हैं दीवाने‘ – सीआयडी (बोंगो), ‘ये रात ये चांदनी’ – जाल (बोंगो).

आर.डी.बर्मन यांच्या संगीतामध्ये लॉर्ड फॅमिलीचे प्रचंड योगदान आहे. ‘आराधना’ या चित्रपटातील ‘रूप तेरा मस्ताना’ या गाण्यात बोंगो – कावस लॉर्ड, एकॉíडयन – केरसी लॉर्ड, व्हायब्रोफोन – बजी लॉर्ड यांनी वाजविला आहे.

१९४० ते १९९० या कालखंडात असा एकही संगीतकार नव्हता की ज्याचे गाणे लॉर्ड कावस यांनी वाजविले नाही. पाश्चात्त्य आणि भारतीय वाद्यांवर त्यांची कमालीची पकड होती. नारळाच्या करवंटय़ा, टाईपरायटर, बुटांच्या टापांच्या आवाजाचा वापर करून त्यांनी सदाबहार गाण्यांना जन्म दिला. कावस म्हणजे हिंदी फिल्मी संगीताचा चालताबोलता इतिहास होता. लॉर्ड कावस यांचे २४ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ अरुण पुराणिक

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4156 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..