नवीन लेखन...

वर्तमान काळांत जगा

काळाला तीन भागांत विभागले जाते. भविष्य, भूत आणि वर्तमान काळ. भविष्य काळ अर्थात येणारा भावी काळ आणि भूत काळ गेलेला अर्थात मागचा काळ. दोन्ही काळाच्या मध्यभागी येणाऱ्या व जाणाऱ्या सिमा रेषेवर ज्याचे अस्तित्व मानले गेले तो वर्तमानकाळ. त्यामुळे वर्तमानकाळाचे मोजमाप किती वेळेचा तो काळ ह्याचे परीमाण ठरवीणेकेवळ शक्य नाही. येणारा काळ जो ज्या क्षणाला जातो तेव्हांच भविष्यकाळाचा भूत काळ बनतो. आणि तो परिवर्तनाचा क्षण कदाचित् त्याला वर्तमान काळ नांव देता येईल. परंतु खऱ्या अर्थाने त्याचे अस्तित्व नसल्यासारखेच असेल मानवाने वर्ष महीने दिवस तास मिनीटे सेकंद आणि सेकंदाचा हजारावा भाग मॅक्रो सेकंद हा यांत्रीक साधनानी केला आहे. परंतु मानवाच्या बुद्धी अनुभवाने त्या Micro Second चा केंव्हाच अनुभव घेणे शक्य नाही. ते शरीराच्या कोणत्याच हलचालीमध्ये मोजता येणार नाही. म्हणूनच वर्तमान काळ मोजणयाच्या क्षमतेत येत नाही. काळ आला नी गेला. त्या दोन क्रियाच्या मधली कालपनीक दुभंगमारी रेषा काठ वा कुंपण म्हणा हवे तर. उपनिषदामध्ये तर वर्तमान काळाचे अस्तित्व पण दाखविले नाही. इतका तो क्षणीक वा नामधारक झालेला आहे. तरीही अध्यात्मीक क्षेत्रात मानवी जीवनात संसारात वर्तमान काळाला अत्यंत महत्व दिले गेले आहे. प्राप्त झालेले आहे.

सर्व श्रेष्ठ काळ म्हणजे वर्तमान काळाला समजले गेले आहे. दोन अ-सत्या मधले एक सत्य समजले गेले आहे. ईश्वरी अनुभवाची प्रचीती, मनाच्या शांततेचा सर्वोतम क्षण, आनंद उपभोगण्याचा खरा काळ, म्हणजे केवळ वर्तमान काळच असेल. भविष्य काळ सदा अनिश्चीततेच्या लाटेवर आरुढ झालेला असतो. त्याच्या कोणत्याच क्षणाच्या सत्यतेची कल्पना करता येत नाही. एक सत्य म्हणून निश्चीत म्हणून कुणालाही समजणे शक्य नाही. तर्कज्ञानाला मर्यादा असतात.जरी ते ईश्वरी वा नैसर्गिक चक्रामधले असले तरी मानवासाठी काल्पनीक अनिश्चीत म्हणूनच अ-सत्य असा तो काळ असतो.

भूत काळ तर तुमच्यापासून दुर गेलेला असतो. पून्हा कधीही न येणारा न मिळणारा. तो फक्त फोटो अल्बमप्रमाणे आठवणीच्या कप्यात कोरला जाऊन तुमच्या जीवनातील प्रसंगाची चाळवा चाळव करण्याच्या फक्त कामाचा ठरतो. निश्चीत परंतु गेलेला काळ. म्हणून तुमच्यासाठी शेवटी एक अ-सत्य म्हणूनच समजला जातो. अनुभवाच्या फक्त मर्यादा असतात. कारण येणारा प्रत्येक क्षण अर्थात भविष्य काळ सतत नाविण्याचे प्रयोग करीतच येत असतो. त्यामुळे गेलेला क्षण वा भूतकाळ वर्तमान काळाच्या सत्यतेला साथ देण्यास सक्षम रहात नाही. म्हणूनच तो एक असत्य विचारांत जातो. हाती फक्त राहतो तो वर्तमान काळ. एक सत्य, चैतन्यमय, चंचल Ever moving period. भविष्य काळ त्याला स्पर्श करताच त्याचे रुपांतर भूतकाळांत होऊन जाते.

बुद्धीचा जीवंतपणा म्हणजे विचारांच्या लाटा सतत निर्माण करणे. विचार उत्पन्न होणे व त्याचा लय होणे. भविष्य काळाच्या चक्रात उत्पन्न होणारे विचार एका मागोमाग एक उत्पन्न होतात. ते वर्तमान काळाच्या सिमेवर आदळत भूतकाळाच्या दालनात निघून जातात. शरीर मनाला वासना-इच्छा शक्तीचे वरदान असते. ती नैसर्गिक क्रिया शक्तीचा एक भाग असते. शरीर मनाला सतत चैतन्यमय उर्जा शक्तीमध्ये गुंतवून ठेवण्याचे काम ह्या वासना शक्तीमुळे होत राहते.

वासना लाटाप्रमाणे उत्पन्न होत असतात. त्यातून निर्माण केला जातो उद्देश वा हेतू ( Object ). हा उद्देश शरीर मनाच्या हलचाली निर्माण करतो. भविष्यातले विचार व भूत काळांत आठवणीच्या दालनात गेलेले विचार, विचार म्हणून कदाचित मार्गदर्शक होऊ शकतील. परंतु ‘क्षणाचा’ ‘वेळेचा ‘ विचार करताना वर्तमान काळावरची तुमची पकड सत्याचे दर्शन घडवणारी ठरते.

सतत उत्पन्न होणाऱ्या विचारांना थोपून धरण्याचा प्रयत्न करणे व उत्पन्न झालेले विचार त्वरीत बाजूस सारणे ह्या दोन प्रक्रिया आहेत. तुमच्या मनाच्या चंचल स्वभावाने ह्या दोन्हीही क्रिया सतत होत राहतात. त्या क्रियांच्या होण्यामध्ये बाधा निर्माण करणे म्हणजेच मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करणे. विचार रहीत वातावरणाची निर्मीती करणे. Objectless Thought चे वातावरण निर्माण करणे. वर्तमान काळाचे खऱ्या अर्थाने अस्तित्व जाणणे ह्यालाच म्हणतात. शरीरासाठी मनासाठी तुम्ही एका बाजूने भविष्याला जणू थांबवित असता व भूतकाळाला दुर सारुन ( काल्पनीक ) फक्त वर्तमान काळांत असतात. आणि हाच सत्याचा काळ असेल. ह्यालाच अनंत Infinite म्हणता येईल. यांत्रीक पद्धतीने ह्याचे मोजमाप करतां येणार नाही. परंतु आत्म्याच्या स्थरावरचा हा अनंत काळाचा क्षण असेल. ह्या ठिकाणी मिळणाऱ्या आनंदाला सिमा नसेल. Ecstasy of Joy हे सर्व फक्त ध्यान प्रक्रियेमध्ये Meditation मध्येच शक्य आहे. योग धारणा, प्राणायाम, अन्तःकरणातील मनाचा संकल्प जर मजबूत असेल, प्रयत्न तळमळीचे असतील तरच तुम्हाला वर्तमान काळामध्ये जगण्याचा खऱ्या अर्थाने अनुभव मिळू शकतो.

वर्तमान काळात विचार उत्पन्न होऊ शकत नाही. कारण भविष्यातील विचार झेपाऊन लगेच भूत काळांत जातो. त्यामुळे विचार रहीत काळ अर्थात शांतता ( Silence ) हाच वर्तमान काळाचा प्राण बनतो. ह्याच शांततेमध्ये ईश्वरी शक्तीचे आधीष्ठान वास करीत असते. ध्यान धारणेच्या सुरवातीला तुमची केलेली ईश्वरासाठीची प्रार्थना व संकल्प हा ध्यानावस्तेधील शांतता सफल करण्याचा प्रयत्न करते. शब्दाच्या ताकतीने जे साध्य होत नाही ते अव्यक्त स्थितीमुळे अर्थात शांततेच्या काळांत पूर्ण होऊ शकते. सतत वर्तमान काळांत जगा म्हणतात ते ह्याचसाठी. Experience the present by Objectless Silence.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..