‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य : विभाग – २

LATTERATEUR  DNYANESHWAR  AND  LINGUAL-VARIETY Part - 2

साहित्यिक ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषावैविध्य  व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….


विभाग 

  • यासाठी आपण कांहीं उदाहरणें पाहूं या.

पुढें, शक्य तिथें कोट्स्’ (quotes) दिलेले आहेत.  ( इतर कोट्स् नंतर सामील केले जातील ) . मुद्दा महत्वाचा ; कोट्स् हें त्यासाठी ‘सपोर्टिव मटीरियल’ आहे.

 

  • प्रथम एक जनरल् उदाहरण पाहूं या. –  मध्ययुगात ( त्यातील इ.स. चें १४ वें ते १८ वे शतक या काळात), मराठी भाषेतील गद्याचें स्वरूप आणि आणि पद्याचें स्वरूप ही दोन्ही भिन्न भिन्न होतें. दिल्ली-सुलतानियत, दक्षिणेतील शाह्या व मुघल पातशाही या राजवटींच्या प्रभावामुळे, मराठी भाषेत फारसी शब्दांचा प्रचुर शिरकाव झाला. त्याकाळच्या राजकीय गद्यात तर फारसीचा प्रचंड प्रभाव दिसतोच. मात्र, पद्य-साहित्यात, त्यामानानें फारसी शब्दांची घुसखोरी बरीच कमी होती, व म्हणून पद्यें आपल्याला त्यातल्या त्यात मराठीच्या शुद्ध स्वरूपात दिसतात. (लावण्या, हा अपवाद). अन्य लोकगीतेंही बर्‍याच शुद्ध स्वरूपात आढळतात.

(अर्थात् हा ज्ञानेश्दवरांच्या नंतरचा काळ होय).

  • मध्ययुगीन काळात संस्कृतमध्येही रचना होत होत्या. मराठी रचनाकार पाहिले तर, शिवभारत, पर्णाल-पर्वताख्यान, राधामाधवविलासचंपू अशी संस्कृत काव्यें त्या काळीं लिहिली गेलेली आहेत. नीळकंठानें बनारसला राहून, महाभारताच्या विविध हस्तलिखित प्रती जमवून महाभारताची ‘नीळकंठी’ प्रत तयार केली, जी महाराष्ट्रात प्रमाण मानली जाते ( किमान, भांडारकर इन्स्टिट्यूटची संशोधित आवृत्ती येईतों तरी, ती तशी मानली जात असे ). म्हणजेच, तत्कालीन ‘उच्चशिक्षित’ जनांना संस्कृत उत्तम येत होती, आणि त्याचा, त्यांच्या पद्य रचनांवर परिणाम झालेला दिसतो. ( वर उल्लेख केलेली मंडळी / रचना सुद्धा ज्ञानेश्वरांच्या नंतरच्या काळातील आहेत).

या रचना करणारी मंडळी सरकारी सेवेत असल्यामुळे, त्यांना दखनी-हिंदी (म्हणजे नंतरच्या काळात जिला रेख़्ता / उर्दू म्हणून संबोधलें गेलें, ती भाषा) , तसेंच फारसीचें उत्तम ज्ञान होतें, आणि साहजिकच तत्कालीन गद्यलेखनाचा हेतू भिन्न असल्यानें, गद्याची भाषाही पद्यापेक्षा भिन्न होती. (उत्तर-हिंदुस्तानातील हिंदी-पट्ट्यातही असेंच होतें. त्याकडे आपण नंतर थोडेसें वळणार आहोत. )

उदा. – एकनाथांचे गुरु जनार्दनस्वामी (ज्यांनी एकनाथांच्या लहान वयातच त्यांना ज्ञानेश्वरी ‘ऐकवली’ —–  उकलून ‘शिकवली’ असें म्हणूं या ) , हे तर देवगडच्या किल्ल्यावर सरकारी नोकरीत होते. एकनाथांना स्वत:ला उत्तम फारसी येत होती (त्यांना उत्तम संस्कृत भाषा येत होती, हें तर सांगायलाच नको). संस्कृत ग्रंथ ‘शिवभारत’ चे रचयिते कवीन्द्र परमानंद शिवरायांच्या पदरीं होते ; राधामाधवविलासचंपू व पर्णालपर्वताख्यान ( पर्णालपर्वत म्हणजे पन्हाळा) रचणारे जयराम पिंड्ये हे शाहजी राजांच्या पदरी होते, व त्यांना चौदा भाषा येत होत्या. ‘नलदमयंतीस्वयंवराख्यान’चे रचयिते रघुनाथ पंडित हेही शिवरायांच्या पदरी होते (ते रचयिते म्हणजे रघुनाथपंत हणमंते की रघुनाथ पंत ‘पंडितराव’ या वादानें आपल्या analysis मध्ये कांहीं फरक पडत नाहीं). पेशवे काळातील अमृतराय हेही राजकीय स्वरूपाच्या नोकरीत होते. त्यांना फारसी उत्तम येत होती.                                      –

— सुभाष स. नाईक    
Subhash S. Naik

M – 9869002126 .  
eMail : vistainfin@yahoo.co.in

LATTERATEUR  DNYANESHWAR  AND  LINGUAL-VARIETY – Part – 2सुभाष नाईक
About सुभाष नाईक 213 लेख
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची तीन पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. ‘The Earth In Custody’ हे पुस्तक ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी कवितांचें पुस्तक आहे. इतर दोन पुस्तकें ही, ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. महाराष्ट्र टाइम्स, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर आणि इतर अनेक वृत्तपत्रांत/नियतकालिकांत, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…