नवीन लेखन...

लढवय्या बापाचा शेवट

एका रिक्षा चालकाचा मुलगा संदीप…  अत्यंत हुशार… वडिलांनी पायाला भिंगरी लावून अफाट परिश्रम घेत पोराला शिकवलं. त्याच्यावर उत्तम संस्कार दिलेत. आपण जरी रिक्षा चालक असलो तरी आपल्या मुलाने एके दिवशी मोठं साहेब बनावं अशी त्यांची इच्छा….

संदीपलाही वडिलांच्या मेहनतीची जाणीव होतीच… शिक्षण ही यशाची गरुकिल्ली… या गुरुकिल्ली ला मिळवूनचं आखलेलं ध्येय गाठणे शक्य आहे हे त्याला चांगले ठाऊक होते… आपल्या मेहनतीच्या बळावर संदीप आयपीएस अधिकारी झाला पण मुलाचं यश पाहण्यासाठी वडील हयात नाहीत. बाबांना संदीपला साहेबाच्या रूपात बघायचे होते, पण ते न बघताच निघून गेलेत याची खंत नेहमीच त्याचा मनात सलत राहायची.

संदीप ही आज एका मुलीचा वडील आहे. मालती आणि संदीपच्या घराला घरपण देणाऱ्या चिमुकल्या स्वराचा त्यांच्या घरात जन्म झाला. बाप काय असतो, तो समजण्यापलीकडेच असतो हे त्याला वडील झाल्यानंतरच कळले. ठुमुक ठुमुक छोट्याश्या पावलांनी चालणाऱ्या स्वराच्या पैजणांचा झुणझुण आवाज कानाला मधुर वाटायचा. तिचे बोबडे बोल, खुदकन हसणे,, बाबा..बाबा.. म्हणणे हे सारेच संदीप च्या मनाला मंत्रमुग्ध करायचे. ऑफिस मधून पडलेला चेहरा घरी घेवून येणाऱ्या संदीपच्या चेहऱ्यावर तिला बघताच हसू उमलायचे. स्वरामध्ये गुंतून कधी तो ही लहान बनून तिच्या दुनियेत रमायचा त्याला कळायचेचं नाही. वडिलांचं आणि लेकीच नात खरचं जगाच्या प्रत्येक नात्यापेक्षा वेगळं असतं.. आयुष्यभर खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा बाप लेकीच्या लग्नात एखाद्या लहान मुलासारखा ढसाढसा रडतो… खरंच एका मुलीचं वडील होण्यासाठी वाघाच काळीज लागतं.. स्वराने बोललेला पहिला शब्द, तिचे चालणे, अगदीच लहान लहान गोष्टीही संदीप कॅमेरात कैद करून ठेवायचा. आपल्याला लहान असताना ज्या अडचणी आल्यात त्या माझ्या मुलीच्या नशिबी नको यायला यासाठी तो सारखी धडपड करायचा. सकाळी कामाला जाण्यापूर्वी तो स्वराला खेळवायचा, मात्र रात्री घरी आल्यानंतर ती झोपलेली असायची.. कित्येक तास तिचा निरागस चेहरा न्याहाळयचा, हळूच तिच्या गालाची पापी घ्यायचा.. अगदी सगळचं सुरळीत सुरू होतं. सरकारी नोकरी, स्वतःच घर, छोटस कुटुंब सुखाचा संसार सुरू असतानाच एका महामारी ने त्यांचं आयुष्यच पालटलं…

फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीलाच कोरोना या गंभीर महामारीने भारतात पाय पसरायला सुरवात केली.. लोकांच्या मृत्यूचा वाढता आकडा बघत, कधी नव्हे ते पहिल्यांदाच भारताच्या इतिहासात मोठ्या कालावधीचा लॉकडाऊन करण्यात आला. साक्षात देवाच्या रूपात कोरोना रुग्णांसाठी पोलीस, डॉक्टर, परिचारिका धावून आलेत…. यातलाच एक आयपीएस अधिकारी संदीप ही लोकांच्या सेवेसाठी समोर आला. अशिक्षित तर सोडा शिकलेली अज्ञानी लोक ही लॉकडाऊन असताना घराच्या बाहेर पडायचे. दिवसें गणिक ही गर्दी वाढायलाच लागली.

परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर संदीप ला ही पोलीस स्टेशनच्या बाहेर पडावे लागले. एका मध्यवर्ती चौकात संदीपची डुटी लागली… एकतर ही भयावह महामारी त्यातच उन्हात दिवसभर उभं राहुन कर्तव्य बजावणे… पण याची काळजी कोणाला… आपली माणस, कुटुंब सोडून दुसऱ्याच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी यांची चाललेली धावपळ कशी कोणाला दिसणार…. घरी गेल्यावरही चुकून आपल्या बायकोला, मुलीला संसर्ग होवू नये म्हणून संदीप दुसऱ्या खोलीतच झोपायचा.. किती दिवस झालीत त्याने आपल्या चिमुकलीला कवेत घेतले नव्हते, डोळे भरून पाहिले नव्हते, तिला आपल्या हाताने घास भरवला नव्हता.. त्याला बघताच स्वरा जोरजोरात रडायची …बाबा बाबा बोलायची…पण दुर्दैव एका घरातच राहूनही तिला जवळ घेता येत नव्हते. बरेचदा डोळे भरून ही यायचे पण एक बाप दुःख सांगणार तरी कोणाला… तो जिवतोडून लोकांना कुटुंबासोबत घरीच रहा सांगायचा, तरीही लोक जीव धोक्यात घालून बाहेर पडायचे…संदीपला ही कुटुंबासोबत घरी राहायचे होते, बायको सोबत मनमोकळ्या गप्पा मारायच्या होत्या. पण देशसेवेच्या समोर ना घर ना दार …..

या काळात कोरोनाची लागण झाल्याने संदीपच्या दोन साथी पोलिस सहकाऱ्यांचा मृत्यू झाला… काल पर्यंत सोबत असणारे जिवाभावाचे सहकारी वयाच्या तिशीत अशाप्रकारे निघून जातील वाटलचं नव्हतं. रक्ताच्या नातलगांना शेवटचं बघताही आलं नाही. या घटनेमुळे संदीप पुरता हादरला होता.. आता संदीपच्या मनात कोरोनाच्या भीतीने घर केले होते. मला काही झाले तर माझ्या कुटुंबाचं काय होणार ही भीती त्याला सतत सतावत होती…. अश्यातच एकेदिवशी संदीपला बर वाटत नव्हतं..पण कामावर तर जाणे भागचं होते. आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून त्याने दुसऱ्यांचा जीव वाचवण्यात स्वतःला झोकून दिले. काही दिवसानंतर संदीपची तब्येत खालवत गेली. यातच कामावर तो बेशुद्ध झाला. लागलीच त्याला जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. पण दुर्दैव रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने त्याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्याची कोरोना चाचणी positive आली… बायकोला कळताच रडून रडून ती बेहाल झाली. वाईट विचारांनी मनात कल्लोळ केला होता… काल पर्यंत संदीप वर अभिमान वाटणाऱ्या शेजाऱ्यांनी तर त्याच्या कुटुंबाकडे पाठच फिरवली, जणू त्यांनी खूप मोठा गुन्हा केला असावा.

सुदैवाने स्वरा आणि तिची टेस्ट निगेटिव्ह आली… पण कोरोना ने माणसातल्या माणुसकीचे दर्शन त्यांना घडवले.

संदीपच्या तब्येतीत सुधारणा होतंच नव्हती. सारखा स्वराचा चेहरा त्याच्या नजरे समोर यायचा. तिला आणि मालतीला बघायची इच्छा व्हायची, पण भेटणे शक्य नव्हते… विडियो कॉल वरच तो स्वरा आणि मालतीला डोळे भरून बघायचा. त्यांना बघितलं की जगण्याची जणू हिंमतच त्याच्यात नव्याने जगायची. कोरोनाशी लढतांना कित्येकदा त्याने यमालाही मात दिली होती. जणू यम आणि त्याच्यात पाठशिवणीचा खेळचं सुरू होता… पण शेवटी जीवन जगण्याचा हा खेळ संपला…. कोरोनाने पुन्हा एका बापाला त्याच्या कुटुंबा पासून हिरावले.

पांढऱ्या कपड्यात घट्ट बांधलेला संदीपचा मृतदेह थेट शव वाहिकेतून स्मशानभूमीत नेण्यात आला. कुटुंबाला हक्काच्या माणसाला मुखाग्नी ही देता आली नाही… संदीपचा दुरूनच मृतदेह पाहून मालती ने हंबरडा फोडला… संदीप संदीप म्हणत ती ओरडायला लागली…तिचा टाहो ऐकुन स्वराही रडायला लागली…. जगणे – मरणे काय असते हे तर त्या चिमुकल्या जीवाला माहीतच नव्हते… तीचं जग तर फक्त आई आणि बाबा पुरताच मर्यादित होते… पण काळाने बाबांनाही तिच्यापासून दूर केले होते. बोबड्या शब्दांनी बाबा म्हणनाऱ्या स्वराला शेवटची मिठी ही मारता आली नाही. स्मशानभूमीत अनोळख्या लोकांनीच त्याला शेवटचा निरोप दिला…. मालती वर दुःखाचा डोंगर कोसळला होता…. सारखी बाबा ..बाबा बोलणाऱ्या स्वराला बाबा कुठे निघुन गेला हे सांगणार तरी कशी??? कोरोणाशी लढतांना संदीप शहीद झाला… एक लढवय्या बापाचा दुर्दैवी शेवट झाला होता.

परंतु जनसामान्यांना याची काय किंमत… अहो साधे देवाच्या पूजेत काही चुकलं की आपण देव कोपेल म्हणून दहा वेळा देवा तुझ्या सेवेत कमी झाले असेल तर माफ कर… अस बोलतो… मात्र कोरोना काळात साक्षात देवाच्या रूपात लोकांची सेवा करणाऱ्या कोरोना दुतांच्या जीवाशी खेळतो तेव्हा मात्र देव तुमच्यावर कोपणार नाय का?? देव माणसात ही असतो हे आपण कधी समजणार ??? माणुसकीचा धर्म कधी स्वीकारणार?? निःस्वार्थ सेवा करणारा माणूस ही काही देवा पेक्षा कमी नसतो… तेव्हा त्यांच्या जिवाचीही तेवढीच किँमत करा…. या महामारीशी लढायला ऐकट्याची नव्हे तर सर्वाची गरज आहे… तेव्हा नियमांचे पालन करा

…स्वतःची काळजी घ्या….दुसऱ्यांना त्रास होणार नाही असं वागू ही नका…. तमाम कोरोना व्हारियर्स ला माझा दिलं से सलाम

— सौ. शिल्पा पवन हाके 

Avatar
About सौ. शिल्पा पवन हाके 6 Articles
'वाचाल, तर वाचाल'
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..