नवीन लेखन...

क्रोधावर नियंत्रण

एकदा मी ‘हिल युअर बॉडी ‘हे पुस्तक वाचत होते. ह्या पुस्तकाचे लेखक आपला अनुभव सांगतात कि जेव्हा त्यांना समजते कि मला कन्सर (cancer) झाला आहे तेव्हा त्यांनी कन्सर (cancer) निर्माण करणारी विचारांची साखळी बदलली व त्याच बरोबर शरीरातील विषारी घटक साफ करण्यासाठी आहारतज्ञांची मदत घेतली. परिणामी सहा महिन्यामध्ये शरीरात Cancer नावाला सुद्धा राहिला नाही. सारांश असा कि संतापी, चिडचिड करणाऱ्या विचारांनी शरीरामध्ये cancer सारखे आजार निर्माण होतात.

वर्तमानात जर आपण दूरदर्शन तथा वर्तमानपत्राचा मजकूर वाचला तर रागाच्या भरात केलेला व्यक्तिचा खून, संतापून केलेली आत्महत्या तसेच बदल्याची भावना ठेवून केलेला आघात ……… ह्या सर्व घटना रोज नव्याने घडत आहेत. आज Anger Management ची lectures घेतली जातात कारण मनुष्य आपल्या रागावर नियंत्रण करू शकत नाही. काहींना तर असे वाटते की जर आम्ही क्रोध केला नाही तर दुसऱ्यांवर नियंत्रण कसे राहील किंवा रागावले नाही तर काम फटाफट कसे होईल? जेव्हा आपण एखाद्यावर रागावतो तेव्हा परिणामी लोक घाबरून राहतात, लवकर काम करतात, आपले ऐकतात……… अनेक फायदे हतात हा आपला खरचं गैरसमज आहे. एका ठिकाणी आपली इच्छा असते की आपण लोकपसंद व्हावे पण ते रागवून, संतापून, चिडचिड करून शक्य होऊ शकत नाही.

पुरातन काळातील कथा आपल्याला हेच शिकवतात की जितके आपण शांत, प्रेमळ राहू तितके लोकांचे आवडते आणि जितके अहंकारी, तापट स्वभाव तितकेच लोकांचे नावडते. आज आपल्यासमोर जे आदर्श व्यक्ति आहेत त्यांच्या जीवनामध्ये संतुलन दिसून येते स्वतःवर नियंत्रण ठेवणारा व्यक्तीच दुस-यांना नियंत्रित करू शकतो. आपले मात्र संपूर्ण जीवन दुसयाला नियंत्रण करण्यामध्ये व्यतीत होते.

राग आपल्याला का येतो? हे आपण बघू या.

१.जेव्हा मला असे वाटते की मी right आहे आणि समोरचा चुकीचा आहे. तो चुकीचे करतोय हे सांगताना सुद्धा आपण रागावून सांगतो.
२.कधी-कधी असं ही होते की आपली चूक सामोरी येते पण तिला लपवण्यासाठी रागाचे शस्त्र वापरले जाते. जेणेकरून समोरचा व्यक्ती ढिला पडतो.
३.एखाद्यावर अन्याय होत आहे हे बघू शकत नाही तेव्हा ही आपण संतापतो.
४.मी शांतप्रिय आहे पण समोरच्या व्यक्तीने रागावून काही सांगितले तर आपण ही त्याचे उत्तर रागावूनच देतो.
५.मी सांगितलेले काम एखाद्याने नाही केले किंवा वेळेवर नाही केले तरीसुद्धा चिडतो.
६.कधी एखाद्या गोष्टीवर वाद-विवाद होतो, आपली बाजू मांडण्यामध्ये आपण कमजोर पडतो अशावेळी सुद्धा रागावतो.

छोटी-मोठी अनेक करणे ह्या रागाची आहेत पण ह्या रागाचा परिणाम वरवर चांगला दिसत असला तरीही त्याचे परिणाम हे नकारात्मकच आहेत.

१.रागावून केलेले कोणतेही काम चांगले होऊ शकत नाही.
२.संबंधामध्ये मधुरता येण्याऐवजी संबंध कटू होतात. त्याच्यामध्ये भेग पडते.
३.दुस-यासमोर आपली व्यक्तीरेखा चुकीची बनते.
४.शारीरिक नुकसान, विचारांचा गढूळपणा ज्यामुळे जीवनामध्ये दु:ख, अशान्ति वाढत जाते.
५.कधी-कधी तर आपल्या ध्यानी-मनी ही नसणारे परिणाम भोगावे लागतात. जसे कोणी suicide करतो तर कोणी एकाद्याचा खून ही करतो…….. म्हणूनच क्रोधाला भूत म्हटले जाते. क्रोधी व्यक्तीचा चेहरा, डोळे भयावह वाटतात. असा व्यक्ती काहीही करू शकतो ह्याची अनेकानेक उदाहरणे रोज आपल्या ऐकण्यात व पाहण्यात येत आहेत. कसारा घाटामध्ये झालेली सत्य घटना. ज्या मध्ये Driver ने रागाच्या भरात, स्वत:चा ही विचार न करता पूर्ण बस दरीत घातली. एक छोटेसे कारण ही प्रतिशोधाचे रूप घेऊ शकते. अश्या प्रतिशोधामध्ये व्यक्ती कोणाचा ही विचार करत नाही. चांगले-वाईट समजण्याची बुद्धीच नष्ट होऊन जाते. मग किती ही पश्चात्ताप केला तरीही त्या परिस्थितीमध्ये सुधार होऊ शकत नाही.

सकाळी उठल्यापासून ते रात्रि झोपेपर्यंत आपण आपली मनोस्थिती बघूया. नोकरी करणारी स्त्री जिला सकाळी सगळ्यांचा डब्बा बनवायचा आहे, मुलांना तयार करायचे आहे……… अनेकानेक कामाचा ताण. त्या मध्ये जर मुलं वेळेवर उठली नाहीत तर सकाळीच त्यांना बेदम मार पडतो किंवा अपशब्दांनी दिवसाची सुरुवात होते. ती चिडचिड घेऊन ट्रेन मध्ये बसतो. तिथे जर कोणी काही बोलले तर तिथे ही भांडण, मग ऑफिस ……… पुन्हा बॉसचे pressure, कामाचे pressure. मनामध्ये सकाळपासून झालेली चिडचिड ती संतापामध्ये बदलते. मग रात्रि पुन्हा ‘वड्याचे तेल वांग्यावर’. रात्रि स्वत:ला म्हणतो काय करणार ? कामाचा ताण, घरातल्या जबाबदाऱ्या, शरीराची किरकिर ह्यामध्ये मन शांत कसे राहील. राग हा येणारच.

तन आणि मन ह्या दोघांना स्वस्थ ठेवण्यासाठी आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला हवे. आज रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, मायग्रेन, पिंपल्स, पोटाचे विकार ……….. अनेकानेक आजार आहेत जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या रागाची भेट आहे. ह्या रागावर नियंत्रण राखण्यासाठी

१.मनातल्या भावना दाबण्याऐवजी त्या मोकळ्या करण्यासाठी रोज डायरी लिहिण्याची सवय लावावी. ज्या मुळे आपण स्वत:शी संवाद साधून झालेली चूक सुधारण्यासाठी स्वतःला समजवावे.
२.प्रत्येक व्यक्तीला समजून घेण्याची शक्ती वाढवावी. कोणीही चुकीचे नाही परंतु वेगळे आहेत. ‘गलत नही परंतु अलग है’ हे ध्यानात ठेवावे.
३.आपल्या जीवनात आलेली व्यक्ती, परिस्थिती…… प्रत्येकाचा स्वीकार करावा. (Acceptance) ‘जो जसा आहे त्याला तसेच स्वीकारावे.’ जेव्हा आपण स्वीकार करतो तेंव्हा विचार ही शांत होतात. संबंधामध्ये जवळीक येते. जीवनाचा खरा आनंद ह्यातच तर आहे.
४.शेक्सपिअर ह्यांनी आपल्या कवितेत लिहिले आहे कि ‘We are all Actors’ प्रत्येकाला त्याची भूमिका करण्याची स्वतंत्रता आहे. आपण मात्र आपल्या भूमिकेवर लक्ष ठेवावे परंतु आपण दिवसभर दुसऱ्यांना ठीक करण्यामध्ये आपली शक्ती वाया घालवत असतो. प्रत्येकाला चांगले-वाईट समजण्याची बुद्धी ईश्वराने दिली आहे. त्याच बरोबर कर्म करण्याची स्वतंत्रता. गीतेमध्ये लिहिले आहे –‘जे झाले ते ही चांगले, जे होत आहे ते ही चांगले व जे होणार आहे ते तर अतिशय उत्तम’ मग आपण का आणि कशासाठी चिंता-चिडचिड करतो. ह्या रंगमंचावर चाललेल्या प्रत्येकाच्या अभिनयाला साक्षी (Dettached Observer) होऊन बघावे. जेणेकरून आपण रागाला शांत करू शकतो.
५.रागाला Postpone करण्याची सवय लावावी. जर स्वतःचे निरीक्षण केले तर समजून येईल कि राग हा काही सेकंदाचा असतो. त्या ज्वालामुखी उद्रेकाला जर काही वेळेसाठी पुढे सारले तर त्याचा प्रभाव कमी झालेला दिसेल. दुसऱ्या दिवशी आपण ठरवून सुद्धा रागावू शकत नाही.

रागावणे किंवा शांत राहणे हे आपल्या मनोस्थितीवर आधारीत आहे. काही वेळा खूप मोठी घटना ही छोटी वाटते तर कधी-कधी छोटीशी गोष्ट ही मोठी होऊन जाते. म्हणूनच म्हटले आहे ‘जशी स्मृती तशी स्थिती’

मन एक Memorycard आहे त्यामध्ये नकारात्मक गोष्टी, दृश्य यांचा जर साठा असेल तर त्याला Delete करावे व सुंदर अनुभवांना Save करावे. मग जेव्हा मनाची Library Open कराल तेव्हा फक्त सुखद आठवणीच समोर येतील व विचार सर्वांसाठी निर्मळ होतील.

— ब्रह्माकुमारी नीता

Avatar
About ब्रह्माकुमारी नीता 44 Articles
मी ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये 20 वर्षे समर्पित जीवन जगत आहे. मी एक राजयोग शिक्षिका आहे. meditation व त्याच बरोबर अनेक संस्था, शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये जाऊन managment चे courses ही घेते. मराठी वर्तमान पत्रात ही लेखन करण्याचे कार्य करते. विचारांना सकारात्मक कसे बनवावे, तणावमुक्त जीवन, स्पंदन, क्रोधावर नियंत्रण, निसर्गाचे सान्निध्य, शब्द, पालकत्व……..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..