काव्य कलश

मोरपिसारा

 

काव्य कलश

 

ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा,

उपसतो जरी सतत,  होत नसे निचरा….१,

गोड पाणी शब्दांचे,  ओठी अमृत वाटे

पेला भरता काठोकाठ,  काव्य हृदयी उमटे….२,

पेला पेला जमवूनी,  कलश भरून आला

नाहून जाता त्यात,  देह भान विसरला….३,

सांडता पाणी वाहे,  परसते चोहीकडे

आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे….४

 

डॉ. भगवान नागापूरकर

४६९- १८०४८५

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1543 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…