कटीपतंग, चॉईस इज युअर्स !

|| हरि ॐ ||

काही प्रश्न खरोखर अनुत्तरीतच असतात जसे मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? दिवाळीत फटाके का फोडतात? या प्रश्नांची उत्तरे कदाचित बऱ्याच जणांना मिळाली असतील/नसतीलही किंवा सोयीस्कररीत्या मिळविण्याचा प्रयत्न केला नसेल. असो.

पतंग उडविण्याचा इतिहास ३००० वर्षाहून जास्त आहे.

चीनमध्ये बांबू आणि सिल्कच्या कपड्या पासून पतंग बनवीत असतं. चीनमध्ये पतंग उडवीण्याला धार्मिक व पौराणिक महत्व होते. पतंगाच्या मांजाला वैज्ञानिक उपकरणे बांधून हवामानाचे अनेक अंदाज घेतले जात असतं. अमेरिकन शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँन्क्लीन याने पतंगाच्या साह्याने वातावरणातील (पावसाळी ढगातील) विद्युत शक्तीचा शोध लावण्यासाठी उपयोग केला. लॉरेन्स हर्ग्वे यांनी पतंगाचा उपयोग वाहतुकीसाठी केला असे म्हंटले जाते. ७ नोव्हेंबर १९०३ साली स्यॅमुअल फ्रँन्क्लीन कोडी यांनी इग्लिश खाडी पार करतांना होडीला खेचण्यासाठी पतंगांचा उपयोग केला होता. पूर्वीच्या काळी पतंगांचा मांजाला काही उपकरणे बांधून खूप उंचावरून शत्रूवर नजर ठेवण्यासाठीही मिलिटरीत त्याचा उपयोग केला जात असे. दुसऱ्या महायुद्धात (१९३९-४५) मध्ये पतंगांचा गनरी टार्गेट म्हणून उपयोग केला गेला होता. प्रत्येक देशामध्ये त्याचे महत्व वेगवेगळे आहे.

काही महिने भारतात सण आणि उत्सवांची रेलचेल असते. दरवर्षी १४ जानेवारीला मकर संक्रांत ठरलेली. पण यंदा ती रविवार दिनांक १५ जानेवारी, २०१२ला साजरी होणार आहे. मग तिळगुळ/वडया, विविध सुकामेव्यांचे हलवे. नव्या नवरीच्या अंगावर हलव्याचे दागिने, हळदीकुंकू आणि फोटो सेशन. लहानापासून मोठी मुले-मुली, माणसे गच्चीवर जाऊन दिवसभर पतंग उडवत असतात आणि रात्री पतंगाच्या मांजाला बरेच कंदील लाऊन आकाशात उडवतात आणि हे दुष्य खुपच नयनरम्य असते.

पतंग उडविणे हे कौशल्य आहे आणि सर्वांनाच प्राप्त होते असे नाही तर त्यासाठी चिकाटी व मेहेनत लागते आणि हल्लीच्या दिवसात बर्यापेकी पदरमोडही करावी लागते. पतंगांचे राज्य, भाषा, प्रांत व शहरानुसार नामकरण झाले आहे जसे पुद्दी पासून ते पाईली (मोठा पतंग) पर्यंतचे प्रकार असतात. त्यात विविध आकार तसेच राजकारणी आणि सिनेकलाकारांनी त्यात अधिकच चांगले रंग भरले आहेत. पतंगाची कणी बांधण्यापासून ते मांजाचे सिलेक्शन करण्यापर्यंत आणि फिरकी कोणी पकडली आहे इथपर्यंत सर्वच गोष्टी फार महत्वाच्या असतात. आकाशातील पतंग कोणाचा? मित्राचा का शत्रूचा कापायचा? तो घसटायचा की ढील सोडून कापायचा? याचे तंत्र असते. ज्याला ते जमले त्याचा आर्थिक तोटा कमी पण ज्याला हे जमले नाही तर तो पळवाट शोधतो.

आकाशात पतंग उंचच उंच कोणाचा जातो? कोणाची टिकली होते? कोणाचा मांजा कसा चांगला आहे? कोणी घरी बनवला आहे? कोणी सुरत किंवा अहमदाबाद मधून खास ऑर्डर देऊन करून घेतला आहे याचे चर्वीचरण संक्रांति आधी बरेच महिने चालू असते यात बच्चे कंपनी आघाडीवर असते. माझे लहानपण गीर गाव/काळबादेवी येथे गेले असल्याने गल्ली आणि गच्चीवरील क्रिकेट पासून गोट्या, भवरे, पतंग उडविणे असले खेळ आवडीने खेळले गेले. वारा पडणे म्हणजे काय व त्याचे महत्व काय हे फक्त पतंग उडविणाऱ्याला आणि शिडाची होडी भर समुद्रात चालवणाऱ्यालाच कळते.

गिरगाव/काळबादेवी येथील बऱ्याचश्या इमारती एकमेकांच्या एवढया जवळ आहेत की एखादी व्यक्ती एका बिल्डींगच्या छपरावरून दुसऱ्या बिल्डींगच्या छपरावर सहज उडी मारून जाऊ शकते. पतंग उडविण्यापेक्षा पतंग पकडण्यात बऱ्याच मुलांना आवड असते आणि याचे कारण बर्‍याच वेळा आर्थिकच असायचे. संक्रांतीत पतंग उडविण्याच्या/पकडण्याच्या नादात बरीच मुले छपरावरून पडून दगावली आहेत तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. तसेच बरीच मुले/मंडळी रात्यांवरून पतंग उडवीत असतात त्याचा येण्याजाणाऱ्या पादचाऱ्यांना मांजा पायात, गळ्यात अडकल्याने कापण्याची/जखमा होण्याची किंवा पडण्याची भिती असतेच. बऱ्याच वेळा पक्षांचे पंख किंवा पायात मांजा अडकल्याने ते जखमी होऊन जमिनीवर पडण्याचीच शक्यता असते. या घटना दरवर्षी घडत असल्या तरीही यातून धडा घेऊन यात काही बदल होत नाहीत कारण हौसेला मोल नाही.

देशातील सर्व मोठमोठया शहरांपासून ते मुंबईतील इमारती, मैदाने, गल्ल्या, मध्य व पश्चिम द्रुतगती महामाग्र, आणि रेल्वे ट्रॅकमध्ये पतंग उडविण्यापासून ते पकडण्यासाठी मुलांपासून ते मोठया माणसांना हातात मोठी लांब काठी (लग्गा) घेऊन जीवाची पर्वा न करता धावताना पहिले की अपोपाप स्वास रोखला जातो. पतंग पकडण्याच्या/उडविण्याच्या नादात समजा एखाद्या व्यक्तीच्या नशिबी काही दुर्घटनाग्रस्त प्रसंग घडण्याची शक्यता असते. दुर्घटना घडल्याने वाहनातील प्रवाश्यांचे हाल बघवणार नाहीत. काहीवेळा बऱ्याच गाड्यांची एकत्रित टक्कर झाल्याने वाहनांचा झालेला खोळंबा, जीवित व वित्तहानी आणि मानसिक त्रासही होऊ शकतो. दीडदमडी किमतीच्या पतंगापेक्षा जीवाची ती काय किंमत? पण ज्याला हे कळले तो असे दु:साहस करणार नाही. शेवटी प्रत्येकाला कर्म स्वातंत्र्य आहे आणि ज्याच्या त्याच्या आवडी/निवडीचा आणि आनंद व्यक्त करण्याचा प्रश्न आहे. परत एकदा सर्व तरुणाईला आणि पतंग उडविणाऱ्या शोकिंनांना/प्रेमींना आग्रहाची आणि कळकळीची नम्र विनंती की “स्वत: आनंद व्यक्त करतांना/घेतांना दुसर्‍याचा आनंद हिरावू नका”

<जगदीश पटवर्धन, वझिरा, बोरिवली (प)

— जगदीश पटवर्धनजगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 222 लेख
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…