नवीन लेखन...

कठोर शिक्षा – भाग १

दुसरे दिवशी दोघे सकाळी न्याहारीला बसले तेंव्हा रजनीला आठवण झाली. तिने टेबलाचा खण उघडला आणि एक बंद लखोटा नानूच्या हातात दिला.” कालंच हे पत्र आलं होतं. तू उशीरा आलास तोंवर मी झोपून गेले होते. कोणाच्यातरी लग्नाचं आमंत्रण दिसतंय” ती म्हणाली.

 

‘होय. बाळक़ृष्ण शिर्के – माझा कौलेजमधला मित्र. त्याचं लग्न येत्या रविवारी म्हणजे सतरा सप्टेंबरला- मला जावंच लागेल. तुलाही आमंत्रण आहे. ‘सह कुटुंब सह परीवार’”

“मी नाही कोणा ऐर्या गैर्याच्या लग्नाला जाणार” ती म्हणाली.

“अगं, तेव्हढंच मिरवायला मिळेल तुला”

“हो नां, मग मी नक्कीच येईन, माझ्या नव्या साडीची घडी मोडायची.” ती उत्साहाने म्हणाली.

रविवारी ते जोडपं छान पोषाख करून लग्नाला गेलं. नानूने गाडी चालवली. सदाशिव प्रधान सभागृहापर्यंत ती दोघं लवकरच पोहोचली.

प्रवेश द्वारापाशी काही शाळकरी मुलींनी गुलाबदाणीने शिडकाव केला. गुलाबाचं फूल दिलं. पण नानूचं लक्ष हौलमधून येत असलेल्या मंजूळ संगीताने वेधलं. मराठी लग्नात सनई-चौघडा असं संगीत असतंच. पण हे निराळं वाटत होतं. नानू त्या संगीताच्या शोधात हौलमध्ये शिरला. पाठोपाठ रजनीही त्याच्यामागे गेली.”अय्या, राऊत सर सनई वाजवत आहेत. पण हे निराळंच वाद्य वाटतंय”  ती हलक्या आवाजात म्हऩाली.

“होय, या वाद्याला ‘सुंद्री’ म्हणतात. सनईचीच ही लहान आवृत्ती. राऊत सरांना आत्ता हेच वाद्य शक्य आहे.  एका अपघातात त्यांची बोटं  भाजून आखडली गेली.”  नानूने हलक्या आवाजात स्पष्टीकरण दिलं. राऊत सर आपल्याच तंद्रीत डोळे अर्धे मिटून वाजवत होते.  त्यांचं लक्ष नानू – दंपतीकडे गेलं. त्यांनी वाजवणं थांबवलं (की त्यांचा ‘अल्हैया बिलावल’ राग पूर्ण झाला होता)  ते उठूं पहात होते, नानूने त्यांना बसून रहायला खुणेनेच सांगितलं. नंतर भेटू असंही त्याने खुणेने सांगितलं. राऊत सरांनी भीमपलास आळवायला सुरुवात केली.

 

“हेल्लो, नारायण प्रभु- अरे ऩानू, मला ओळखलंस कां?”  नानूच्या पाठीवर  थाप पडली. नानूने मागे वळून पाहिलं, “अरे, तूं? अरविंद साने?   किती वर्षांनी  भेटत आहोंत आपण! तू कुठे असतोस, काय करतोस? “ नानूने अरविंदचा हात हातांत घेऊन विचारलं.

“मी ठाण्याच्या जिल्हा कोर्टात वकील म्हणून प्रॅक्टीस करतो. तू मुम्बईच्या कोर्टात प्रॅकटीस करतोस हे ऐकून माहीत होतं.” अरविंद म्हणाला.

“ ही रजनी- माझी पत्ली –  तू ओळखतोस तिला.”

“ हो,  रजनी राजे, आणि आत्ता सौ. रजनी प्रभु, हेल्लो वहिनी, नमस्कार.” अरविंदने आदरांने आणि आपुलकीने अभिवादन केलं.

“ आमची वहिनी- सौ साने, तुझी पत्नी कुठे आहे?” नानूने विचारलं.

“ ती इतर मैत्रिणींबरोबर घोळक्यात आसेल. चल. आपण बाळक़ृष्णाला भेटून येऊंया..त्याला लग्नाचं अभिनंदन करूंया.” अरविंदने सुचवलं.

 

तीघे बाळकृष्णाला आणि त्याच्या नवपरिणीत वधूला भेटून आले. मेजवानीचं जेवण झाल्यावर ते एके ठिकाणी बसून गप्पा मारूं लागले.

 

“ तुला आपले राऊत सर आठवतात कां रे?  आज ते इथे मला सुंद्री वाजवतांना दिसले”  नानूने विचारलं.

“कोण, रघू काका?  ते माझ्या वडलांचे लांबचे मामेभऊ म्हणून आम्ही त्यांना रघूकाका म्हणतो.”  अरविंद म्हणाला.

“तुला त्यांच्याबद्द्ल  बरीच माहिती असणार. मला सांग, इतक्या भल्या माणसाची अशी दुर्दशा का व्हावी?  मला त्यांच्याबद्दल सर्व सांग ” नानूने विचारलं.

“एके  काळी रघूकाकांचे वडील राजाराम ऱाऊत हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड  तालुक्यामधील मुसरुंदी नांवाच्या खेडेगांवांत रहात होते.  वडिलोपार्जित शेतजमीन होती. खाऊन पिऊन सुखी होते.  राजारामना एक भाऊ होते, ही वडिलोपार्जित इस्टेट दोघा भावांना वारसा म्हणून  एकसंघ मिळाली होती. तुला माहितच आहे, खेडेगांवातली शेती पावसांवर अवलंबून असते. त्यामुळे बरेच गांवकरी शहराकडे रोजगारीकरता जातात. राजाराम राऊत आपल्या कुटुंबासह मुरबाडला येऊन स्थाईक  झाले”  अरविंदने कथानकाची सुरुवात केली.

“मी राऊत सरांची माहिती विचारतो आहे, त्यांच्या वडलांबद्दल नव्हे, आणि इतक्या साध्याभोळ्या माणसांवर अशी परिस्थिती का यावी असा माझा प्रश्न आहे” नानूने अधीरता व्यक्त केली,

 

“रघूकाका भोळे होते म्हणूनच ते घोर संकटात सापडत होते. अशा भल्या माणसांवर दोनदां खुनाचे आरोप लादले गेले होते” अरविंदने हलक्या आवाजात वाक्य पुरं केतं,

“काय?” नानूला धक्काच बसला. “मला खरं वाटत नाहीं” नानू म्हणाला.

“माझासुद्दा विश्वास बसला नसता पण मीच त्यांच्या ह्या केसेस सोडवल्या” अरविंद म्हणाला. “पहिल्या केसमध्ये त्यांनी आपल्या चुलत भावाचा- पांडुरग याचा कुर्हाडीने डोक्यावर वार करून खून केला असा आरोप होता,  मी त्यांना ह्या केसमधून सोडवलं” .अरवविंद म्हणाला.

“पुढे बोल” अरविंदचं कुतुहल वाढलं.

 

 

“मी मघाशी म्हणालो  त्याप्रमाणे  राजाराम राऊत यांनी मूळ गांव सोडलं व ते मुरबाडला स्थाईक झाले, त्यापूर्वी त्यानी आपल्या वांटणीच्या प्रौपर्टीची जोपासना व्हावी म्हणून त्यांचे भाऊ सखाराम ऱाऊत यांच्या नावाने मुखत्यारपत्र (General Power of Attorney)  लिहून सही करून दिलं.कालांतरांने राजाराम आणि सखाराम दोघे वारले. सखारामचा मुलगा पांडुरंग याने गांवाच्या तहसिलदाराशी संगनमत करून स्रर्व प्रौप्रर्टी आपल्या नांवाने करून घ्यायचा प्रयत्न केला. रघूकाकाने कोर्टाकडे धांव घेतली. ठाण्याच्या कोर्टात दावा गुदरला”. अरविंद म्हणाला.

“त्यांनी ती केस जिंकली?”नानूने विचारलं.

“तुला माहित आहेच. कोर्टात केसेस वर्षानुवर्षे रखडतात. न्यायदानाचा विलंब म्हणजे न्यायाचा विलोप. Justice delayed is justice denied अशी म्हण आहे.पण  पांडुरंग आणि त्चांचे साथीदार यांना धीर धरवेना. त्यांनी धाकधपटशा दाखवून प्रौपर्टी हडपण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा त्यांनी रघूकाकांवर लाठी आणि दांडूचा प्रहार केला, दोन महीने रघुकाका इस्पितळांत  होते. पुढच्या खेपेस पांडूकाकांनी  रघूकाकांना मारण्यासाठी कुर्हाड आणली. स्वताचा जीव वाचवण्यासाठी रघूकाकांनी आपली कुर्हाड आडवी धरली. त्याचा घांव बसून पांडुरंगकाकांचा जीव गेला. ही आत्मरक्षणाकरता झालेती हत्या असं मी कोर्टात प्रतिपादन केलं. रघूकाका सुटले. पोलीसांच्या तर्फे यशवंत दळवी सब-इन्स्पेक्टर होते. त्यांनी पुष्टी दिली.”अरविंद म्हणाला.

“देवाचे आभार मानावेत आणि तुझेही. तू त्यांना ह्या संकटातून सोडवलंस.” नानू म्हणाला.

 

पण तूं म्हणालास ती दुसर्या खुनाची केस कोणती?” नानूने विचारलं.

“रघूकाकांना विनोद चव्हाण नांवाचा जावई होता. “ अरविंदने कथा पुढे चालवली.

“हे मला माहित नव्हतं. सरांनी लग्न केलं नव्हतं असं मी ऐकलं होतं” नानू म्हणाला.

“होय, रघूकाकांनी लग्न केलं नाही हे खरं आहे. कोर्टांनी त्यांना  पांडूकाकांच्या खुनाच्या दोषातून मुक्त ठरवलं तरी त्यांनी स्वत:ला माफ केलं नाहीं. माणुसकीच्या नात्याने ते पांडूकाकांच्या विधवा बायकोला –  सुभद्रा काकूंना भेटायला गेले. त्या शेवटच्या घटका मोजत होत्या. रक्ताचा कँसर हे निमित्त. नुकत्याच जन्मलेल्या सुशीलेला त्यांनी रघूकाकांच्या स्वाधीन केलं आणि त्याच्याकडून वचन घेतलं. त्या मुलीचा सांभाळ करायचा, तिचा छळ होऊं नये म्हणून त्यांनी स्वत;  लग्न करूं नये, या मुलीचं लग्न करून देऊन उजवायची असं वचन घेतलं. रघूकाकांनी ते मान्य केलं. नैतिक जबाबदारी, आणि अपराधाची टोंचणी म्हणून त्यांनी त्या मुलीचं पितृत्व स्वीकारलं. सुभद्राकाकूने शेवटचा श्वास सोडला.” अरविंदने पाण्याचा ग्लास तोडाला लावला.

“रघूकाकांनी सुशीलाचा सांभाळ केला. तिला शिकवलं. स्वत:चं नांव वडलांच्या जागी दिलं  एका सुखवस्तु घरातल्या मुलाशी लग्न लावून दिलं. इथे कथानक संपलं असतं, पण तसं झालं नाहीं. चव्हाण कुटुंब सुरुवातीला चांगलं वाटलं होतं पण ते लोभी ठरलं. विनोदच्या आई वडलांनी सुशीलाचा छळ केला. विनोद वदफैली, व्यसनी आणि वेश्या व्यवसायात दलाली करत होता. हुंड्याकरता चव्हाण कुटुंबानी रघूकाकांना लुबाडलं. ते कर्जबाजारी झाले. कळस म्हणजे चव्हाण कुटुंबांनी – विनोदच्या आई वडलांनी -सुशीलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. रघूकाकांना त्यांचा बेत कळला. ते धांवत गेले.

सुशीलेला वांचवण्याच्या प्रयतत्नांत त्यांचे हात होरपळले. ते तिला वांचवूं शकले नाहींत. विनोद तिथून आधीच बेपत्ता झाला होता. विनोदच्या आई वडलांना तुरुंगात पाठवलं गेलं. विनोद घटनास्थळी नव्हता म्हणून सुटला. सुशीलेला विनोदपासून जन्मलेल्या मुलाला –बापूला रघूकाकांनी सांभाळायचं ठरवलं. कोर्टाने रघूकाकांची वडलोपार्जित इस्टेट Administrative General – Official Assignee ;च्या नावांने सरकारी खात्यात जमा केली. काकांना खुनाच्या इतिहासामुळे कुठे नोकरी मिळेना. तरी त्यांनी बापूला सांभाळायची जबाबगारी घेतली. होरपळलेले हात आणि होरपळलेली परीस्थीतीला ते “पांडुरंगाने दिलेली कठोर शिक्षा”  म्हणत.” अरविंदने परत पाण्याचा ग्लास तोंडाला लावला.

“अजून  त्यांनी कोणता खून केला?”  नानूने विचारलं. त्यावर अरविंदला हसू आलं. “खुनाचा मामला आणि तूं हंसतोयंस?” नानूने विचारलं.

“ अरे, त्याचं काय झालं, एकदां विनोद बेपत्ता झाला. तीन तीन  दिवस दिसेनांसा झाला. त्याचे मित्र – मित्र कंसले?  त्याच्या धंद्यातले साथीदार रघूकाकांना विचारूं लागले. पोलीसांना ठाण्याच्या खाडीत एक प्रेत सांपडलं. त्या प्रेताचा चेहरा पाण्यांत राहिला म्हणून विद्रूप झाला होता.  पण इतर वर्णन विनोदच्या शरीराशी जुळत होतं पोलीसांना रघूकाकांचा  संशब आला. सुशीलेचा छळ करण्यात विनोदही सामिल होता, व तिच्या मरणाच्या वेळी तो परागंदा होता अशा कारणांने रघूकाका त्याचा द्वेष करत असावेत म्हणून त्यांनीच विनोदचा खून केला असावा असा पोलीसांनी तर्क केला. काकांना डांबून ठेवलं.  आणि चौथ्या दिवशी विनोद स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. ‘तीन दिवस कुठे होतास?’ असं विचारल्यवर जुगारांत पैसे गमावले म्हणून कर्जदारांपासून लपला होता म्हणाला. काकांना अर्थात पोलीसानी सोडलं आत्ता नुकतीच घडलेली घटना म्हणजे निनोदचा मृतदेह त्याच्या बेडरूम मध्ये मिळाला. पोलीसांना पोस्ट मौर्टेम मध्ये त्याच्या पोटांत पोटैशियम साईनाईड हे वीष  मिळालं. इतर कोणतीही जखम आढळली नाही. पोलीसांनी  पुन्हा रघूकाकांवर संशय घेतला. विनोदच्या मृत्यूसमयी ते स्नेहा अपार्टमेंट्समध्ये रात्रपाळीला होते हे मी पटवून  दिलं. या खेपेसही यशवंत दळवी हे पोलीस औफिसर होते. त्यांची ए.सी. पी. म्हणून बढती झाली होती. विनोदचा खून कोणी केला असावा हे कोडं अजून सुटलेलं नाहीं”  अरविंद म्हणाला.

“ तो जुगारी, दारुडा, आणि वाईट धंदे करणारा म्हणून त्याला शत्रूही अनेक असणार. बायकांचा धंदा करणारा म्हणजे त्याला शत्रूही तसल्याच प्रकारचे असणार. तरी कोणी खून केला असावा कोणाला माहीत ?” नानूने विचारलं

“मला माहीत आहे, कोणी त्याचा खून केला. मीच त्याला ठार केला”

पाठीमागून बायकी आवाज आला.

“रजनी, तूं?” नानूने आश्चर्याने आणि काहींशा अविश्वासाने विचारलं.

अरविंदनेही कान टंवकारले. “आम्हांला सांग हे तू कां आणि कसं केलंस ते”  नानू आणि अरविंद ऐकायला आतूर झाले.  रजनीने शांतपणे थंड पेयाचा ग्लास भरून घेतला. तितक्याच शांतपणे हळूं हळू थंड पेयाचा घोट घेत तिने सुरुवात केली.

‘तो वाईट चालीचा माणूस होता हे खरं आहे. पण ते मला उशीरा कळलं. वडाळ्याला त्यांने एक फोटोचा स्टूडिओ ठेवला आहे. मला काही कारणाकरतां तातडीने फोटो काढून हवे होते. फोटो स्टूडिओ जवळ दिसला म्हणून मी तिथे गेले. त्चांने मला एक साडी दिली आणि ती नेसून यायला मला आतल्या खोलीत जायला सांगितलं. मी त्याप्रमाणे केलं. दुसरे दिवशी मी प्रिंट्स घ्यायला गेले तेंव्हा त्याने आपलं खरं स्वरूप दाखवलं. त्याने माझ्या नकऴत माझे नको त्या अवस्थेतले फोटो काढले होते. मला ब्लॅकमेल कराचचा त्याचा उद्देश होता. त्यांने फोनवरून मला शैय्या सोबत करायची मागणी घातली.मी मुद्दामच होकार दिला, पण अट घातली. त्यांने  सर्व नेगेटिव्हस आणि प्रिंटंस माझ्या स्वधीन करावेत अशी. मी तयारी करून त्याने ठरवलेल्या ठिकाणी गेले. त्याने  खूप दारू प्यायली होती. मी हातांत मोजे घातले. मी माझ्या शाळेतून आणलेल्या पोटैशियम सायनाईडचे कांही थेंब त्याच्या दारूच्या पेल्यात घातले.   ते त्याने  प्यायलं असावं. त्याने आणलेले नेगेटिव्हसं आणि प्रिण्टस मी गोळा केले. घरी आल्यानर ते जाळून टाकले.

आत्ता त्याची चर्चा नको. खितपत पडूं दे त्याला नरकात,.त्याच लाचकीचा आहे तो. . ही मी त्याला दिलेली कठोर शिक्षा” रजनीने कथा संपवली.

— अनिल शर्मा 

(पुढे चालू………!)

Avatar
About अनिल शर्मा 15 Articles
वास्तव्य – बेंगलूरू-कर्नाटक, वय एक्क्यांशी, शिक्षण मराठी भाषेतून झाले. सध्या वृद्धाश्रमात रहातो. एके काळी वकीलीचा व्यनसाय केला. आता स्वस्थ बसून संगणकावर काहीेतरी लिहीत आसतो.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..