नवीन लेखन...

केतकी ! (लघुकथा)

रक्षिताने मग सगळा प्लॅन ठरवला. शनिवारी शाळा सुटली कि, पिंकी, टीना, शबरी, स्नेहा, सगळ्या मुलींनी आपापली दपत्तर घरी ठेवून पुन्हा शाळेत जमायचं. मग रुक्षता मॅडमच्या ओम्नी व्हॅन मधून केतकीच्या घरी जायचं. पिंकीला हे केतकीला कळवायचं होत, पण केतकीकडे मोबाईलच नव्हता!

रक्षिताने ऑफिस मधून केतकीच्या घरचा पत्ता घेतला. मुलींना घेऊन ती केतकीच्या घरी पोहंचली. घर बैठे होते. जुने असले तरी सुस्थितीतले. आजूबाजूला एक दोन पडकी घर होती. घराला तारेचे कम्पाऊंड होते, त्याच्या काटेरी तारा जुन्या अन बऱ्याच जागी तुटलेल्या होत्या.

घराच्या दाराजवळ नेम प्लेट होती. ती मात्र घराच्या मानाने तरुण वाटत होती.
केतकर्स,
-केशव
-कावेरी
-केतकी.
हेच केतकीचे घर.
रक्षिता मॅडमनी घराची बेल वाजवली. रक्षिताच्याच वयाच्या तरुणीने दार उघडले. सात आठ शाळेच्या मुली आणि त्यांची मास्तरीण, हे तिने तर्काने ताडले. पण या येथे कशाला आल्यात?
“कावेरी, कोण आहे ग?” घरातून पुरुषी आवाज आला.
“केशव, अरे कुठली तरी शाळेची ट्रिप दिस्तेयय!, तूच ये ना!”
कावेरी पेक्षा दोन तीन वर्षांनी मोठा असलेला तरुण दारात आला. कावेरी आणि केशवच्या चेहऱ्यावर भले मोठे प्रश्न चिन्ह, रक्षिताला दिसत होते.
“नमस्कार, मॅडम! काही काम होत का?” केशवने दोन्ही हात जोडून नमस्कार करत रक्षिताला विचारले.
“तुम्ही केतकीचे आई – बाबा का ?” रक्षिताने विचारले.
“हो. पण — तुम्ही?”
“मी रक्षिता! केतकीची क्लास टीचर, आणि या तिच्या वर्गातील क्लासमेट आहेत!”
केशव आणि कावेरी कसलीही प्रतिक्रिया न देता, आवक होऊन दारातल्या त्या घोळक्याकडे पहात होते.
“आज न केतकीने, आम्हाला घरी बोलावल होत! कोठे आहे ती? बोलावता का तिला जरा?”
कसली येतीयय ती? बसली असेल कोठे तरी तोंड लपवून! खोटारडी कुठली! म्हणे ‘भूत ‘ दाखवते स्नेहाच्या मनात येउन गेलं.
केशव आणि कावेरी दारातून बाजूला झाले. त्यांनी रक्षिताला घरात येण्याची खूण केली. रक्षिता पाठोपाठ तो मुलींचा घोळका घरात आला. आणि रक्षिता जागीच खिळून उभी राहिली! समोरच्या भिंतीवर केतकीचा गालावर खळी असलेला गोड हसरा फोटो होता, आणि त्याला चंदनाचा हार घातलेला!
“तुम्हीच सांगा, कसा बोलावू केतकीला ?” काळजाला घर पडणाऱ्या आवाजात केशवने रक्षिताला विचारले.
“आम्हाला मूल नाही म्हणून, आम्ही केतकीला दत्तक घेतली होती! दोन वर्षा खाली अल्पश्या आजाराने गेली! हसत खेळत पोर, नजरे समोरून अजूनही हालत नाही! अनाथालयाच्या रेकॉर्डला केतकी सोबत ‘हिला डॉक्टर करायचंय!’ या अर्थाची चिठ्ठी होती म्हणे, इतकच ”
रक्षितची तर वाचाच खुंटली! मग काल पर्यंत शाळेत येणारी केतकी कोण? ती तशीच माघारी फिरली. चिडीचूप झालेल्या पोरी, कश्याबश्या गाडीत बसल्या. व्हॅन शाळेकडे परत फिरली.
रक्षितच्या मागच्या सीटवर बसलेल्या मुलींचा संवाद तिच्या कानावर पडत होता.
“टीना, तुला एक गम्मत सांगू का?” पिंकी सांगत होती.
“काय?”
“त्या घरातला माणूस केतकीचे पप्पा नव्हते! ती रोज ज्यांच्या सोबत स्कुटरवर येते, ते वेगळेच आहेत, क्युट! केतकी सारखी त्यांच्या पण गालावर डिम्पल आहे! आणि यांच्या दारात स्कुटर पण नव्हती!मी मुद्दाम पाहिलं ना!”
रक्षितच्या अंगावर सरसरून काटा आला! म्हणजे केतकी अन तिला शाळेत सोडायला येणारे तिचे पप्पा दोघेही ———-.

पिंकी वाट पाहातीयय, पण त्या नंतर केतकी कधीच शाळेत आली नाही!!

— सु र कुलकर्णी.

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye. 

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..