नवीन लेखन...

कदाचित् परत भेट होणार नाही

मंडळी सप्रेम नमस्कार !
बरेच दिवस हा विषय मनात खदखदत होता , आज मुहुर्त सापडला टंकलेखनाला……
हल्ली गल्लीबोळांत अर्धा डझन पिल्लांसह व्यायलेल्या कुत्रीप्रमाणे मिडियाचा भडिमार झाला आहे ! WA , FB , Twitter…..

जो तो अमूक तमूक बातमी कळवणारा मीच पहिला! या धाटणीने मिडियावर बातम्या पुढाळत असतो.कुणालाही विचारपूर्वक आपलं असं काहितरी निर्माण करून पाठवण्याची आस राहिली नाही !

आमच्या ओळखीतल्याच एका कुटुंबाची कथा : आयुष्य अत्यंत खडतर अवस्थेत गेल्यानंतर आणि चाळीतलं जीवन जगल्यानंतर आता मुलीच्या कृपेने फ्लॅटमधे रहायला गेल्यावर , तेही बोरिवलीला , तिथे असणार्‍या clubhouse पासूनच्या सुखसुविधा पाहून , एखाद्या खेळण्याच्या दुकानात गेल्यावर हरखून गेलेल्या लहान मुलाप्रमाणे या जोडप्याची अवस्था झालीये.त्यामुळे आता शक्य तिथे आपल्या वैभवाचं प्रदर्शन करणं हा एकंच उद्देश असल्याप्रमाणे ते बोकाळलेत.पूर्वी असणारी माणसांची ओढ आणि आस्था आता या वृत्तीमुळे कमी कमी होत चाललीये…..कारण एका ठरावीक वयानंतर फक्त भेटीलागी जीवा लागलीसे आस या उक्तीप्रमाणे माणसाला परतीचे वेध लागलेले असतात.कुणाहीविषयी राग—लोभ, असुया, ईर्षा, हेवेदावे, कपट….. या भावना उरलेल्या नसतात.

समोर भेटणारी व्यक्ती — आपले मित्र—मैत्रिण,नातेवाईक , आप्त स्वकीय….. यांच्या ख्यालीखुशालीच्या बातम्यांनी मन सुखावलं पाहिजे ना? पण नाही , अमूक एक वस्तूची मला गरज आहे की नाही याचा विचार न करता , समोरच्याकडे आहे ना , त्यापेक्षा सरस माझ्याकडे असावं हीच भावना वाढीस लागलेली दिसते. योग्यतेपेक्षा जास्त माणसाला मिळालं की येणारा माज वागण्या—बोलण्यातून डोकावू लागलाय!

कुणालाही फोन केला की , “बोला , आज काय काम काढलंत?” असं विचारतात.आणि आमची सवय अशी की वाढदिवसाला आधी फोन करायचा मग WhatsApp वर शुभेच्छा पाठवायच्या ! याव्यतिरिक्त मी कधीही कुणालाही फोन केला की सुरुवातच अशी करतो की , तुमची आठवण आली आणि बोलावसं वाटलं म्हणून फोन केला , बाकी माझं काहीही काम नाहीये! आणि समजा समोरच्यांनी फोन उचलला नाही फोन काही कारणाने , तर लगेच मेसेज करतो : अगदी सहज फोन केलेला , काहीही URGENCY / EMERGENCY नाहीये !

आपल्याला याक्षणी भेटणारी व्यक्ती ( किंवा आपण स्वत: तरी ! ) पुढच्या क्षणी या जगात असू की नसू? याची खात्री देता येत नाही ! देव कुणालाही कोर्टासारखी ठराविक मुदतीची नोटीस देत नाही !असं असतानाही माणसं बघू , बोलूया Next Time! किंवा परत कधीतरी जमवूया आणि भेटूया! म्हणतात — हा या जगातला सर्वांत मोठ्ठा विनोद आणि दैवदुर्विलास आहे!

हा आत्ताचा क्षण हाच आयुष्यातला शेवटचा क्षण! असं समजून समोरच्या व्यक्तीशी समरसून भेटलं—वागलं पाहिजे! नकारार्थी घेऊ नये , पण कदाचित् परत भेट होणारंच नाही! असं समजून भेटलं तर ती आर्तता कधीतरी समोरच्या व्यक्तीला आपल्या भावना समजतील — अशी आशा ठेवूया ! उम्मीदपे दुनिया कायम है! आणि म्हणून दोस्तांनो , लहान तोंडी मोठा घास घेतला असेल तर माफ करा , पण आयुष्यात हा मंत्र जपा :

There may NOT be NEXT TIME…..कदाचित् परत भेट होणार नाही! (कळ)कळावे ,

– उदय गंगाधर सप्रे म—ठाणे
शनिवार — २ डिसेंबर २०२३ — सकाळी १०.४२

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..